२३ जून १८१७बेलापूर किल्ला२३ जून १८१७ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता होती व त्या नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२३ जून १५६४
गोंडवानाची महाराणी, राणी दुर्गावती
२३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या (मूळ नाव सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां) नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली ( या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते) जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले. राणीचेही मोठे नुकसान झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२३ जून १६६१
हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल
इंग्रज आणि डच पोर्तुगीजांना जड जाऊ लागले. इंग्रजानी तर पोर्तुगीांचा सर्वत्र पिच्छा पुरविला होता. त्यांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजाना कठीण गेल्याने त्याना समेट करावा लागला. इ. स. १६६१ साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरिना ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याला देण्याचे ठरविले. दि. २३ जून १६६१ या दिवशी विवाहाचा करार पार पडला. पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल केले. शिवाय वीस लक्ष पोर्तुगीज 'कुझादश्' आणि आफ्रिकेतील 'टंजियर' शहरही दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२३ जून १६८५
गोव्यातील किल्ले फोंडाच्या लढाईत "सरदार येसाजी कंक" यांचा मुलगा "कृष्णाजी कंक" यांनी अफाट पराक्रम गाजवला आणि कंक घराण्याची परंपरा जपली.
या युद्धात "कृष्णाजी कंक" धारातिर्थी पडले, यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी "भोर" तालुक्यातील "भुतोंडे" या त्यांच्या गावी जाऊन "कंक" घराण्याचे सांत्वन केले.
याच वेळी "कृष्णाजी कंक" यांचा मुलगा "चाहुजी कंक" यास सुभेदारी देऊन कारभारी नेमले. यासाठी १५० हशम, १० भोई, ३० दिवटे दिले.
आणि स्वराज्याचे ज्येष्ठ सरदार म्हणून "येसाजी कंक" यांस पालखीचा मान देऊन दरसाल ४००० होन देण्याचा आदेश छत्रपती संभाजी राजेंनी दिला.
सदर पत्राद्वारे छत्रपती शंभू यांचा आपले सैन्य आणि आपल्या सैनिकांप्रती असलेला जिव्हाळा दिसून येतो.
त्यासाठीचे प्रस्तुत २३ जून १६८५ रोजी लिहिलेले नेमणुकीचे पत्र सही शिक्क्या निशी लिहून दिलेले स्मरणीय आहे.
सदर पत्रात छत्रपती संभाजी महाराजांचा शिक्का आरंभी व शेवटी लेखनालंकार ही त्यांची स्वतःची अक्षर होत.
त्याकाळी हल्ली प्रमाणे सही करीत नसत.
पत्रामध्ये मोर्तब हे दप्तरी पत्र बार झाल्याचा उल्लेख शेवटी आहे.
याचबरोबर पत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे मुख्य प्रधान नीलकंठ मोरेश्वर पिंगळे यांचा ही शिक्का सदर पत्रावर आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२३ जून १७०८
बादशहाचा शाहुंवर लोभ, बहादुरशहाचे शाहूंना पत्र
या पत्रावरून ताराबाई ही बादशाही संरक्षण व मान्यता मिळवण्याची खटपट करत होती हे दिसते. ताराबाई ही संपुर्ण स्वातंत्र्याची पक्षपाती व शाहू मात्र बादशाही अंमला खालील स्वराज्याचा पक्षपाती अशी कल्पना या पत्राने निर्मूल ठरते.
पत्र असे:-
सर्व शुरात श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर, इस्लामी धर्मरक्षकाचे पुत्र राजे शाहू याणि पातशाही कृपेने संतोषी होऊन जाणावे की तुम्हाकडे रायभान वकील यांनी विनंती केली जे तुम्ही आपल्या जहागिरीचे म्हणाली आल्यानंतर इकडे यावयाचे इरादा केला आहे याच करिता राणीने(ताराबाईने) जमीदारीचा (वतनदारीचा) फर्मान (बादशाही सनद) मिळावा म्हणोन कृत्रीमाने (वरपांगीपणाने) अर्जी लिहिली होती. तिला व तिचे चिरंजीवास कपटी समजोन त्याचे उत्तर दिले नाही, कारण की, आमचे मूलकातील राज्य व जमीनदारी तुम्हाकडे असावी आसनी तुम्ही आपले वडिलांप्रमाणे तेथे कायम रहावे. नंतर जे किल्ले थोर पादशाहीतील त्यावेळेस हाती आले नउते तेही फौज पाठवून घ्यावे. जाणोन तुम्ही आत्मिक (आमचे) असे समजोन हा फर्मान पंजासुद्धा (तळहाताचा ठसा) लिहिला आहे. तरी तुम्ही आपले फौजेसुद्धा जलद येथे येऊन पोहोचणे.म्हणे तुम्हावरील कृपा आणि लोभ वारंवार उत्कृष्ट होईल.छ४ माहे रबीलाखर सन १ जुलूस ८.
