९ जुन १६६१महाराजांचा महाड येथे मुक्काम !
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जून १६५९
९ जून १६५९ रोजी औरंगजेबाने दारा शिकोह याला कैद केले. कैदी दाराला पकडल्या गेल्यानंतर पूर्ण कल्पना होती की आपण मारले जाणार आहोत. दाराला देहांताची शिक्षा देण्यापूर्वी औरंगजेबाने त्यास निरोप पाठवून असे विचारले की, "दैव आज तुला जितके प्रतिकूल झाले आहे , तितकेच अनुकूल झाले असते. आणि मला (औरंगजेबाला) तू कैद केले असतेस तर तू काय केले असते..?
यावर दाराने राजपुत्र या दृष्टीने आपल्या व्यक्तित्वास साजेसे उत्तर दिले... "अशी परिस्थिती आली असती तर (मी) तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार दरवाजांच्या पुढे उघडे फेकून देण्यास सांगितले असते"
हे उत्तर कळविल्यानंतर औरंगजेबाने दारास देहांताची शिक्षा फर्मावली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जुन १६६१
महाराजांचा महाड येथे मुक्काम !
महाराजांनी कुडाळकर सावंतांकडे दुर्लक्ष केले व ते किल्ले राजगडाकडे जाण्यासाठी पुढे निघाले. महाराज महाडला पोहोचले. महाड येथे मुक्काम सुमारे २ दिवस होता. राजापुरचे सुभेदार रावजी पंडितही महाराजांच्या आज्ञेनूसार तीथे आले होते. राजापुरला जे इंग्रजेतर पर्शियन, अरबी व इतर कैदी महाराजांच्या ताब्यात होते त्यांच्या बंदोबस्ताची योग्य त्या खंडणीच्या मोबदल्यात त्यांची सुटका करण्याची जबाबदारी महाराजांनी रावजींवर सोपविली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जून १६८०
दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास (अहिवंतगड) वेढा घातला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जून १६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी गुजरात सीमेवरील "खंबायत" व "रामनगर" जिंकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जून १६९६
छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जून १७१६
बंदा सिंह बहादूर पुण्यतिथी
बाबा बंदा सिंह बहादूर यांच्या विषयी आपणास खूपच कमी माहिती असेल. पण ते एक असे शूर योद्धा होते ज्यांनी मुघलांच्या विरुद्ध लढा दिला.
(जन्म २७ ऑक्टोबर १६७०)
मुघलांशी लढा देताना फररुखशियार याने त्यांना कैद केले. त्यांना दिल्ली ला आणले गेले आणि त्यांचा अतोनात छळ करून त्यांना ९ जून १७१६ला शरीराचे तुकडे करून मारले गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
९ जून १९००
बिरसा मुंडा पुण्यतिथी
(जन्म - १५ नोव्हेंबर १८७५)
आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला.
बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा वापर केला. बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यासाठी इंग्रजांकडून ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लालसेपोटी मनमारू व जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची बातमी इंग्रजांना दिली. ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसांना पकडण्यात आले.
रांची येथे कैदेत असताना इंग्रजांनी त्यांचा अतोनात छळ केला. तेथेच त्यांचे निधन झाले.
रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.
जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री 🚩
Comments
Post a Comment