२८ मार्च १६७०मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ मार्च १६७०
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ मार्च १६७०
मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२८ मार्च १७३७
बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment