२२ जून १६७०मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता. मराठ्यांनी लाकडी फळ्या वापरुन बचावाची तयारी केली. अशा रीतीने फळ्यांचा वापर करुन ते तटापर्यंत गेले व दोरी लावून आत प्रवेश केला. आतल्या सैन्याने चटकन हत्यारे टाकली व कर्नाळा किल्ला घेतला शिवाय पावसाळ्यापूर्वी कल्याण प्रांत ही काबीज केला
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जून १६६९
बिकानेरचा राजा रावकर्णाचा मृत्यू
बिकानेरचा राजा रावकर्ण याचा मृत्यू औरंगाबाद येथे २२ जून १६६९ रोजी झाला. पण शिवाजी महाराजांनी कर्णाशी जोडलेले संबंध नंतरही एकदा आणीबाणीच्या प्रसंगी उपयोगी पडले.
१६७९ च्या नोव्हेंबर मध्ये महाराजांनी जालना शहरावर हल्ला चढविला. यावेळी जालण्याचा मोगल अधिकारी रणमस्तखान हा होता.
"... मोगलांचे सैन्य चालून येत आहेत, सावध राहा.."
असा इशारा मोगल सरदार किशनसिंह राठोड याने जालण्याच्या मोहिमेत महाराजांना दिला. म्हणून महाराज अधिक हानी न होता जालन्यातून निघून गेले.
याविषयी सभासद बखरकार म्हणतो -
".. त्याचे कुमकेस केसरसिंग व सरदारखान व बाजे उमराव असे वीस हजार फौज तीन कोसांवर राहिली. मग केसरसिंग यांनी अंतरंगे सांगून पाठविले की 'उभयपक्षी भाऊपणा आहे. आमची गाठ पडली नाही तोवर तुम्ही कूच करून जाणे' हे वर्तमान कळताच राजे तेथून निघाले.. "
शिवाजी महाराजांना वेळीच सावधगिरीचा इशारा देणारा हा केसरसिंग म्हणजेच राव कर्ण याचा मुलगा होय.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जून १६७०
मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.
माहुलीवरील यशस्वी प्रयत्नानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्नाळ्याला गेले. दलदल व दाट जंगलाने वेढलेला हा किल्ला जिंकण्यास अवघड होता. मराठ्यांनी लाकडी फळ्या वापरुन बचावाची तयारी केली. अशा रीतीने फळ्यांचा वापर करुन ते तटापर्यंत गेले व दोरी लावून आत प्रवेश केला. आतल्या सैन्याने चटकन हत्यारे टाकली व कर्नाळा किल्ला घेतला शिवाय पावसाळ्यापूर्वी कल्याण प्रांत ही काबीज केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जून १७०१
औरंगजेबाने वर्धनगड जिंकला
वर्धनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीची एक रांग माणदेशातून फिरली आहे. तिचे नाव महादेव डोंगर रांग. त्या रांगेवर भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ मैलांवर व साताऱ्याच्या ईशान्येस १७ मैलांवर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या लालगून व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे.
मे १७०१ या दिवशी मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फते उल्ला खान याने सल्ला दिला की, बादशहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील. औरंगजेबाने मंजुरी दिली.
दिनांक ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभाव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज न उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होते, म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमधील लोकांना आक्रमणाची अगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायकांमुलांना किल्ल्यात नेले.
नंतर वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखानाकडे पाठवला. त्याने सांगितले की, किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केले. फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्ला खान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पहात राहिला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकलासुद्धा नाही. फतेउल्लाखानाला मराठ्यांचा खेळ लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पण यात अनेक मराठे मारले गेले; अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकली. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला.
दि. २२ जून रोजी "मीर ए सामान" या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य, चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू, सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून "सादिकगड" असे ठेवले. औरंगजेबाची पाठ
फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि
त्याचे सादिकगड हे नाव बदलून वर्धनगड केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जून १७९२
फर्मान बाडी ‘चा कार्यक्रम
महादजी शिंदे पुण्यात पोहोचल्यावर १२ जून १७९२ ला त्यांनी कारभाऱ्यानच्या भेटी घेऊन बादशाह शाह आलमने दिलेल्या वकील इ मुत्लक बहुमान व त्याच्या बरोबरील मान सन्मान सवाई माधवरावास देण्या विषयी चर्चा केली.
पण कारभारी त्याबाबत काही बोलेनासे झाले. तेव्हा महादजींनी सर्व मुत्सद्यांचा विरोध मोडून काढून २२ जून १७९२ रोजी गारपीराजवळ (आताचा ससून हॉस्पिटलच्या आसपासचा भाग) खास शामियाना उभारून सवाई माधवरावना मानाची वस्त्रे देण्याचा कार्यक्रम म्हणजे ‘फर्मान बाडी ‘चा कार्यक्रम पार पडला.
वकील इ मुतलकी पदामुळे मराठ्यांना बादशाहची मुखत्यारी मिळाली, ते मोगली सत्तेचे अधिकृत कारभारी बनले, हिंदुस्थानच्या सत्तास्पर्धेत इंग्रजांवर मात केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जून १८९७
चाफ़ेकर बंधूंकडून पुण्याच्या गणेशखिंडीत रँडचा वध केला.
वासुदेव चाफेकर, दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२२ जून १९४१
२२ जून १९४१ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मुंबईमधील सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील, आगामी काळातील सशस्त्र घडामोडींविषयी दोघांमध्ये अनेक महत्वाच्या बाबींवर सखोल चर्चा झाली. पुढे १९४३ मध्ये सुभाषबाबूंनी स्थापन केलेल्या 'आझाद हिंद सेने'चे बीजारोपण ह्याच चर्चेदरम्यान झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.
जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री 🚩
Comments
Post a Comment