१५ जून १६७५कारवारची मोहिम आटोपून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १६६५
ऐतिहासिक किल्ले पुरंदरचा तह झाल्यानंतर
दाउदखानची भेट घेऊन छत्रपती शिवराय "किल्ले राजगड" कडे परतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १६६५
पुरंदरच्या तहानुसार किरंतसिंह हा सरदार किल्ले कोंढाणा (सिंहगड) ताब्यात घेण्यासाठी कोंढाण्यावर आला.
त्यावेळी किल्ले कोंढाण्याचा नवीन किल्लेदार "उदयभान राठोड" याला केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १६७०
मराठ्यांनी सिंदोळा गाव आणि किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १६७५
कारवारची मोहिम आटोपून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १६८१
शहजादा अकबरास भेटण्याबाबत छत्रपती संभाजी महाराजांची मंत्री मंडळाची बैठक ! 
जून महिण्याच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात आलेल्या अकबर व दुर्गादास राठोड यांनी पाली (नागोठणे) परिसरात आपला तळ दिला होता. छत्रपती संभाजी महाराजांना याची त्वरित खबर दिली गेली. शहजादा अकबरास भेटावे की, न भेटावे या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी मंत्रीमंडळाचा सल्ला घेण्याविषयी बैठक बोलावली. त्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच प्रथम प्रतिनिधी पाठवून शहजादा अकबराशी चाचपणी करावी असे ठरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १७०४
सरसेनापती धनाजी जाधवांनी औरंगजेब बादशहाच्या ब्रम्हपुरी च्या छावणी वर हल्ला केला... 
यावेळी मोगलांच्या वर धनाजी जाधवांनी मोठा बाका प्रसंग आणला होता. 
औरंगजेब बादशहाची बायको उदेपुरी बेगम, मुलगी झिनतउन्निसा बेगम आणि बादशहाच्या अंत:पुरातील इतर स्त्रिया यांच्या सह संपूर्ण कुटुंब कबीलाच मराठ्यांच्या ताब्यात येण्याची भिती निर्माण झाली होती...
परंतु ऐनवेळी एका रजपुत सरदारामुळे ही घटना टळली....
धनाजी जाधवांनी ब्रम्हपुरी तळावर हल्ला केला ती तारीख होती - १५ जून १७०४.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १७२१
छत्रपती थोरले शाहू माहाराज यांची सेनापती संताजी घोरपडे यांचे पुत्र पिराजी घोरपडे यांस दिनांक १५ जून सन १७२१ रोजीची सनद
घोरपडे घराण्यातील सेनापती संताजी घोरपडे यांचे वडील म्हाळोजी घोरपडे यांच्याविषयीही काही गौरवपूर्ण उल्लेख कागदपत्रांतून आढळून येतात. सेनापती संताजी घोरपडे यांच्याविषयी गौरवपूर्ण उल्लेख छत्रपती थोरले शाहू माहाराज {सातारा} व छत्रपती थोरले संभाजी माहाराज {करवीर} तसेच हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांच्या संताजी पुत्र राणोजी व पिराजी यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातील कागदपत्रांतून आढळतात. वजनदार घोरपडे घराण्यास आपल्या बाजूला राखण्यासाठी स्वराज्याच्या दोन्हीही पातींनी प्रयत्न केल्याचे दिसते. संताजीपुत्र राणोजी व पिराजी यांनीही युध्दभूमीवर स्वराज्याच्या यज्ञात स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन घोरपडे घराण्याची परंपरा कायम राखली. संताजीरावांच्या अर्धांगी द्वारकाबाई यांनी मुत्सद्दीपणे कारभार करून प्रसंगी थोरले शाहू माहाराज यांच्या वडीलकीचा आशिर्वाद मिळवून अवघ्या पाच वर्षांच्या पिराजी पुत्र राणोजीच्या नावे करवीर छत्रपती यांजकडून सेनापती पदाची वस्त्रे मिळवली आणि घराण्याची "सेनापती" परंपरा कायम राखली. सेनापती घोरपडे घराण्यास एकाच वेळेस दोन्हीही छत्रपतींकडून विविध इनामे होती. त्यातील छत्रपती थोरले शाहू माहाराज यांची सेनापती संताजी घोरपडे यांचे पुत्र पिराजी घोरपडे यांस दिनांक १५ जून सन १७२१ रोजीची सनद पुढीलप्रमाणे.. 

