आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० ऑगस्ट १६४३*
 अदिलशहाचे राजे शहाजीराजे यांना हुकुमनामा पत्र ! 
 रणदुल्लाखान मृत्यू पावताच विजापुर दरबारात राजे शहाजीराजे यांचा पक्ष दुर्बळ झाला. तर त्यांच्या वाईटावर असलेल्या मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे इत्यादी मुत्सद्यांचे पारडे जड झाले. रणदुल्लाखानाची दौलत आता त्याचा खिजमतगार असलेल्या अफजलखानाकडे आली. तो त्यावेळी राजे शहाजीराजे यांच्या बरोबर कर्नाटकातच होता. अफजलखान राजे शहाजीराजे यांच्या कट्टर दुष्मनांपैकी एक होता. स्वाभाविकपणेच राजे शहाजीराजे यांना तो पाण्यात पाहू लागला. अफजलखानानेच चंदीच्या राचेवर मराठ्यांना राजे शहाजीराजे फितूर असल्याची "बदगोह" (अफवा) विजापूर दरबारला लिहून कळविली. या किंवा अशाच स्वरूपाच्या काही अन्य तक्रारींवरून आदिलशहाचे मत राजे शहाजीराजे यांच्या विरुद्ध कलुषित झाले. २० आगस्ट १६४३ एका पत्रावरून काही दिवसांपूर्वी राजे शहाजीराजे यांना आपली जमात आदिलशहाकडे हजर करण्याचा हुकुम झाल्याचे कळते. 


🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*२० ऑगस्ट १६६६*
आग्र्याहून निसटल्यावर छत्रपती शिवरायांनी दख्खन मध्ये येण्यासाठी "नरवीर घाटी" हे मुघल ठाणे खोटे दस्तक(परवाने) दाखवून ओलांडले, ह्या ठिकाणी ठाणेदार होता "लतिफखान".
आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजेंना "मथुरा" मध्ये ठेऊन अवघ्या ३ दिवसात हे ठाणे ओलांडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० ऑगस्ट १६६६*
रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार आग्र्यामध्ये फुलौतखानाला सापडले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून ‘ब्र’ ही निघाला नाही. बोलले असते तर छत्रपती संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० आॅगस्ट १६६६*
औरंगजेब बादशहाने "मिर्झाराजे जयसिंग" यांना फर्मान पाठवून आग्रा कैदेतून छत्रपती शिवराय निसटण्यामागे "कुंवर रामसिंग" जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० ऑगस्ट १६७८*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिण मोहीमेदरम्यान "छत्रपती शिवराय" बंकापुरात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० ऑगस्ट १६८३*
औरंगजेबने दिनांक २० ऑगस्ट १६८३ रोजी शहाजादे अजम व त्याचा मुलगा बेदारबख्त यांची विजापुरच्या मोहिमेवर नेमणूक केली. ऑक्टोबरला अजम आपल्या फौजेसह मोहिमेवर निघाला. या मोहिमेचा मूळ हेतू विजापुराकडील छत्रपती संभाजी राजांकडे असलेला मुलूख काबीज करणे हा होता. इ. स. १६८४ च्या सुरुवातीस ह्या फौजेस रसद न मिळाल्यामुळे फारच हालांत दिवस काढावे लागले. ही दैन्यावस्था औरंगजेबस समजताच त्याने ४ फेब्रुवारी १६८४ रोजी अजम व बेदारबख्त भेटावयास आले असता त्यांस विजापुरांकडील मुलूख लुटण्याचा हुकूम दिला. त्या आज्ञेवरून त्यांनी सर्व मुलूख लुटून धारवाडच्या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि थोड्याच दिवसांत तो किल्ला फत्ते करून माघारे छावणीस गेले. छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती 
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजी महाराजांचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*२० ऑगस्ट १७६१*
पेशवाईची वस्त्रे मिळाल्यानंतर माधवराव पुण्यात आले आणि पहिल्यांदा नजर वळविली ती निजामाकडे. निजामाने मराठे आता पुरते मोडले आहेत, असे समजून घोरपडे, जाधव, घाटगे अशा मराठा सरदारांना पेशव्यांविरुद्ध फितवले आणि नळदुर्ग काबीज केल्यानंतर तो थेट पुण्याच्या रोखाने निघाला. इकडे माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ ला निजामावर स्वारी करायचे ठरले. परंतु नुकत्याच पानिपतच्या युद्धात झालेल्या सैन्याच्या भयंकर नुकसानीमुळे माधवरावांनी निजामाशी थेट न भिडता आपले सैन्य निजामाच्या मुलुखात घुसवले. निजामाचा भाऊ सफदरजंगही फितूर होऊन मराठ्यांच्या मदतीला आला होता. या मोहिमेत आजारीपणाचे निमित्त करून रघुनाथराव सामील झालेले नव्हते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४