Posts

Showing posts from August, 2022

मराठ्यांचे प्राचीनत्व ? 96 कुळी म्हणजे काय आहे ?

मराठ्यांचे प्राचीनत्व ? 96 कुळी म्हणजे काय आहे ? 96 कुळी म्हणजे काय आहे ? ९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक , कुळ आणि गोत्र जाणून घ्या 1. गोत्र – आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र…. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र,जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती…. 2. देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते… वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी. 3. वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत. १. सोमवंश २. सुर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येवून आपला समूह निर्माण केला ती कुळे ९६ आहेत… या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे .[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा] १. अहिरराव Ahirrao सुर्य… भारद्वाज … पंचपल्लव २. आंग्रे Angre चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव ३. आंगणे Angane चंद्र…दुर्वास … कळंब, … केतकी… हळद… ,सोने ४. इंगळे Ingale चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख ५. कदम Kadam सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद… सोने ६. काळे Kale सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख ७. काकदे Kakade सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफ

|श्री दत्तात्रेय स्तोत्र||

||श्री दत्तात्रेय स्तोत्र|| जटाधरं पाण्डुराङ्गं शूलहस्तं कृपानिधिम् । सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ॥ १॥ अस्य श्रीदत्तात्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारदऋषिः । अनुष्टुप् छन्दः । श्रीदत्तपरमात्मा देवता । श्रीदत्तप्रीत्यर्थे जपे विनियोगः ॥ जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहार हेतवे । भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ १॥ जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च । दिगम्बरदयामूर्ते दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ २॥ कर्पूरकान्तिदेहाय ब्रह्ममूर्तिधराय च । वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ३॥ र्हस्वदीर्घकृशस्थूल-नामगोत्र-विवर्जित । पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ४॥ यज्ञभोक्ते च यज्ञाय यज्ञरूपधराय च । यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ५॥ आदौ ब्रह्मा मध्य विष्णुरन्ते देवः सदाशिवः । मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ६॥ भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे । जितेन्द्रियजितज्ञाय दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ७॥ दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपध्राय च । सदोदितपरब्रह्म दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ८॥ जम्बुद्वीपमहाक्षेत्रमातापुरनिवासिने । जयमानसतां देव दत्तात्रेय नमोऽस्तुते ॥ ९॥ भिक्षाटनं गृहे ग्र

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२९ आॅगस्ट १६६६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२९ आॅगस्ट १६६६* आग्र्याहून सुटकेनंतर मुघल सैन्याने "घोलपूर" जवळ ३ व्यक्तींना संशयित म्हणून अटक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२९ आॅगस्ट १६८२* छत्रपती संभाजीराजांसोबत असणारा स्वराज्याचा इमानी सेवक "परशुराम जोगी" याला मुघल सरदाराने फीतुरी करून "साल्हेर किल्ला" मुघलांना देण्याची सूचना केली. पण "साल्हेर" स्वराज्यात सुरक्षित. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२९ ऑगस्ट १७०९*                               श्री                                   देव स्वस्तिश्री श्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी नाम संवत्सरे भाद्रपद शुद्ध शष्टी इंदूवारस क्षेत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी राजश्री सरदारांनी पागा व शिलेदार (सिलेदार) व हवालदारांनी व कारकुणांनी व लोकांनी किलेहाय व माहालनिहाये व बाजे यास आज्ञा केली ऐसी जे श्री वास्तव चिंचवड यास मौजे चिखली तालुका हवेली प्रांत पुणे हा गाव कुलबाबा कुलकानू हालीपटी पेस्तरपटी देखील सरदेशमुखी सावोत्रा व सरपाटीलकी व सरगौडकी इनाम आहे ऐशस श्रीचा इनाम बिलाकुसूर चालवणे स्वामीस अगत

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३१ ऑगस्ट १२००*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ ऑगस्ट १२००* महाराज जैतूगीदेव यांचे निधन जैतूगीदेव हे महाराज चक्रवर्ती सिंघणदेव यांचे वडिल जैतूगीदेव होते. तर आजोबासाहेब भिल्लमदेव हे चालुक्यांचे सामंत होते. महाराज भिल्लमदेव यांनी ११८७ मध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करुन सेऊन साम्राज्याची स्थापना केली, त्यांनी ११८७ मध्ये देवगिरि येथे किल्ला बांधला आणि देवगिरिला आपली राजधानी बनवली, ११८८ मध्ये त्यांनी गझनीचा सुलतान घियथ अल-दीन मुहम्मदचा सेनापती महम्मद गोरी याला महाराष्ट्राच्या सीमेवरुन पिटाळून लावले होते. त्यांनी ११८७ - ११९१ पर्यंत महाराष्ट्रवर राज्य केले होते, ११८९ मध्ये त्यांनी सूरातूर येथे झालेल्या लढाईत होयसळ शासक बल्लालाचा पराभव केला होता, ११९१ मध्ये ते युद्धात बल्लाल सोबत लढता लढता विरगतित मरण पावले होते. त्यांच्या नंतर त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव हे राजे झाले, त्यांनी ११९१-१२०० पर्यंत राज्य केले होते. तिथे दुसरी कडे उत्तर भारतात मोहम्मद गोरीने घियथ अल-दीन मुहम्मद याच्या साठी ११९२ मध्ये निर्णायकपणे अजमेरचे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला, मंग यानंतर त्याने क

*महाराष्ट्रातील किल्ले* *🎯 सागरगड किल्ला 🎯*

* महाराष्ट्रातील किल्ले *         * 🎯  सागरगड किल्ला 🎯 * ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ * स्थळ * : अलिबाग, जि.रायगड * प्रकार * : गिरिदुर्ग * उंची * : १३५७ फूट * डोंगररांग * : सह्याद्री * जवळचे गाव * : खंडाळे मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करण्या सारखा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ खेडदुर्ग. अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टीच्या राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खांदेरी, कुलाबा, सर्जेकोट या किल्ल्यांची निर्मिती करे पर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्याच्या रक्षणाची भिस्त होती. या किल्ल्याचे नाव सागरगड असले तरी समुद्रकिनाऱ्यापासून हा किल्ला ५ मैल दूर आहे. * इतिहास * : सागरगड हा बहामनी सुलतानांच्या काळात बांधला गेला. १६६० मध्ये शिवाजी महाराजांचे सरदार दोरोजी यांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे २३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा समावेश होता. आगऱ्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी १६७०-१६७२ या काळात सागरगड पुन्

थोर गाणपत्य श्रीमोरया गोसावी यांच्या वंशावळीतील श्री.धरणीधर देव यांची इसवी सन १८३९ सालातील मोडी कागदावरील सही.

Image
थोर गाणपत्य श्रीमोरया गोसावी यांच्या वंशावळीतील श्री.धरणीधर देव यांची इसवी सन १८३९ सालातील मोडी कागदावरील सही. सदर्भ राज मेमाणे याच्या वाल वरून 

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२५ आॅगस्ट

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ आॅगस्ट १६७४* गोव्यातील "किल्ले फोंडा" वर मराठ्यांचा हल्ला. पण काही चुकीच्या धोरणामुळे हा प्रयत्न फसला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ आॅगस्ट १६७६* "किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ ऑगस्ट १८०५* यशवंतराव होळकर इंग्रजांच्या लष्करी हालचालींच्या बातम्या काढीत होते. इंग्रजानाही भरतपूरच्या लढाईनंतर आपल्या फौजेची जुळवाजुळव करण्यास सवड हवी होती. पण त्यांना यशवंतरावांचा पिच्छा सोडावयाचा नव्हता. यशवंतराव त्यांचा सदर हेतू ओळखून होते. पंजाब हा त्यानी दौडीचा प्रदेश ठरवून पंजाबातील शीख व त्यांच्या पलिकडील अफगाण यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरु होता. दिनांक २५ ऑगस्ट १८०५ रोजी यशवंतराव राजस्थानच्या बाजूस, दिल्लीच्या अलिकडे असलेल्या रेवाडी नांवाच्या गांवाहून निघाले. मीरखान तीन चार दिवस मागे राहिला होता. शिंद्यांना सामील करून घ्यावे या उद्देशाने तो रेवाडीहून हालला नाही. यशवंतरावानी शिखांशी संधान बांधून त्यांना अनुकूल करून घेतले होते

मातृदिनाची..मातृवंदनाची* *आज पिठोरी अमावस्य

                *मातृदिनाची..मातृवंदनाची*          *आज पिठोरी अमावस्य         *आजवर जगात कित्येक संस्कृती आल्या आणि काळाच्या उदरात गडप झाल्या. पण सनातन भारतीय संस्कृती अबाधीत आहे आणि राहणार आहे. याचे कारण या संस्कृतीत असलेली 'मातृदेवो भव' भावना. आई मग ती कुणाचीही असो मनात पवित्र भावना निर्माण होतात*          *आज मातृदिन. आज सर्व प्रथम वंदन त्या वाघाचे दात मोजणाऱ्या पराक्रमी भरताला जन्म देणाऱ्या शकुंतला मातेला. या भरतामुळेच या देशाची ओळख 'भारत' म्हणून आहे.*         *सृजनाचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त आहे तो मातेला.. तो तिच्या अपूर्व त्यागामुळेच. बाळाला जन्म देताना जिवघेण्या कळा.. कोंडलेला श्वास यामुळे तिचा पुनर्जन्म ठरतो. पण तरीही बाळावर आनंदाश्रूंचा अभिषेक करणारी ही जगन्माता. मुलांच्या सुखात स्वसुख मानणारी.. क्षमाशील, पराकोटीच्या त्यागाने जन्म खर्चिणे ही या मातेची मनोवृत्ती. पहिल्या गुरुचा सन्मान मातेचाच. ती आई झाली की देवकी असो वा यशोदा, मायेचे स्वरुप मात्र तेच असते.*         *आईचे उपकार एका जन्मात फेडणेच अशक्य. जगात विकत न घेता येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आईचे निर्व्याज्य प

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२६ आॅगस्ट

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ आॅगस्ट १३०३* अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले - राणी पद्मावतीचा जोहर  शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे शंभर सव्वाशे वर्षे पर्यंत चितोडच्या राजांना बरीच विश्रांती मिळाली. गुलामवंशी  सुलतानांनी त्यांना फारसा उपद्रव दिला नाही .परंतु अल्ला-उद्दीन खिलजी यांची सर्वव्यापी दृष्टी त्यांना फार दिवस चुकवता आली नाही. राणा लक्ष्मणसिंह चितोड येथे राज्य करीत होते. त्यांचे काका रतन सिंह यांनी रुपवती कन्या पद्मावती यांच्याशी विवाह केला होता. पद्मावतीच्या सौंदर्याची किर्ती अल्लाऊदिन खिलजी याच्या कानावर पडली. पद्मावतीला मिळवण्यासाठी अल्लाऊदीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. लढाईत राजा रतनसिंह यांना वीर मरण आले. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून, राणी पद्मावतीनेआपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पेटत्या अग्नीकुंडात उड्या टाकून राणी पद्मावतीने १६०० स्रियासह अग्नीत प्रवेश केला तो दिवस होता २६ आॅगस्ट १३०३ पद्मावती जोहार करून अजरामर झाली, आणि अल्लाऊदिन खिलजी राखेचे ढीग तुडवीत किल्ल्यावर फिरत राहिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ ऑगस्ट १४९८* १४८४ साल

आयुष्य आपोआप सहज आणि सोपे होईल

आयुष्य आपोआप सहज आणि सोपे होईल आपल्या नियंत्रणामध्ये ज्या गोष्टी आहे तिथे आपण प्रयत्न नक्की करायचे पण ज्या गोष्टी नियंत्रण बाहेर आहे त्या स्वीकार करायच्या मित्रांनो या गोष्टीवरून आपल्याला आयुष्याचा खूप मोठा धडा शिकायला मिळतो.

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या उपरांगापैकी अजंठा सातमाळ या डोंगररांगेवर चांदवड तालुक्यात वसलेला “मेसना किल्ला”...🚩

