१४ जून १७०४छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई" आणि पुत्र "शाहू(थोरले)" यांना औरंगजेबने कैद करून आग्रा येथे नेले होते.तिथेच कैदेत असताना आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने "शाहूराजे(थोरले)" यांचं लग्न लावून दिले.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१४ जून १६६५
१३ ला रात्री मिर्झा राजांनी व शिवाजी महाराजांनी एकत्र भोजन करून १४ जून रोजी शिवाजी महाराजांनी मिर्झाराजांचा निरोप घेतला व कोंडाणा किल्ला मुगलांच्या हवाली करून १५ जून रोजी राजगडावर दाखल झाले. तहाच्या अटी पाळल्या जाव्यात यासाठी १७ तारखेस मुगल सरदार उग्रसेन कच्छवा यांच्या हवाली ओलीस म्हणून संभाजी राजांची पाठवणी मिर्झा राजांच्या शिबिरात केली गेली. तहाच्या अटींचे पालन होत किल्ले मिर्झा राजांच्या ताब्यात येताच संभाजी राजांची सुटका करण्यात आली. मोगलांनी गड ताब्यात येताच तेथे मोगली किल्लेदार नेमले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१४ जुन १६८२
आदिलशाही मुलुखावर आक्रमण करण्यास औरंगजेब बादशहाने शहजादा मुअज्जमला रवाना केले. शहजादा मुअज्जम अहमदनगरहून निघाला या मोहिमेत आज्जमने धारवाड काबीज करून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात उतरला त्याने आपला तळ कायम करून तेथे लष्कर प्रमुख म्हणून आपली पत्नी जहांजेब बानू "उर्फ जानी बेगम हिला ठेवले व राव अनिरुद्ध सिंग हाडा यांस राजपूत सैन्यासह ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१४ जुन १६८४
छत्रपती संभाजी महाराजांचे आज्ञापत्र
छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांनी शंकराजी मुरार देशाधिकारी त्र्यंबकेश्वर प्रांत नाशिक यांना सर्गे येथील मुकुंद भट व अपदेव भट यांच्यातील उपाध्येपणाच्या वादाचा निवाडा करावा म्हणून सन १४ जून१६८४ मध्ये हे आज्ञापत्र देतात. यात उल्लेखित ढेरगे भट शास्त्री हे छत्रपती घराण्याचे नाशिक प्रांतातील कुलोपाध्याय आहेत. सन. १६६३ साली सुरते वरील पहिल्या छाप्यावेळी पुण्यश्लोक श्रीशिवछत्रपती हे ३० डिसेंम्बर १६६३ रोजी मुंबई मार्गे नाशिक येथील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आले असता तत्कालीन श्रीत्र्यंबकगडाचे किल्लेदार विनायकराव गमे यांच्याकडे मुक्कामी होते तथा याच ढेरगे शास्त्रींच्या पौराहित्याखाली श्रीशिवछत्रपतींनी श्रीज्योतिर्लिंगाची पुष्पक पूजा केल्याचा उल्लेख ढेरगे संग्रह पुराभिलेखात आढळतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१४ जून १६८६
विजापूरची आदिलशाही किल्ला बरेच दिवस वेढा घालूनही ताब्यात येत नसल्याने औरंगजेब बादशाह सोलापूरच्या किल्ल्यातून १४ जून १६८६ ला विजापूरकडे निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१४ जून १७०४
छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई" आणि पुत्र "शाहू(थोरले)" यांना औरंगजेबने कैद करून आग्रा येथे नेले होते.
तिथेच कैदेत असताना आजच्या दिवशी औरंगजेब बादशहाने "शाहूराजे(थोरले)" यांचं लग्न लावून दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment