नागपुरचे महाराज #श्रीमंत_मुधोजी_भोसले_महाराज (द्वितीय) उर्फ आप्पासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त #विनम्र_अभिवादन !

नागपुरचे महाराज 
#श्रीमंत_मुधोजी_भोसले_महाराज (द्वितीय) उर्फ आप्पासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त 
#विनम्र_अभिवादन !

श्रीमंत अप्पासाहेबांचा जन्म १७९६ मध्ये झाला. श्रीमंत राजे मुधोजी महाराज (द्वितीय) (उर्फ अप्पासाहेब) हे दूसर्या रघुजी महाराजांचे पुतणे होते. मुधोजी महाराज फार हुशार व कर्तबगार होते. त्या वेळेस ब्रिटीशांचे नागपूरचे राज्य काबीज करण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यांनी राज्य वाचवण्यासाठी ब्रिटीशांशी युध्द केले. सिताबर्डी किल्ल्यावर झालेल्या लढाई मध्ये त्यांचा पराभव झाला. १८१८ मध्ये राज्य खालसा करुन मुधोजी महाराज यांना कैद केले. व आलाहाबादच्या ४ किल्यात ठेवण्यासाठी कडक बंदोबस्तात नेत असतांना १३/५/ १८१८ ला रायपूर मुक्कामी तळ असतांना कैदेतून निसटून ते थेट महादेवाच्या डोंगरात चौऱयागढ टेकडीवर पोचले. त्यांनी डोंगरात ब्रिटीशांना अनेक दिवस चकवीले. ब्रिटीशांनी अप्पासाहेबांस पकडून देणाऱ्यास २ लाख रुपये व १ ० हजार ची जहागीर असे बक्षीस ठेवले. 

मुधोजी महाराजांनी अनेक संस्थानात भोपाल, लाहोरला रणजितसिंग, हिमाचल प्रदेशातील मंनडी- डेहरी- गढवाल व नागोर आदि अनेक संस्थानात ब्रिटीशां विरुध्द मदत मागितली, पण कोणी भितीने त्यांना मदत केली नाही. शेवटी जोधपूरच्या एका मंदिरात गोसाव्याच्या वेशात राहत असतांना तेथील राजनर्तकीला हिऱ्याची अंगठी बक्षीस दिली, त्यामुळे ब्रिटीशांच्या लक्षात आले व त्यांनी तिथल्या राजाकडे मुधोजी महाराजांना मागितले, तेव्हा जोधपूर महाराजांनी ब्रिटीशांना नकार देऊन राजांना आपल्या जवळ ठेऊन घेतले. 

अशा ह्या नागपूरच्या स्वाभिमानी राजाचा जोधपूरलाच १५/७/ १८४० ला निधन झाले. आजपण त्यांची समाधी जोधपूरच्या राज घाटात आहे. असे हे शूर- वीर मुधोजी महाराज नागपूरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे पहिले स्वातंत्र्य सेनानी होते.

पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४