आता पर्यंत झाकून ठेवलेला "तामिळनाडू मधील तंजावरच्या मराठा साम्राज्याचा भव्य दिव्य इतिहास " :-

आता पर्यंत झाकून ठेवलेला "तामिळनाडू मधील तंजावरच्या मराठा साम्राज्याचा भव्य दिव्य इतिहास " :-

1 छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले मराठा राजे होते.

2  शहाजी राजांनी ही सत्ता व्यंकोजी राजे यांना मिळवून दिली होती.
चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला हा मराठा साम्राज्याचा भाग होता.

3 तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण 180 वर्षे टिकून होते. 180 वर्षात एकूण 10 राजे होऊन गेले.

4 सन 1832 मध्ये तिसरे शिवाजी यांची सत्ता ब्रिटिशांनी बरखास्त केली. हे तंजावरचे शेवटचे मराठा राजे होत.

5 सातारा, कोल्हापूर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक आहे.

6 तंजावरच्या मराठा राजवटीतील सर्वात शूर व विद्वान राजा म्हणजे पहिले "सरफोजी" होय.

7 तंजावरचे मराठा साम्राज्य विद्वत्ता व कला संपन्न होते.

8 तेथील मराठा राजांनी 50 हून अधिक विविध विविध ग्रंथ लिहिले असून, त्यात 12 दर्जेदार नाटके आहेत.

9 यातीलच एक मराठी नाटक रंगमंचावर तंजावर येथे सादर केले गेले, ते रंगमंचावरील पहिले मराठी नाटक होय.

10 राजा चोळ याने बांधलेल्या बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिराच्या भींतीवर मराठा राजांनी मराठा साम्राज्याचा जगातील सर्वात मोठा मराठी शीलालेख कोरला आहे.

11 भारतातील पहिला छापखाना राजे सरफोजी यांनी तंजावर येथे सुरू केला.

12 कवी परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार लिहिण्यास सुरुवात केलेला "शिवचरित्र" ह्या मुळ ग्रंथाची अस्सल प्रत येथे आजही आहे.

13 भारतातील मुलींची पहिली शाळा राजे सरफोजी यांनी तंजावर येथे काढली.
मराठा राजांनी भरतनाट्यम या नृत्याला राजाश्रय दिला होता.

14 मराठा राजांनी मराठी सण, उत्सव, व्रत, कला ई. तंजावर मध्ये रूजविले.

15.तसेच सरफोजी यांनी भव्य ग्रंथालय उभारले आहे. सदरील पोस्ट आपण आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची या पेजवर वाचत आहात त्यात युध्दशास्त्रा पासून वैद्यकशास्त्रा पर्यंत पशू, पक्षी, आरोग्य, अर्थ, कला, ज्यातिषशास्र, वास्तूशास्र, बांधकामशास्त्र ईत्यादी विषयावर हजारो ग्रंथ येथे आहेत. एकूण ग्रंथ संपदा 3 लक्ष एवढी आहे.

16.तंजावरच्या या ग्रंथालयात एक ग्रंथ असा विस्मयचकित करणारा आहे, त्याच्या ओळी उजवीकडून वाचल्या तर "रामायण", डावीकडून वाचल्या तर "महाभारत" आणि "वरून खाली वाचल्या तर "श्रीमदभागवत" आहे.

17.ताडाच्या, पामच्या झाडाच्या पानावर लिहिलेले पुरातन ज्योतिष शास्त्र व इतर ग्रंथ तंजावरच्या मराठा राजांनीच जतन करून ठेवलेले आहेत.

18.तंजावरच्या भोसले संस्थानने सन 1962 च्या चीन युद्धाच्या वेळी 2000 किलो सोने भारत सरकारला मदत म्हणून दिले होते.

19. तसेच 1971 च्या पाकिस्तान युद्धात भारत सरकारला मदत म्हणून शस्रास्र दिली होती.
विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला 100 एकर जमीन दान दिली होती.

20. तंजावर मध्ये आजही सुमारे 5 लक्ष मराठी लोक राहतात, ते पेहराव तामिळी घालत असले तरी ते घरात तोडकी मोडकी मराठीच बोलतात.

21.असे आहेत तंजावरचे मराठा राजे. ही माहिती, दिनांक 1 मे 2015 रोजी ABP माझा वर दाखविण्यात आलेल्या कार्यक्रमावरून संकलित केले. हा ऐतिहासिक लेख आवडल्यास अवश्य व शेअर करा आणि असे दर्जेदार लेख मिळवण्यासाठी आमचे आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा :
╭═════════════------------------╮
    
        📿📿। ।  ।। 📿📿 
╰══════════════---------------╯

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४