अठरा कारखाने: कारखाने म्हणजे खाती किंवा विभाग. शिवकाळात मुलकी प्रशासनामध्ये अष्टप्रधानमंडळ होतेअष्टप्रधानाच्या नंतरच्या स्तरावर काम करणारे विविध चिटणीस होते त्यांच्या सहाय्याने अठरा कारखाने व बारा महालांचा कारभार पाहिला जाई. ते अठरा कारखाने व बारा महाल
शिवकालीन महाराष्ट्र
अठरा कारखाने:
कारखाने म्हणजे खाती किंवा विभाग. शिवकाळात मुलकी प्रशासनामध्ये अष्टप्रधानमंडळ होतेअष्टप्रधानाच्या नंतरच्या स्तरावर काम करणारे विविध चिटणीस होते त्यांच्या सहाय्याने अठरा कारखाने व बारा महालांचा कारभार पाहिला जाई. ते अठरा कारखाने व बारा महाल पुढील प्रमाणे-
अठरा कारखाने:-
१) खजिना (रोकड)
२) जवाहीरखाना (रत्नशाळा)
३) अंबरखाना (धान्यकोश)
४) शरबतखाना (औषधालय)
५) तोफखाना
६) दफ्तरखाना
७) जमादारखाना
८) जिरातखाना (धान्य विभाग)
९) मुदपाकखाना (स्वयंपाक)
१०) उष्ट्रखाना (उंट विभाग)
११) नगारखाना
१२) तालीमखाना
१३) पीलखाना (हत्तीशाळा)
१४) फरासखाना (राहुट्या,तंबू,डेरे इ.)
१५) आब्दारखाना (पेये)
१६) शिकारखाना (खेळ)
१७) दारुखाना
१८) शहतखाना ( आरोग्यगृह )
बारा महाल :-
१) पोते (कोषागार)
२) सौदागर (व्यापारी)
३) पालखी
४) कोठी
५) इमारत
६) बहिला (रथशाळा)
७) पागा (अश्वशाळा)
८) सेरी (खाजगी)
९) दरुणी ( राणीवसा)
१०) थट्टी (गोशाळा)
११) टंकसाळ
१२) सबिना (संरक्षण दल )
प्रत्येक किल्ल्यावर त्या किल्ल्याच्या महत्वानुसार कारखाने व महाल असत. सर्व कारखाने व सर्व महाल प्रत्येक किल्ल्यांवर नसत. पण महत्वाचे कारखाने उदा. अंबरखाना, दारुखाना, मुदपाकखाना, खजिना, नगारखाना, इत्यादी कारखाने प्रत्येक किल्ल्यांवर असत.
संदर्भ: शिवकालीन महाराष्ट्र वरून
सेवाशी तत्पेरे ठेया संतोष झिपरे य9049760888
सदर संदर्भ ग्रंथ माझे कड़े उपलब्ध आहै दारूखाना हे तोफेच्या साठी वापरण्यात येणार दारू असे घ्यावेत
Comments
Post a Comment