१२ जून १६४९चाकण प्रांत स्वराज्यात दाखल झाला. ८ जूनला संग्रामदुर्ग किल्ला जिंकला होता.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जून १६४९
चाकण प्रांत स्वराज्यात दाखल झाला. ८ जूनला संग्रामदुर्ग किल्ला जिंकला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जून १६६५
"पुरंदर किल्ला" सय्यद मुहम्मद जवार याच्याकडे देऊन गड मिर्झाराजे जयसिंहाच्या ताब्यात गेला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१२ जून १६६५
महाराज व इटालियन प्रवासी डॉ. निकोलाय मनुची यांची भेट...
महाराज व इटालियन प्रवासी डॉ निकोलाय मनुची यांची पुरंदरच्या तहाच्यावेळी ऐतिहासिक भेट झाली. ही भेट इतकी ऐतिहासिक आणि महत्त्वाची आहे की, या भेटीला मोल नाही. कारण निकोलाय मनुची याला तत्कालीन राजे रजवाड्यांची चित्रे जमविण्याचा शौक होता. पुढे याच मनुचीने महाराज आग्रा नजरकैदेत असताना मीरहसन नावाचा चित्रकार स्वतःचे पत्र देऊन पाठविला व महाराजांचे जगातील पहिले चित्र एका मुसलमान चित्रकाराने रेखाटले. अर्थात याच चित्रामुळे संपूर्ण जगाला आणि आपल्याला आपले राजे कसे दिसत होते हे कळले. त्यामुळे ही भेट व हा दिवस फार मोलाचा आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जून १७३२
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी तंटा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जून १७५३
बादशहा व वजीर या दोघांनी एकमेकांविरुद्ध लढाई पुकारली. राजधानीतील सरदार बादशहास मिळाले. वजिराने राजेंद्रगीर गोसावी व सुरजमल जाट यास फौजेसह मदतीस बोलावले. दोन्ही सैन्याच्या लढाया झाल्या. त्या राजेंद्रगीर गोसावी दिनांक १२ जून १७५३ रोजी मारला गेला. बादशहाने वजीरीची वस्रे गाजीउद्दीन इमादुल्मुल्क यास दिली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
१२ जून १७६०
तर पानिपत झालेच नसते...
अब्दाली दिल्लीची सत्ता ताब्यात घेण्यात उत्सुक नव्हता. त्याला परत जायची घाई होती. त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत तहही झाला. "अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे - होळकरांनी हाफिज रहमतखानाच्या मार्फत तोड ठरवली कि, नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेऊन अब्दालीला अब्दालीस मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) व हिंगणे ( पेशव्यांचा दिल्लीतील वकील ) यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा शिंदे - होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाट देखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर १३ मार्च सुमारास अब्दाली - मराठे यांच्यात तह घडून आला. पण उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी येतांच नजीब घाबरला. अब्दाली छावणी उठवून निघालेला असताना, नजीबने त्यास येथेच रहाण्याची गळ घातली. परिणामी वरील करार फिसकटला. असे असले तरी मराठी सरदारांनी तहाची बोलणी सुरुचं ठेवली होती. १२ जून रोजी मल्हारराव होळकर लिहितात, " गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी ( बहुतेक गंगोबा तात्या ) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. श्रीमंतही संनिध आले."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जून १७९२
महादजी शिंदे पुण्यात पोहोचल्यावर १२ जून १७९२ ला त्यांनी कारभाऱ्यानच्या भेटी घेऊन बादशाह शाह आलमने दिलेल्या वकील इ मुत्लक बहुमान व त्याच्या बरोबरील मान सन्मान सवाई माधवरावास देण्या विषयी चर्चा केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जून १८५७
साताऱ्यातील उठावाची सुरुवात झाली
१८३८ साली प्रतापासिंहाना पदच्युत केल्यावर या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी रंगो बापुजी गुप्ते समुद्रमार्गे इंग्लंडला गेले. प्रतापासिहांना त्यांचे राज्य परत मिळावे म्हणून त्यांनी चौदा वर्षे अथक प्रयत्न केले. शेवटी निराश होऊन ते १८५४च्या फेब्रुवारीत परत आले. नंतर दीड वर्षे वेगवेगळ्या लोकांना भेटून ते योजना बनवत होते. नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांच्याशीही त्यांनी संधान बांधले. आपला पुतण्या वासुदेव याला ५०० सैनिकांनीशी पेशव्यांच्या मदतीला पाठवले.
