15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षं झाली. ब्रिटिशांनी 150 वर्षं राज्य केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील शेवटच्या टप्प्यात काय झालं आणि 15 ऑगस्ट लाच कसे स्वातंत्र्य मिळाल.?

सर्वच देशातील नागरिक तत्कालीन नेते देश भक्त क्रांतिकारक यांनी इंग्रज सरकार विरुद्ध उठाव करून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले.आणि त्या प्रयत्न यशस्वी झाले.

 दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने इतका मोठा दणका खाल्ला होता की इतक्या प्रचंड साम्राज्यावर सत्ता टिकवणे हे अशक्य होते. म्हणूनच त्यांनी कॉलनी रिकाम्या केल्या आणि त्यामुळेच दक्षिण आशियातील अनेक देशांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने इंग्लंडला नामोहरम केल्यामुळे विन्स्टन चर्चिल यांना अमेरिकेचे सामरिक सहाय्य घेणे भाग पडले. अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी सामरिक सहाय्य करण्यासाठी ब्रिटिशांना अनेक अटी घातल्या ज्या मान्य करण्याखेरीज चर्चिल यांच्याकडे पर्यायच नव्हता. त्यामुळे इंग्रजांना येथून काढता पाय घ्यावा लागला.
आणि ब्रिटिशांना भारतीयांनी सळो की पळो केले. त्यामुळे भारतात सत्ता टिकवण अवघड आहे. त्यामुळे आज ना उद्या भारताला स्वातंत्र्य द्यावा लागणारच. म्हणून त्यांनी एक मसुदा तयार केला.

गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी भारताची फाळणी जाहीर केली. भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार १४ ऑगस्ट १९४७ला पाकिस्तान या नव्या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि लगेचच १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले.
दिवसाऐवजी 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्रीच भारताला स्वातंत्र्य का देण्यात आलं माहिती आहे का?

15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री 12 वाजता भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली. मात्र भारताच्या स्वातंत्र्यदिनाची ही तारीख आणि वेळ अचानक ठरलेली नाही. या तारखेमागे आणि वेळेमागेदेखील इतिहास आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जवाहरलाल नेहरू यांनी 1929 साली ब्रिटिश सरकारपासून पूर्णपणे स्वंत्रतेची मागणी केली आणि 26 जानेवारीला स्वांत्र्यदिन साजरा करण्याती घोषणा केली. 1930 नंतरदेखील हा दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजराही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिन होऊ शकला नाही. मग 1950 साली याच दिवशी भारताचं संविधान लागू झालं म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मानला गेला.

मध्यरात्रीच स्वातंत्र्य देण्याचं का ठरलं? - ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, 15 ऑगस्ट तारीख भारतासाठी शुभ नव्हती. त्यामुळे एक शुभे वेळ काढण्यात आली. 14 ऑगस्ट 1947 रात्री 11.51 ते रात्री 12 .39 ही वेळ शुभ होती. इंग्रजी कॅलेंडरनुसार रात्री 12 नंतर 15 ऑगस्ट सुरू होतो. मात्र भारतीय पद्धतीनुसार सूर्योदयानुसार तारीख बदलते. त्यामुळे मध्यरात्री 12 ही वेळ निश्चित झाली.

खरंतर 15 ऑगस्टच का या प्रश्नाच्या उत्तरादाखल ' फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकात माऊंटबॅटन यांच्या विधानाचा उल्लेख आहे.


ते म्हणतात, "ही तारीख एकदम निवडण्यात आली. खरंतर एका प्रश्ना्च्या उत्तरादाखल मी ती विशिष्ट तारीख जाहीर केली होती. मी या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार होतो. जेव्हा मला सांगण्यात आलं की आपल्याला एखादी तारीख ठरवायची हे. तेव्हा मला कळलं की ती लवकरच असायला हवी. मी तोपर्यंत फारसा विचार केला नव्हता. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातली तारीख ठरवायची होती हे पक्कं होतं. मग माझ्या मनात 15 ऑगस्ट ही तारीख आली. कारण जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करून दोन वर्षं झाली होती."



30 जून 1948 ही तारीख ठरली असताना भारताला लवकर स्वातंत्र्य देणं यामागील काही कारणं ज्येष्ठ इतिहासकार बिपन चंद्रा त्यांच्या India's struggle for independance या पुस्तकात उद्धृत करतात.ते पुढे पाहू.

त्यांच्या मते भारतातील धार्मिक तेढ हाताळणं ब्रिटिशांना दिवसेंदिवस कठीण झालं होतं. त्यामुळे लवकर स्वातंत्र्य दिलं तर ब्रिटिशांची त्यातून सुटका होईल. काही ब्रिटिश अधिकारी तर इंग्लंडला जाण्यासाठी डोळे लावूनच बसले होते. भारताच्या बाजूनेही ब्रिटिशांवर दबाव होताच. "तुम्ही स्वत:ही नीट राज्य करत नाही आणि आम्हालाही करू देत नाही," अशी टीका वल्लभभाई पटेल यांनी माऊंटबॅटन यांच्यावर केली होती.

भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एकसंध भारत अस्तित्वात आला नाहीच. एकसंध भारत असावा अशी आमची इच्छा होती असं वक्तव्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी केलं होतं.

(संदर्भ - Modern India- बिपन चंद्रा, India's struggle for Independence- Bipan Chandra and others. Freedom at Midnight- Larry Collins and DominiquLapierre, कथा स्वातंत्र्याची- कुमार केतकर )

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४