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या उपरांगापैकी अजंठा सातमाळ या डोंगररांगेवर चांदवड तालुक्यात वसलेला “मेसना किल्ला”...🚩 चांदवड हे प्राचीन काळापासून इतिहास प्रसिध्द राजधानीचे गांव अनेक ऋषी मुनींचे आश्रम या परिसरातील शिखरांवर होते अगस्ती ऋषी काही काळ चांदवड परिसरात वास्तव्यास होते नंतरच्या काळात ते अंकाई किल्ल्यावर आश्रम करुन राहीले... नाशिक जिल्हा म्हणजे दुर्गांची खाण सह्याद्रीच्या रांगांबरोबरच अजंठा-सातमाळा सालबारी डोलबारी अशा अनेक पर्वतरांगांमध्ये अनेक गडकोट त्या त्या काळात निर्मीले गेले त्यापैकी सातमाळा रांगेतले किल्ले त्यांच्या वैशिष्ट्य पूर्ण अवशेषांबरोबरच प्रचंड मोठा इतिहास असल्याने अनेकांच्या आवडीचा विषय आहेत याच रांगेतील चांदवड परिसरातील धोडप इंद्राई राजधेर या किल्ल्यांवर भटके दुर्गप्रेमी तर सदैव जातात परंतु मेसनखेडे असूनही विविध कालखंडात राहिलेल्या अपरिचित मेसना किल्ला वगळता भटके कुणी सहसा फिरकत नाही... किल्ल्यावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व एका वळणावर खडकांना शेंदूर फासलेली लहान नैसर्गिक गुहा आहे पुढे दरीच्या काठावरील छोटीशी पाऊलवाट पार करत उभा कडा वर चढत किल्ल्याच्या पठारावर

दर वर्षी प्रमाणे यंदा नदीचे पाणी छत्रपती शाहू समाधी ला लागले

Image
छत्रपती शाहू महाराज समाधी 

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० ऑगस्ट १६४३*  अदिलशहाचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र !   रणदुल्लाखान मृत्यू पावताच विजापुर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला. तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे इत्यादी मुत्सद्यांचे पारडे जड झाले. रणदुल्लाखानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजलखानाकडे आली. तो त्यावेळी राजे शहाजीराजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता. अफजलखान राजे शहाजीराजे यांच्या कट्टर दुष्मनांपैकी एक होता. स्वाभाविकपणेच राजे शहाजीराजे यांना तो पाण्यात पाहू लागला. अफजलखानानेच चंदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे फितूर असल्याची "बदगोह" (अफवा) विजापूर दरबारला लिहून कळविली. या किंवा अशाच स्वरूपाच्या काही अन्य तक्रारींवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कलुषित झाले. २० आगस्ट १६४३ एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जमात आदिलशहाकडे हजर करण्याचा हुकुम झाल्याचे कळते.  🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 *२० ऑगस्ट १६६६* आग्र्याहून निसटल्यावर छत्रपती शिवरायांनी

भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती*

Image
*भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती* १) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला  २) जन्मतारीख १८ जुलै,३२२८ ई.स. पूर्व  ३) महिना: श्रावण  ४) दिवस: अष्टमी  ५) नक्षत्र: रोहिणी  ६) दिवस: बुधवार  ७) वेळ: १२:०० रात्री ८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ८ महिने आणि ७ दिवस आयुष्य.  ९) अवतार समाप्तीची तारीख १८ फेब्रुवारी ३१०२ ईसा पूर्व १०) जेव्हा कृष्ण  ८९ वर्षांचे होते महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध)  झाले. ११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. ११) कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी, १३३९ रोजी सुरु झाले होते. १२) २१ डिसेंबर १३३९ ईसा पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान सूर्यग्रहण होते (जयद्रथच्या मृत्यूचे कारण.) १३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ ईसा पूर्व अवतार समाप्ती. *कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते.* मथुरेत कृष्ण, कन्हय्या  ओडिशामध्ये जगन्नाथ महाराष्ट्रात विठ्ठल ,विठोबा  राजस्थानमध्ये श्रीनाथ गुजरातमध्ये द्वारकाधीश गुजरातमध्ये रणचोछोड कर्नाटकातील उडुपी, कृष्णा केरळमधील गुरुवायुरप्पन  जन्म

लोककलाकार छगन चौधरी.. याची गाणी खडोबा जोतिबाच्या दारात वाजलवी जातात....

