८ मार्च १६७०पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १५४६
पोर्तुगीज राजाकडून गोव्याच्या गव्हर्नरला एक फर्मान आले. ते फर्मान असे. 'गोव्यातील हिंदूंच्या मूर्तींचा नाश करा. त्यांची देवळे पाडा. हिंदूंना धार्मिक उत्सव करण्यास बंदी घाला. ब्राम्हणांना गोवे प्रांताबाहेर हाकलून द्या. सरकारी अधिकाराच्या जागा फक्त जे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांनाच द्या.' 
ह्या फर्मानाची ताबडतोब अंमलबजावणी झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १६७०
पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला.
ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १६७३
नरवीर कोंडाजी फर्जंद...🚩
इ.स ८ मार्च १६७३ रोजी रायगड येथे कोंडाजींनी पन्हाळा फत्ते केल्याची बातमी जासुदामार्फत कळाली कोंडाजींच्या शूरत्वाची बातमी समजताच छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर दाखल झाले कोंडाजींची पन्हाळगडावरील तीन दरवाजा नजीक असलेल्या तुपाच्या विहिरी जवळ त्यांनी गळाभेट घेतली छत्रपतींनी कोंडाजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षिसी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोंडाजींनी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांना मोलाची साथ दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १६८९
मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी छत्रपती राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १७३१
मराठ्यांनी बाजीरावच्या नेतृत्वाखाली निजामाचा सुरतेजवळ पराभव केला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १७५८ 
बादशहा आणि अब्दाली दोघांचे कंबरडे मोडायचे या हेतुनेच जंगी तयारी करुन रघुनाथराव पुण्याहुन निघाले. आधीच्या स्वारीचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. यावेळी दिल्ली शहरात आणि तिथल्या कारभारात गूतुन न राहता त्यांनी पंजाबात वायव्येच्या दिशेने मुसंडी मारली. पंजाबाच्या एकेक नद्या पार करीत सरहिंद येथे अब्दालीच्या समदखान या सरदाराचा ८ मार्च १७५८ ला पराभव केला. त्याहीपुढचा भीमपराक्रम म्हणजे लाहोर, मुलतान हे प्रांत काबीज करुन थेट सिंधु नदी गाठली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १७७१
हैदर आणि मराठे यांच्यात प्रसिध्द अशी मोती तलावाची लढाई झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

८ मार्च १७७९
इष्टुर फाकड्यास मारून तळेगावावर इंग्रजांस जेर करणारा शूर पुरुष भिवराव पानसे तोफखान्याचा कामदार थोडा ताप येऊन एकाएकी मरण पावला.......``
मराठेशाहीत तीन व्यक्तींचा फाकडा ( पराक्रमी,शूर,वीर) म्हणून उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात केलेला आढळतो. इष्टुर शिवाय मानाजी शिंदे व कोन्हेर त्रिंबक एकबोटे हे अन्य फाकडे आहेत 
जेम्स स्तुअर्ट ला त्याच्या पराक्रमामुळे कौतुकाने फाकडा म्हटले जाते. रणांगणात शत्रूने दाखविलेल्या पराक्रमाला दिलदारपणे दिलेली ति दाद आहे अण कि शत्रूचे कौतुक !

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

पानिपत आणि रहिमतपूरकर माने