इतिहास,किल्ले,छत्रपती शिवाजी महाराज याचा इतिहास, मराठा इतिहास, ऐतिहासीक घराणी,प्राचीनमंदिरेवस्तू,नांणी,वाडे,समाधी,वीरगळी,शिलालेख,मंदिरे,आध्यत्मिक लेख,संत साहित्य,देशभक्त सामाजिक कार्यकर्ते याची माहिती पर लेख,आपल्या आजू बाजूची माहिती साध्या भाषेत या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे.तरी तुम्ही भर भरून प्रतिसाद देणार हे गृहीत धरून माझी हक्काने विनंती करतो. लेख, माहिती आवडली तर इतरांना शेअर करा आणि काही त्रुटी असतील तर मला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद आपला मित्र नितीन घाडगे.
१) महादजी शिंदे सरकार यांचे लष्करी कार्य त्यांनी जिंकलेला प्रदेश व प्रमुख लढाया
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
-
१) महादजी शिंदे सरकार यांचे लष्करी कार्य त्यांनी जिंकलेला प्रदेश व प्रमुख लढाया.
दक्षिण भारत
संपादन करा
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूरच्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
उत्तर भारत
संपादन करा
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
यानंतर मराठे हे उत्तरेतले बादशहाचे संरक्षक होते. पंजाब - सिंधमध्ये त्यांना चौथाईचा आणि सरदेशमुखीचा अधिकार होता. पानिपताचा सुभा महादजींचा जावई लाडोजी शितोळेंकडे होता.
लालसोटची लढाई
1786-87 च्या सुमारास मुसलमान सरदार आणि काही राजपूत राजांनी महादजींच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी बंड केलं. याला लालसोटची लढाई म्हणतात. महादजींच्या सैन्यातल्या स्थानिक उत्तर भारतीय सैनिकांनी यावेळी बंड केलं आणि महादजींच्या सैन्यातून पळ काढला.
महादजींनी यावेळेस नाना फडणवीसांकडे मदत मागितली आणि फडणवीसांनी माळव्यातल्या जहागिरीतून मदतीसाठी तिकडचं सैन्य पाठवलं.
गुलाम कादरचा उठाव आणि बादशाह शाह आलम
गुलाम कादर हा झाबेता खान रोहिल्ल्याचा मुलगा आणि नजीबखानाचा नातू. बादशहाला संरक्षण देणारे महादजी शिंदे आणि मराठा सैन्य राजपूतांशी लढत असताना या गुलाम कादरने दिल्लीचा ताबा घेतला.
इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सांगतात, "गुलाम कादरने बादशाह शाह आलमला कैद केलं. त्यावेळी बादशहाचं वय सत्तरीच्या जवळ होतं. 1780च्या सुमारासची गोष्ट. हिंदुस्तानच्या इतिहासातला हा सगळ्यात काळा इतिहास आहे. या गुलाम कादरने दिवाण - ए - आममध्ये बादशाहच्या जनानखान्याची - कुटुंबातल्या सगळ्या स्त्रियांची बेअब्रू केली. गुलाम कादरने बादशहा शाह आलमचे डोळे फोडले. मथुरेतल्या महादजींना हे समजल्यानंतर अली बहाद्दर (मस्तानीचा मुलगा समशेर बहाद्दरचा मुलगा) आणि राणेखान (पानिपतच्या तिसऱ्या युद्धात महादजींना वाचवणारा भिस्ती) यांना दिल्लीकडे पाठवलं.
अली बहाद्दर आणि राणेखान यांनी दिल्ली जिंकली आणि किल्ल्याला वेढा दिला. गुलाम कादर यादरम्यान मेरठला पळून गेला.
गुलाम कादरला पकडून महादजींनी दिल्लीत आणलं आणि त्याला बादशहासमोर शिक्षा देण्यात आली. यानंतर बादशहाने देऊ केलेली मुतालिकी पेशव्यांतर्फे स्वीकारली आणि ते वकील - ए - मुतालिक झाले. यानंतर बादशाहने गोहत्याबंदीचं फर्मान काढलं.
मराठ्यांनी दिल्लीवर थेट राज्य का केलं नाही?
