११ जून १६६५"छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्यात प्रसिद्ध "पुरंदरचा तह"

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ जून १६६५
"छत्रपती शिवाजी महाराज" आणि "मिर्झाराजे जयसिंग" यांच्यात प्रसिद्ध "पुरंदरचा तह"
इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे वडील शहाजीराजे कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये छत्रपती शिवाजी महराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला.
या तहान्वये महाराजांनी आग्राला भेट देण्याचे तसेच दक्षिणेकडील मुघलांना मदत करण्याचे मान्य केले व चार लाख होणचा प्रदेश व २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
१. अंकोला
२. कर्नाळा
३. कोंढाणा (सिंहगड)
४ कोहोज
५. खिरदुर्ग (सागरगड)
६. तिकोना
७. तुंग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरंदर
१२. प्रबळगड - मुरंजन
१३. भंडारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९. रोहिडा
२०. लोहगड
२१. वसंतगड
२२. विसापूर
२३. सोनगड

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ जून १६७४
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ओक्सेद्रनला भेटण्याची परवानगी दिली.
राज्याभिषेक झाल्यावर ऑक्झेंडनने निराजीपंतांच्या पाठीशी लकडा लावला की आता यावर राजाची संमतीदर्शक सही घ्या. तहाच्या कलामांचे कागद त्याने सतत आपल्याजवळ बाळगले होते. ता. ११ जून रोजी शिवाजीराजे यांनी तहावर आपल्या मान्यतेची निदर्शक म्हणून सही केली. ता. १२ जून रोजी त्यावर सर्व अष्टप्रधानांच्या सह्या झाल्या. ऑक्झेंडन निराजीपंतांच्या घरी गेला; निराजी व ऑक्झेंडन यांचे भाषण झाले, ते स्नेहपूर्व होते. कलमाचे उतारे करून इत्यादी कामगिरी निराजीपंतांच्या पुतण्याने केली असल्याने ऑक्झेंडनने त्याला एक पामारी दिली.
प्रसन्न मनाने, ता. १३ जून रोजी ऑक्झेंडन रायगडावरून निघाला व ता. १६ जून रोजी मुंबईस येऊन दाखल झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ जून १६७५
राजापूरमार्गे छत्रपती शिवराय किल्ले रायगडवर दाखल झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ जून १७७५
सेनापती यशवंतराव शिंदे यांनी मार्च १७७५ मध्ये नाना फडणिसास पत्र लिहिले, "राजश्री पंतप्रधानांकडून धन्याचे पायाशी अमर्यादा न व्हावी यासाठी तीर्थरूप महाराज आबासाहेब (संभाजी राजे) आणि मातुश्री आईसाहेब (जिजाबाई) यांच्याशी नानासाहेब पेशवे व त्यांचे चुलत बंधू सदाशिवरावभाऊ यांनी पूर्वी शपथपूर्वक करारमदार केला. त्या कराराप्रमाणे वर्तन व्हावे.अशी अनेक पत्रे पुणे दरबारी करवीरकरांकडून जात असत. पण त्यांची बूज राखली जात नसे असे दिसते. कारण तारीख ११ जून १७७५ च्या पत्रावरून कोन्हेररावानी अर्जुनगड, धरणगुती व हेराळी येथे ७ जून १७७५ रोजी करवीरकरांशी लढाई केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ जून १७९२
महादजी पुण्यात...
वकील-इ-मुतालिकीच्या सनदा आणि आताच्या मथुरा-वृंदावनच्या सनदा घेऊन महादजी पुण्याकडे निघाले. दि. १३ जानेवारी १७९२ रोजी महादजींनी प्रतापगडाहून (उज्जैनजवळील) कूच केले आणि उज्जैन, हुताशनी, बीड, नांदूर, तुळजापूर, जांबगड या मार्गाने दि. ११ जून १७९२ रोजी पुण्याच्या संगमावर पोहोचले. पुरत्या आठ वर्षांनंतर महादजी पुण्याच्या वेशीवर येऊन पोहोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

११ जून १८९७
क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल जयंती
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक 'अनमोल रत्न' पंडित रामप्रसाद बिस्मिल ह्यांचा आज जन्मदिवस ! (११ जून १८९७)
"मरते 'बिस्मिल', 'रोशन', 'लाहिरी', 'अशफाक' अत्याचार से । होंगे पैदा सैंकडो इनकी रुधिर की धार से ॥" - पं. रामप्रसाद बिस्मिल.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.

जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४