१९ जून १६७७छत्रपती शिवरायांचा इंग्रजांच्या तिमेरी वखारीवर हल्ला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ जून १६२६
बहामनी शासकाच्या वजीर निजाम मल्लिक अंबर याच्या काळात धोडप किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला आणि त्याने थोडी फार पुनर्बांधणी व डागडूजी करुन किल्ला भक्कम केला. किल्ल्यावर अलावर्दीखानाने पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख वाचावयास किंवा पहायला मिळतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ जून १६५९
वसईचा पोर्तुगीज कॅप्टन लिहितो,
‘छत्रपती शिवाजी महाराजांकडे भिवंडी, कल्याण व पेठा येथे २० संग्विसेशचे आरमार दंड्याच्या सिद्दीशी युध्द करण्याकरीता म्हणून आहे... दंड्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा काही गुप्त हेतू असू शकेल आणि तो साष्टी बेटाला अत्यंत घातक होईल.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ जून १६७६
औरंगजेबाने कंदाहारच्या मोहिमेवर असलेल्या नेताजी पालकरांना बोलवून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले. नेतोजी उर्फ मुहंमद कुलीखान पुनश्च हिंदू झाले. शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने विधीवत नेताजी पालकरांना पुनः शुद्ध करून हिंदु धर्माचे द्वार खुले केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ जून १६७७
छत्रपती शिवरायांचा इंग्रजांच्या तिमेरी वखारीवर हल्ला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१९ जून १७४३
बाळाजी बाजीराव यांस पेशवाई पद दिल्यावर छत्रपती शाहुंनी पेशवे पदासाठी झुंजणाऱ्या बाबुजी नाईकास कर्नाटक मामला दिला. वास्तविक कर्नाटक सुभा, विजापूर, भागानगर आणि तुंगभद्रा व रामेश्वर मधील सर्व प्रदेश हा राजाच्या खाजगीकडचा. त्या सर्व प्रदेशात मुलूखगिरी करण्याचा हक्क बाबुजी नाईक बारामतीकर यांस छत्रपती शाहू महाराजांनी तारीख १९ जून १७४३ च्या हुकूमान्वये दिला. ह्या मोबदल्यात बाबुजी नाईकानी दरसाली महाराजास ७ लाख रुपये द्यावयाचे असून शिवाय ५ लाख रुपये खंडणी तंजावर राजाकडून घेऊन द्यावयाची असे नाईकांनी कबूल केले होते. कर्नाटक क्षेत्र आपल्यास मिळाल्यावर बाबूजी नाईकांनी कर्नाटकात दोन स्वाऱ्या केल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१९ जून १८८२
छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी इंग्रजांविरुध्द बंड पुकारले. जानेवारी १८७८ साली ब्रिटीशांनी स्टेट कारभारी म्हणुन महादेव वा. बर्वे याची नेमणूक केली. बर्वे हा फार स्वार्थी लाचार आणि जातीयवादी धूर्त व्यक्ती होता. त्याने स्वजातीचे शंभरच्यावर लोक प्रशासनात घुसवले. त्याने इंग्रजांच्या मदतीने कटकारस्थानाला सुरवात केली. महाराजांना वेड लागले अशी आफवा बर्वे पसरवू लागला. महाराज एकटेच लढत होते त्यांनी हार मानली नव्हती. इंग्रजांच्या मदतीने महादेव बर्व्याने कोल्हापुरमध्येच महाराजांना एकांतत बंदीस्त केले नंतर १९ जून १८८२ रोजी त्यांना गुप्तपणे पुणेमार्गानी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर हालवले किल्ल्यात एका ईमारतीत एकांतात ठेवले. कोणीही ओळखीचा चेहरा दिसनार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली. महाराजावर मानसिक व शारीरिक छळ सुरुच होता. आडदांड सोल्जर ग्रीन याची महाराजांचा आंगरक्षक म्हणुन नेमनुक केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.
जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री 🚩
Comments
Post a Comment