Image
लोककलाकार  छगन चौधरी  हजार वेळा पंडरी एक वेळा जेजुरी डवरी गोसावी समजामध्ये जन्मलेला खडोबाचा वाघ्या म्हजेच छगन चौधरी.याच्या माहिती आपण पाहणार आहोत. याचा जन्म 18/9/1956 साली सोलापूरला झाला.हळू हळू मोठं होता होता त्यानी वडिलांन सोबत देवाची गाणी गाऊन गुजरण करता करता जागरण गोधळा प्रवेश केला. त्या काळी छगन राव छोटे छोटे गावोगावी कार्यक्रम करून लागले. त्यानी त्या मार्फत अफाट लोकप्रयता मिळवली. ज्जा गावात त्याचा कार्यक्रम होई. त्याची चर्चा साधारण 15दिवस चाले.हाच आवाज त्या काळी विंग्स कंपनीने हेरला.त्यावेळी आपण रेडीओ च्या जमण्यातून पुढे टेप रेकार्डच्या जमान्यात आलो होतो. विग्स कंपनीने जागरण गोधळ पार्टी च रेकार्ड करण्यासाठी एका पार्टीला आमंत्रण दिल. त्याच पार्टी मध्ये छगनराव सबळ वाजवायला गेले. आणि जागरणातील कथा सांगायला कोण नव्हतं तेव्हा याच सबळ वाजवणारे छगन रावांना कथे साठी पुढे केल. आणि पुढे महाराष्ट्रतील अनेक कुलदेवता ची कथा गायली. त्यावेळी त्याचा आवाज व गाणी विग्स कंपनीने पाहल्यादा रेकार्ड करून टेप कॅसेट मार्केट मध्ये आणला. या अनेक कंपनी पुढे त्याना संधी दिली.

हा शिलालेख कोणत्या लिपी मध्ये आणि कोणत्या कालखंडामध्ये असेल..? ठिकाण - घोरडेश्र्वर मंदिर , उर्से , देहूरोड

Image
हा शिलालेख कोणत्या लिपी मध्ये आणि कोणत्या कालखंडामध्ये असेल..?  ठिकाण - घोरडेश्र्वर मंदिर , उर्से , देहूरोड

दुर्योधन मंदिर देशात काही मंदिरे आहेत परंतु महाराष्ट्रातील एकमेव असलेले तालुक्यातील दुरगाव येथील दुर्योधनाचे मंदिर अपरिचित असावे. संपूर्ण लेख वाचा.

Image
दुर्योधन मंदिर, दुरगाव, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर नगर येथे आहे. तुम्हाला तुम्हाला आश्चर्य किंवा खोटं सुद्धा वाटेल परंतु हे सत्य आहे. देशात काही मंदिरे आहेत परंतु महाराष्ट्रातील एकमेव असलेले तालुक्यातील दुरगाव येथील दुर्योधनाचे मंदिर प्रसिद्ध आहे. पौराणिक काळातील कौरव - पांडवांच्या युद्धाची या गावास पार्श्वभूमी आहे.  या गावातील लोक अनेक दंतकथा सांगता.  त्यानुसार मी ऐकलेली नंतर आता तुम्हाला सांगतोय.  जेव्हा कौरव-पांडवांचे कुरुक्षेत्र मध्ये युद्ध संपल्यानंतर  जखमी अवस्थेत असणारे युवराज दुर्योधन यांना घेऊन अश्वस्थामा  नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील दुरगाव आत्ताच्या व महाभारत कालीन  या ठिकाणी घेऊन आला. मला तर माहिती आहे दुर्योधन महादेवाचा भक्त होता. या गावात असणाऱ्या महादेवाच्या पिंड व मंदिर परिसरात वास्तव्यस होते. अश्वतमा दुर्योधन याच गावात पुरातन मंदिर आहेत.  पांडव अज्ञातवासात लपले होते, तो पांडव डोह अजून याची साक्ष देतो. लोक दुर्योधनाबरोबर पांडव डोहाची पूजा करतात. पावसाळ्यात दुर्योधनाची मूर्ती कोंडल्यानंतर तिला घाम फुटतो, त्यानंतर पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची अंध श्रद्धा आहे की असू शक

१६ आॅगस्ट १६६२*,*१६ ऑगस्ट १७००,१६ आँगस्ट १८३१*,१६ ऑगस्ट १७००,१६ आँगस्ट १८३१ सालचे इतिहासीक दिन विशेष

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ आॅगस्ट १६६२* "अण्णाजी दत्तो प्रभूणीकर" हे वाकनिशी करत होते, त्यांना छत्रपती शिवरायांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ ऑगस्ट १७००* आपल्या राजाला म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंना हाल हाल करून मारले म्हणून मराठ्यांना जास्तच चिड आली. सभोवतालच्या मुघल प्रदेशावर घिरट्या घालून मराठ्यांनी उच्छाद मांडला. आजच्या दिवशी "हनुमंतराव निंबाळकर" यांनी सातारा मधील "खटाव" हे ठाणे काबीज केले व मुघलांकडून लढणाऱ्या मराठी सरदाराला ठार केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ आँगस्ट १८३१* वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी यांचा जन्म (मृत्यू -२० मार्च १८५८) स्वतःच्या कर्तृत्वाने इंग्रजांना घाम फोडण्यात व सळो की पळो करण्यात ती यशस्वी झाली.ती वीरांगना होती महाराणी अवंतीबाई लोधी. ब्रिटिश राजवटीशी अवंतीबाईंनी केलेला प्रखर संघर्ष,त्यांनी सोसलेले हाल त्यात त्यांना आलेलं वीरमरण याचा सर्व इतिहास अंगावर नक्कीच शहारे आणणारा आहे. अवंतीबाईंचा जन्म एका जमीनदार कुटुंबात झाला. त्या बालपणापासूनच स्वतंत्र आणि शूर होत्या

ही कोणी साधीसुधी खेचर नाही तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलेलं आहे.* भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरं

Image
*पेडोंगी (१९६२ -९८)*  पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका खेचराचआहे.  खरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंध ही नसेलच. पण *ही कोणी साधीसुधी खेचर नाही तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलेलं आहे.* भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरं.  *सध्य स्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचरं काम करत आहेत.* भारताची सरहद्द उत्तरेत हिमालया च्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्र सपाटी पासून १७,००० फुटा पर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीच संरक्षण करतो. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी कोणतच वाहन आजही जाऊ शकत नाही. जिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते तिकडे दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. ह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरं. अतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचर काम करूशकतात. अतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात ह्या पलीकडे खेचरं अतिशय प्रामाणिक असत

किल्ले पुरंदर किल्ले ब्लॉग पुणे जिल्हा नंबर 1 गड पाहिला नसेल तर हा ब्लॉग वाचून जावा नक्कीच मदत होईल.

Image
पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबन्दी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इन्द्

अज्ञात राहिलेले छञपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू युवराज संभाजी महाराज शहाजीराजे भोसले.

Image
अज्ञात राहिलेले छञपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू युवराज संभाजी महाराज शहाजीराजे भोसले.  शहाजीराजे यांना तीन बायका होत्या 1) जाधवराव कन्या जिजाऊ 2) मोहिते कन्या तुकाबाई 3) नरसाबाई ह्या नाटक शाळा म्हणून समजली जाते.  जिजाऊंना चार मुली व दोन मुले त्यातील चार मुली वारल्या थोरले पुञ युवराज संभाजी राजे दुसरे शिवाजी राजे . 2) तुकाबाईंचे एक पुञ एकोजी  3) नरसाबाईस संताजी असे चार पुञ शहाजीराजे यांना होते एकोजी व संताजी यांचे वंश कर्नाटक तंजावर येथे सध्या आहेत. त्यांनी पुणे जहागिरीवर कधीच अभिलाष दावला नाही.  जिजाऊंचे थोरले पुञ संभाजी महाराज यांचे लग्न विजयराव विश्वासराव कुळातील (पवार) हे शिवनेरीचे किल्लेदार होते.  यांच्या मुलीशी शहाजीराजे यांनी संभाजी महाराज यांचे लग्न लावून दिले. जयंतीबाई साहेब व संभाजीराजे शिवरायांच्या जन्मावेळेस शिवनेरीवरच होते. शहाजीराजे यांच्या राजकीय व रणनितीतील धावपळीमुळे जिजाऊंना गरोदरपणात चांगल्या विश्वासू माणसांजवळ ठेवायचे होते. निजामशाही सोडली होती त्यावेळी शिवनेरी निजामाकडे होती त्याचे किल्लेदार विजयराव हे होते त्यांच्या सहाय्याने जिजाऊंना शिवनेरीवर ठेव

सांगली येथील 75वर्षा पूर्वीचा म्हजेच 15 ऑगस्ट 1947 सालचा हा कागद आहे

Image

नागपुरचे महाराज #श्रीमंत_मुधोजी_भोसले_महाराज (द्वितीय) उर्फ आप्पासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त #विनम्र_अभिवादन !

Image
नागपुरचे महाराज  #श्रीमंत_मुधोजी_भोसले_महाराज (द्वितीय) उर्फ आप्पासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त  #विनम्र_अभिवादन ! श्रीमंत अप्पासाहेबांचा जन्म १७९६ मध्ये झाला. श्रीमंत राजे मुधोजी महाराज (द्वितीय) (उर्फ अप्पासाहेब) हे दूसर्या रघुजी महाराजांचे पुतणे होते. मुधोजी महाराज फार हुशार व कर्तबगार होते. त्या वेळेस ब्रिटीशांचे नागपूरचे राज्य काबीज करण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यांनी राज्य वाचवण्यासाठी ब्रिटीशांशी युध्द केले. सिताबर्डी किल्ल्यावर झालेल्या लढाई मध्ये त्यांचा पराभव झाला. १८१८ मध्ये राज्य खालसा करुन मुधोजी महाराज यांना कैद केले. व आलाहाबादच्या ४ किल्यात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्तात नेत असतांना १३/५/ १८१८ ला रायपूर मुक्कामी तळ असतांना कैदेतून निसटून ते थेट महादेवाच्या डोंगरात चौऱयागढ टेकडीवर पोचले. त्यांनी डोंगरात ब्रिटीशांना अनेक दिवस चकवीले. ब्रिटीशांनी अप्पासाहेबांस पकडून देणाऱ्यास २ लाख रुपये व १ ० हजार ची जहागीर असे बक्षीस ठेवले.  मुधोजी महाराजांनी अनेक संस्थानात भोपाल, लाहोरला रणजितसिंग, हिमाचल प्रदेशातील मंनडी- डेहरी- गढवाल व नागोर आदि अनेक संस्थानात ब्रिटीशां विरुध्द

नितीन घाडगे ब्लॉग या वेब साईटच्या माध्यमातून शेकडो विविध विषयी ऐतिहासिक माहिती देण्याचा प्रयत्न आहे : मराठासमाजातील प्रथमच व भारतातून व्हिक्टोरिया काँस ...

नितीन घाडगे ब्लॉग या वेब साईटच्या माध्यमातून शेकडो विविध विषयी ऐतिहासिक माहिती देण्याचा प्रयत्न आहे : मराठासमाजातील प्रथमच व भारतातून व्हिक्टोरिया काँस ... : 👉व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे 👉 यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो. 🙏शहीद यशवंत घाडगे 🙏   ...

15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षं झाली. ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटच्या टप्प्यात काय झालं आणि 15 ऑगस्ट लाच कसे स्वातंत्र्य मिळाल.?

Image
सर्वच देशातील नागरिक तत्कालीन नेते देश भक्त क्रांतिकारक यांनी इंग्रज सरकार विरुद्ध उठाव करून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले.आणि त्या प्रयत्न यशस्वी झाले.  दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने इतका मोठा दणका खाल्ला होता की इतक्या प्रचंड साम्राज्यावर सत्ता टिकवणे हे अशक्य होते. म्हणूनच त्यांनी कॉलनी रिकाम्या केल्या आणि त्यामुळेच दक्षिण आशियातील अनेक देशांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने इंग्लंडला नामोहरम केल्यामुळे विन्स्टन चर्चिल यांना अमेरिकेचे सामरिक सहाय्य घेणे भाग पडले. अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी सामरिक सहाय्य करण्यासाठी ब्रिटिशांना अनेक अटी घातल्या ज्या मान्य करण्याखेरीज चर्चिल यांच्याकडे पर्यायच नव्हता. त्यामुळे इंग्रजांना येथून काढता पाय घ्यावा लागला. आणि ब्रिटिशांना भारतीयांनी सळो की पळो केले. त्यामुळे भारतात सत्ता टिकवण अवघड आहे. त्यामुळे आज ना उद्या भारताला स्वातंत्र्य द्यावा लागणारच. म्हणून त्यांनी एक मसुदा तयार केला. गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र