अज्ञात राहिलेले छञपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू युवराज संभाजी महाराज शहाजीराजे भोसले.
अज्ञात राहिलेले छञपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू युवराज संभाजी महाराज शहाजीराजे भोसले.
शहाजीराजे यांना तीन बायका होत्या 1) जाधवराव कन्या जिजाऊ 2) मोहिते कन्या तुकाबाई 3) नरसाबाई ह्या नाटक शाळा म्हणून समजली जाते.
जिजाऊंना चार मुली व दोन मुले त्यातील चार मुली वारल्या थोरले पुञ युवराज संभाजी राजे दुसरे शिवाजी राजे . 2) तुकाबाईंचे एक पुञ एकोजी 3) नरसाबाईस संताजी असे चार पुञ शहाजीराजे यांना होते एकोजी व संताजी यांचे वंश कर्नाटक तंजावर येथे सध्या आहेत. त्यांनी पुणे जहागिरीवर कधीच अभिलाष दावला नाही.
जिजाऊंचे थोरले पुञ संभाजी महाराज यांचे लग्न विजयराव विश्वासराव कुळातील (पवार) हे शिवनेरीचे किल्लेदार होते. यांच्या मुलीशी शहाजीराजे यांनी संभाजी महाराज यांचे लग्न लावून दिले. जयंतीबाई साहेब व संभाजीराजे शिवरायांच्या जन्मावेळेस शिवनेरीवरच होते. शहाजीराजे यांच्या राजकीय व रणनितीतील धावपळीमुळे जिजाऊंना गरोदरपणात चांगल्या विश्वासू माणसांजवळ ठेवायचे होते. निजामशाही सोडली होती त्यावेळी शिवनेरी निजामाकडे होती त्याचे किल्लेदार विजयराव हे होते त्यांच्या सहाय्याने जिजाऊंना शिवनेरीवर ठेवण्यात आले आणि शहाजीराजे मोहिमेवर गेले. विजयरावांनी खुप मदत केली होती.
विजयरावांची मुलगी जयंतीबाई ह्यांना दोन पुञ होते. संभाजी महाराज यांच्या पुञ 25 नोव्हेंबर 1654 साली उमाजी नावाचा पुञ जन्माला आले. हे उमाजी उत्तर कालीन बखरकारांनी अज्ञातच ठेवले. ते इथे थांबलेच नाही तर संभाजी हे कर्नाटकात वारल्याने त्यांचे लग्नच झाले नव्हते असे बिनबुडाचे आरोप केले होते.
संभाजी महाराज यांना अफजलखानाने काकनगिरीच्या लढाईत मारले बखरकारांनी असे सांगितले जाते पण वस्तू स्थिती तशी नव्हती संभाजी महाराज बेदनूरच्या लढाईत 1663 च्या उत्तर्र्धात मारले गेले होते.
उमाजी लहान असल्याने कर्नाटक कारभार एकोजीस दिला होता. पण बखरकारांनी संभाजी लहान वयात मारला गेल्याने वंशच वाढला नाही पण ते माञ चूकीचे आहे जयंतीबाईंनी उमाजींच्या नावे दान केल्याचे उल्लेख 9 जानेवारी 1667 व 1670 च्या उतुर व अननहल्ली शिलालेखात आहेत.
1683 च्या मजहरावरून उमाजी वलद संभाजी थोरले , शिवाजीचा पुयण्यास विजापुरतर्फे जहागिरी होती. त्याने धामधुम करून ही देशमुखी मिळवली होती. उमाजीराजे पुण्याच्या आसपास एका मोठ्या युद्धात धुमाकुळ घालून वीरमरण आले होते. उमाजीस बहादुरजी नावाचे पुञ ही होते. संभाजिच्या मुलांस एकोजीने फारसे काही न दिल्याचे दिसते. म्हणून शिवाजी महाराज यांनी भावाच्या मुलाची वाटणी मागितली असावी. एकोजीस शिवरायांनी संताजीस व उमाजीस त्यांचा वाटा द्यावयास भाग पाडले असावे. संताजीस शिवरायांनी कर्नाटकातील आपल्या कारभारात ठेवले होते. उमाजी 1677 पुर्वी वारल्याने त्यांच्या कुटूंबास घेऊन सुप्याकडील जहागिरी दिली असावी.
पण बखरकरांनी शिवाजीराजे व एकोजी यांच्या वाटणीचे वेगळेच स्वरूप घडवून आणले होते. सध्या उमाजींचे वंश जिंती करमाळा तालुक्यात आजही आपल्या जहागिरीवर नांदत आहे.
1740 पर्यंत जिंतीतील कारभार उमाजीच्या पत्नी मकाऊ ह्याच पाहत असल्याचे पुरावे मिळतात. जिंती जहागिरीत मकाऊंची समाधी आहे तिथे त्यांना देवीचा मान आहे मकाऊंच्या नावाने वर्षाकाठी जञा निघते यावरून समजते की मकाऊंनी कशाप्रकारे आसपासच्या गावात आपल्या पुर्वजांचे नाव कसे चालवले असेल ते....
पण बखरकरांनी हे थोरले संभाजी महाराज आपणास अज्ञातच ठेवले.
#महाराज_शहाजीराजे
#युवराज_संभाजीराजे
#छञपती_शिवराय
गडप्रेमी बाळासाहेब पवार
9604058030
Comments
Post a Comment