१८५६ ते ५७च्या दरम्यान माणसे, पैसे व युद्धासाठी साहित्य मिळवण्यासाठी ते फिरत होते. सैन्यात भरतीसाठी त्यांनी येनावडे, वाठार, देऊर, वर्धनगड वारुगड आर्वी, कळंबी, कराड, आरळे अर्जुनगड येक्मुल्ली, जकातवाडी फलटण व जिल्ह्याबाहेरही केंद्रे सुरु केली. गुप्त्यांचे मख्य ठाणे सातारा मेढा रस्त्यावर हम्दाबाद (अहमदाबाद) येथे होते. सातार्यात मंगळवारात बालाजी शिप्याचे घर, कृष्णेश्वराजवळ गोसावी वाडा, विठोबाच्या नळाजवळ सखाराम कबाडे यांचे घर हि केंद्रे होती. त्यांना पुढील साथीदार मिळाले. सातारचे तात्या फडणीस, कर्हाडचे दौलत पवार, रंगो बापूजींचा मेहुणा अण्णा चित्रे, मुलगा सीताराम, भोरमधील शेट्ये बंधू, सातारा येथील बाविसाव्या पलटणीला दप्तरदार गणेश कारखानीस, जकातवाडीचे सोनार हरी देवरुखे यांच्या बरोबर बोलून कामे वाटून देण्यात आली. पोलिसात व इंग्रजी सैन्यात फितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारुगोळा तयार करणे अशी वाटणी झाली. स्वतः रंगो बापूजीं सज्जनगडावर सहा आठवडे होते. तेथील मांग व रामोशी यांना सैन्यात भरती करून घेत होते. रामोशांचा पुढारी सत्तू रामोशी मांगांचा पुढारी बाबिया , योरीया , मल्या मांग शिवराम कुलकर्णी यांना रंगो बापूजीं यांनी बंडात सामील करून घेतले. रंगो बापूजीं सज्जनगडावर भोरच्या तुकडीची वाट पाहत होते. अप्पा ऐतवडेकरानी ८०० तोफ गोळे तयार केले.
सातारा तुरुंगावरील पहारेकरी मानसिंग सैन्यात फितुरी करून दारुगोळा मिळवणार होता भोरमध्ये दारूगोल्याची जय्यत तयारी केली होती. कोल्हापूरच्या चीमासाहेबांशी संपर्क झाला होता. सातारच्या राण्यांची व बोवासाहेब शिर्के या पोलिस प्रमुखांची समती मिळवून ठेवली होती. उत्तर हिदुस्थानात १२ जून १८५७ हि बंडाची तारीख ठरवण्यात आली होती. तोच मुहूर्त सातारच्या बंडासाठी ठरवण्यात आला. गोसावी वाड्यात शेवटची बैठक होऊन दुध भात साक्षी ठेवून सर्वांनी शपथ घेतली.
तात्कालीन धेय्य असे होते. सातारा, यवतेश्वर व महाबळेश्वरचे इंग्रजी सैन्य कापून काढणे, तुरुंग फोडून ३०० कैदी मुक्त करणे. इंग्रजांच खजिना लुटणे, सातारच्या गाडीवर प्रताप सिंहाचा दत्तक मुलगा शाहू याला बसवून छत्रपतींची राजवट सुरु करणे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
१२ जून १८९६
इंग्रज अधिकारी लाँर्ड लँमिंग्टन याने किल्ले रायगडला भेट दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.
जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री 🚩
Comments
Post a Comment