वर उल्लेख केलेले पत्र २३ जून १७०८ ला बहादुरशाह ने शाहू महाराजांना लिहिले आहे. म्हणजे कामबक्ष वर विजय मिळविण्यापूर्वीच ताराराणीनि बहादुरशाह कडून सनदा मिळविण्याचे प्रयत्न केले होते.त्यामुळे सनदांच्या बाबतीत इ.स.१७०८ नंतर शाहुपक्ष व ताराराणी पक्ष असा भेदभाव करण्याचे काही कारण नाही.
बादशाही सनदांचे महत्व ( implications ) ताराराणींच्या लक्षात आले होते, म्हणून त्या सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील होत्या. असे जर नसते तर छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर देखील सतत सात वर्षे औरंग्जेब्सारख्या बलाढ्य आणि धूर्त शत्रूविरुद्ध लढणाऱ्या ताराराणीस औरंगजेबच्या दुर्बल पुत्राकडे सनदा मागण्याची काय गरज होती ?
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२३ जून १७५७
प्लासीची लढाई
जून २३, इ.स. १७५७ रोजी झालेली ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यांमधील लढाई होती. ह्या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती. ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती व बंगालचा मोठा प्रांत ब्रिटीश अखत्यारीत आला व इंग्रजांचे भारतावर अधिकृत रित्या राज्य चालू झाले जे पुढील १९० ( १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत) वर्षे टिकले. ह्या राज्याची सुरुवात ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी या नावाने होती. ही लढाई कोलकाता पासून साधारणपणे १५० किमी वर भागीरथी नदीच्या काठी पलाशी गावाच्या नजीक झाली.
ही लढाई खरेतर युरोपातील इंग्रज व फ्रेंच चढाओढीमुळे झाली होती. १७५६ ते १७६३ मध्ये इंग्रज फ्रेंचात युद्ध झाले त्यामध्ये शत्रुत्वापोटी फ्रेंच इस्ट इंडिया कंपनीने ब्रिटीशांविरुद्ध लढण्यास फौज पाठवली होती. फ्रेंचांनी सिरज उद दौला ची इंग्रजांविरुद्ध लढण्यास मदत मागितली. सिरज उद दौलाची फौज इंग्रजांपेक्षा मोठी होती. त्यामुळे पराभवाच्या भितीने इंग्रजांनी सिरज उद दौलाचे विरोधकांना आपल्या बाजूने वळवले. मीर जाफर जो सिरज उद दौलाचा माजी सेनापती होता त्याने लढाईच्या भूमीजवळ राहून लढाईत भाग न घेता इंग्रजांच्या विजयात हात भार लावला. सिरज उद दौलाचा पराभव झाला व सरतेशेवटी इंग्रजांच्या हाती पडल्यावर ठार मारण्यात आले. मीर जाफरला इंग्रजांनी आपल्या हातचे बाहुले बनवून नवाब बनवले. या विजयाने संपूर्ण बंगाल प्रांत इंग्रजांच्या हाती आला.
या लढाईने ब्रिटीशांच्या अशिया खंडातील साम्राज्याचा पाया घातला. बंगाल काबीज करताच राजकोषातून ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणावर संपत्ती हाती पडली. तसेच बंगालच्या सुपीक प्रांतावर अनेक प्रकारचे कर लादून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमवण्यास सुरुवात केली याचा फायदा त्यांना आपली लष्करी ताकद वाढवण्यात झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२३ जून १७६१
बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेब पेशवे यांचे पुण्यातील पर्वतीवर निधन
नानासाहेब हे साताऱ्याच्या शाहू महाराजांचे तिसरे पेशवे होत. इस १७१३ मधे पिंगळे घराण्याकडुन मूळ श्रीवर्धनच्या भट घराण्याकडे पेशवाईची परंपरा चालू झाली.
बाळाजी विश्वनाथांनंतर १७२० मधे थोरले बाजीराव पेशवे झाले. १७४० मधे बाजीरावांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा बाळाजी यांना दरबारातील लोकांचा विरोध पत्करुनही शाहूमहाराजांनी पेशवेपद दिले. बाजीरावांना पेशवे करतानाही असेच काहीसे झाले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२३ जून १८१७
बेलापूर किल्ला
२३ जून १८१७ पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता होती व त्या नंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला , इंग्रजांच्या काळात हा किल्ला Bombay Presedinsy अंतर्गत येत होता १८१७ नंतर या किल्ल्याला उतरती कळा लागली आणि आज तो कसा बसा काही बांधकामाच्या अवशेषांच्या स्वरूपात मोडकळीस आलेल्या बुरुजाच्या स्वरूपात सिमेंटच्या जंगलात कसा शेवटच्या स्वरूपात आपल्याला पहायला मिळतो.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.
जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री 🚩
Comments
Post a Comment