सनदेवर थोरले शाहू माहाराज आणि थोरले बाजीराव यांच्या मुद्रा आहेत तसेच मोर्तबही आहे. खालील मोडी मजकूराचे देवनागरी लिप्यंतर पुढीलप्रमाणे...

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४८ प्लव संवत्सरे 
आषाढ शुद्ध व्दितीया गुरूवासरे क्षत्रिय कुलव
                      तंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी याणी 
                       मोकदमानी कसबा भाल
वणी प्रांत खटाव यास 
आज्ञा केली ऐसिजे राजेश्री पिराजी बीन संताजी 
घोरपडे हे स्वामीचे पुरातन सेवक याचे चाल
वणे स्वामीस आवश्यक जाणोन स्वामी याजवर कृपा
ळू होऊन कसबे मजकूर पेशजीच्या मुकाशीया कडून दूर करू
न हल्ली कुलबाबकुलकानु खेरिज इनामदार 
व हकदार मशार निल्हे यास याचे पुत्रपौत्रादी 
वंशपरंपरेने इनाम करून दिल्हा असे तरी तुम्ही 
यास रूजू होऊन त्याचे आज्ञेत वर्तोन कसबे मजकूर
चा ऐवज आकारप्रमाणे याजकडे पुत्रपौत्रादी वंश
परंपरेने वसूल देत जाणे प्रतीवर्षी नुतन पत्रा
चा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घे
ऊन दुसरे भोगवटीयास या जवली पाठवून देणे लेखनालंकार

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १७५७
अंतर्वेदेत अंताजी माणकेश्वरची फौज उतरली होती. तिने सहारणपूरपासून इटाव्यापर्यंतचा तमाम प्रदेश अल्पायासे व्यापला. आता दिल्लीच घेण्याचे काम बाकी राहीले. वजीर गाजीउद्दीन पहिल्यापासून मराठ्यांस अनुकूल होता. त्यास मराठ्यांचा आश्रय इष्ट वाटत होता. त्याने हिगण्याचे मार्फत  रघुनाथरावाशी पुढील व्यवस्थेचे बोलणे सुरू केली. ते मान्य करून रघुनाथराव जून १५ रोजी दिल्लीवर निघाले. यमुनेच्या उभय काठांनी मराठी फौजा चालून गेल्या त्या ११ ऑगस्ट १७५७ ला तदल्ली पुढे येऊन ठाकल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१५ जून १७५७
श्रीरांगपट्टिची स्वारी (१ जानेवारी १७५७ ते १५ जून १७५७)
कर्नाटकात स्वारी करण्यास पेशव्याचे मुख्य दोन हेतू होते.— (१) मराठ्यांची सत्ता वाढतवणे
(२) कर्नाटकातील छोट्या मोठ्या संस्थानांकडून खंडण्या गोळा करणे
श्रीरंगपट्टणच्या परिसरात मराठा सैन्य येताच 
दलवाई, म्हैसूरचे दिवाण, नंदा राजा याची घाबरगुंडी उडाली. त्याने म्हैसूरचा सरदार हैदरअल्ली दिडीगढला होता त्यास परत बोलावले. दरम्यान मराठे शहरात घुसले आणि त्यांनी नंदा राजाकडे थकलेल्या खंडणीची मागणी केली. नंदा राजाने एवढा पैसा तिजोरीत नाही तो कुठून देणार असे सांगून आपली अगतिकता प्रगट केली. तेव्हा सदाशिवराव र
भाऊंच्या सांगण्यावरून श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यास 
मराठ्यांनी वेढा दिला. पेशव्यांनी म्हैसूरकरांतर्फे महादेव विरकर याच्याशी मध्यस्थी कली.
म्हैसूरच्या दलवाईशी तह करून मराठे परत फिरले (एप्रिल १७५७) आणि विनापट्टण, सिरा, आदी स्थळे घेत-घेत पेशवे १५ जून १७५७ रोजी पुण्यास आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.

जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४