नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या उपरांगापैकी अजंठा सातमाळ या डोंगररांगेवर चांदवड तालुक्यात वसलेला “मेसना किल्ला”...🚩
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या उपरांगापैकी अजंठा सातमाळ या डोंगररांगेवर चांदवड तालुक्यात वसलेला “मेसना किल्ला”...🚩
चांदवड हे प्राचीन काळापासून इतिहास प्रसिध्द राजधानीचे गांव अनेक ऋषी मुनींचे आश्रम या परिसरातील शिखरांवर होते अगस्ती ऋषी काही काळ चांदवड परिसरात वास्तव्यास होते नंतरच्या काळात ते अंकाई किल्ल्यावर आश्रम करुन राहीले...
नाशिक जिल्हा म्हणजे दुर्गांची खाण सह्याद्रीच्या रांगांबरोबरच अजंठा-सातमाळा सालबारी डोलबारी अशा अनेक पर्वतरांगांमध्ये अनेक गडकोट त्या त्या काळात निर्मीले गेले त्यापैकी सातमाळा रांगेतले किल्ले त्यांच्या वैशिष्ट्य पूर्ण अवशेषांबरोबरच प्रचंड मोठा इतिहास असल्याने अनेकांच्या आवडीचा विषय आहेत याच रांगेतील चांदवड परिसरातील धोडप इंद्राई राजधेर या किल्ल्यांवर भटके दुर्गप्रेमी तर सदैव जातात परंतु मेसनखेडे असूनही विविध कालखंडात राहिलेल्या अपरिचित मेसना किल्ला वगळता भटके कुणी सहसा फिरकत नाही...
किल्ल्यावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व एका वळणावर खडकांना शेंदूर फासलेली लहान नैसर्गिक गुहा आहे पुढे दरीच्या काठावरील छोटीशी पाऊलवाट पार करत उभा कडा वर चढत किल्ल्याच्या पठारावर येतात मेसना किल्ल्याचा आकार व त्यावरील अवशेष पहाता या किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी होत असावा.. गडावरील हे सर्वात उंच ठिकाण त्यावर ध्वजस्तंभाची जागा असून तिथे सध्याला पिराची स्थापना करण्यात आली.. टेकडीवरुन उतरताना खडक खोदलेले पाण्याचे जोड टाके आहेत, अखंड दगडाचे चिरे टाक्याच्या पुढील बाजूस इतर बांधकामासाठी ओळीने मांडून ठेवले आहेत..किल्ल्यावर अवशेष फारसे नाही पण किल्ल्याच्या भूभागावरुन अंकाई-टंकाई, कात्रागड, गोरखगड किल्ले दिसतात...
➖➖➖➖➖➖➖➖
...👌🏼♥️🔥
Comments
Post a Comment