५ जून १६७२युवराज संभाजीराजेंनी स्वतंत्रपणे मोहीम सुरू करून मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (शिवाजी महाराजांचे पंतप्रधान)" यांच्या साथीने जव्हार" परगणा जिंकून मुक्त केला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
५ जून १६५९
औरंगजेबाचे राज्यरोहण
इस १६५७ मधे शिवाजीराजांनी मुघलांच्या ताब्यातील जुन्नरवर अचानक हल्ला करून औरंगजेबाला धक्का दिला होता खरा मात्र, त्याविरुद्ध काही तोडगा काढण्याआधीच औरंगजेबाला सत्तासंघर्षासाठी दिल्लीच्या दिशेने जावे लागले.
भाऊ आणि इतर प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढुन व बाप शहाजहानला कैदेत टाकुन निश्चिंत होऊन औरंगजेब ५ जून १६५९ रोजी थाटामाटात दिल्लीच्या गादीवर बसला. त्याप्रसंगी राजकारणाचा भाग म्हणून महाराजांतर्फे नजराणा घेऊन सोनोपंत दिल्ली दरबारात उपस्थित होते. त्यांनी तो औरंगजेबाला पेश केला त्याबदल्यात औरंगजेबानेही महाराजांना देण्यासाठी पोशाख व फर्मान सोनोपंतांना दिले. फर्मानात 'इकडील लोभ आपणावर पूर्ण आहे असे जाणून असावे' असे नमूद होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
५ जून १६६०
आदीलशाही सरदार अफझलखानास छत्रपती शिवरायांनी मोठ्या बहादूरीने ठार केल्याची वार्ता औरंगजेब बादशहाला समजली. तेव्हा त्याने शिवरायांना मानाचा पोशाख आणि पत्र पाठवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
५ जून १६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाँआरा बेगम"च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
५ जून १६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग" याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
५ जून १६७२
युवराज संभाजीराजेंनी स्वतंत्रपणे मोहीम सुरू करून मोरोपंत त्र्यंबक पिंगळे (शिवाजी महाराजांचे पंतप्रधान)" यांच्या साथीने जव्हार" परगणा जिंकून मुक्त केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
५ जून १६७४
छत्रपती शिवाजी महाराजांचा संपुर्ण विधी
सकाळी ऐन्द्रिशान्ती झाली त्यानंतर ब्राह्मणांना भोजन देण्यात आले. कर्मसंपूर्णता वाचण्यात आली. हे सर्व विधी सपत्नीक झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
५ जून १७३०
छत्रपती शाहु महाराजांतर्फे प्रतिनिधी व फत्तेसिंग भोसले रायगडावर स्वारी करून तो जिंकतात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment