दुर्योधन मंदिर देशात काही मंदिरे आहेत परंतु महाराष्ट्रातील एकमेव असलेले तालुक्यातील दुरगाव येथील दुर्योधनाचे मंदिर अपरिचित असावे. संपूर्ण लेख वाचा.
दुर्योधन मंदिर, दुरगाव, ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर नगर येथे आहे. तुम्हाला तुम्हाला आश्चर्य किंवा खोटं सुद्धा वाटेल परंतु हे सत्य आहे.
या गावातील लोक अनेक दंतकथा सांगता. त्यानुसार मी ऐकलेली नंतर आता तुम्हाला सांगतोय.
जेव्हा कौरव-पांडवांचे कुरुक्षेत्र मध्ये युद्ध संपल्यानंतर जखमी अवस्थेत असणारे युवराज दुर्योधन यांना घेऊन अश्वस्थामा नगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील दुरगाव आत्ताच्या व महाभारत कालीन या ठिकाणी घेऊन आला. मला तर माहिती आहे दुर्योधन महादेवाचा भक्त होता. या गावात असणाऱ्या महादेवाच्या पिंड व मंदिर परिसरात वास्तव्यस होते. अश्वतमा दुर्योधन याच गावात पुरातन मंदिर आहेत.
पांडव अज्ञातवासात लपले होते, तो पांडव डोह अजून याची साक्ष देतो. लोक दुर्योधनाबरोबर पांडव डोहाची पूजा करतात.
पावसाळ्यात दुर्योधनाची मूर्ती कोंडल्यानंतर तिला घाम फुटतो, त्यानंतर पाऊस पडतो, अशी ग्रामस्थांची अंध श्रद्धा आहे की असू शकते . या स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटक दूरवरून येत असतात.
या मंदिर साधारण बारावी शतकातील आहे असं वाटते.
याच गावात असणारे अश्वत्थामा मंदिर
लेखक व माहिती संकलन :-नितीन घाडगे
Excellent information 👍
ReplyDelete