उत्तर भारतातल्या आपल्या कार्यकाळात महादजींनी दोनदा दिल्ली जिंकली आणि दिल्लीच्या तख्तावर बादशाहची पुन्हा स्थापना केली. बादशाहला महादजी शिंदेंनी संरक्षण दिलं. पण त्यांनी तख्त थेट ताब्यात घेतलं नाही किंवा स्वतःचा स्वतंत्र झेंडा दिल्लीवर फडकवला नाही.
याविषयी बोलताना दिल्ली विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात, "महादजी शिंदे हे 'Regent of the Emperor' होते. म्हणजे बादशहाचं संरक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती होते. दिल्लीमध्ये ते बादशहाचे आणि तख्ताचे (Throne) संरक्षक होते. मराठे हे कायमच बादशहाचे संरक्षक होते. बादशहाची जागा घेण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. बादशाहच्याच नावे सर्वांसाठी फर्मान निघत असे. मराठ्यांकडे करवसुलीचा अधिकार होता. मुघल राजांचा संपूर्ण हिंदुस्ताना मोठा अंमल होता. आपण बादशहाचं संरक्षण करत असल्याचं त्याआधी सदाशिवराव भाऊंनीही म्हटलं होतं. मुघल बादशाही उलथवून लावण्याचा विचार त्याकाळी कोणी केला नसता. कारण त्याने उत्तरेतला संपूर्ण मुस्लीम समाज मराठ्यांच्या विरोधात गेला असता. आणि त्याने तिथे राज्य करणं कोणालाही कठीण गेलं असतं. मुघलांचं देशामधलं वर्चस्व अगदी 1857 पर्यंत होतं. 1857च्या इंग्रजांविरोधातल्या उठावामध्येही बाहदूर शाह जफरला बादशहा जाहीर करण्यात आलं होतं.
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरून हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
वडगावची लढाई
संपादन करा
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
सिप्री येथील हार
ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगावचा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरू करण्यास आदेश दिले, oकर्नल गोडार्ड यांनी ६०००ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं (?) बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
सालबाईचा तह १७ मे १७८२
सालबाईचा तह
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला
पानिपताच्या युद्धानंतर महादजींनी त्यांच्या सैन्याचं आधुनिकीकरण केलं. तोपर्यंत मराठा सैन्यात फक्त दक्षिणेतल्या - महाराष्ट्रातल्या सैनिकांचा भरणा होता.
महादजींनी सैन्याचं स्वरूप बदललं. उत्तरेत रहायचं तर तिथलं स्थानिक सैन्य हवं म्हणून महादजींनी उत्तरेतून सैन्यात भरती करायला सुरुवात केली. यातूनच शिंद्यांच्या सैन्यामध्ये मोठा सामाजिक बदल घडला. यात महाराष्ट्रातले अधिकारीही होतेच.
डी'बॉईन या फ्रेंच अधिकाऱ्याची नियुक्ती महादजींनी त्यांच्या सैन्यात केली होती.
प्रा. अनिरुद्ध देशपांडे सांगतात, " याशिवाय महादजींनी फ्रेंच अधिकाऱ्यांचीही आपल्या सैन्यात नेमणूक केली. सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं. यासोबतच महादजी शिंदेंनी तोफखानाही आधुनिक केला. त्यांनी ब्राँझ तोफा घडवून घेतल्या. फौंड्री सुरू करून बंदुका ओतण्याचा कारखाना काढला. महादजी शिंदेंमुळे शिंदेंच्या या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्रं होती."
महादजींकडे 30 हजार कवायती पायदळ, 500 तोफा, 30 हजारांचं घोडदल होतं. हे सैन्य ग्वाल्हेरला तैनात असे. इथूनच शिंदे हे ग्वाल्हेरचे शिंदे म्हणून प्रसिद्ध झाले.
महादजींचा मृत्यू
दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महादजी शिंदे 1792मध्ये पुण्याला परतले. वानवडीला भरलेलया दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षं महादजी पुण्यातच वास्तव्याला होते.
पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती.
संदर्भ:-
महादजी शिंदे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33475/
शिंदे घराणे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33474/
ग्वाल्हेर संस्थान, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/22727/
मनसबदार कामराज राजेघाटगे मुळं पुरुष घाटगे उर्फ घाडगे घराणे.* प्राचीन सूर्यवंश.राष्ट्रकुट वंशज,राठोडवंश घाटगे ही पदवी मनसबदार कामराज राजेघाटगे यानी मिळवली . *मनसबदार,वजिर,जहांगीरदार,संस्थानिक,आणि सरदारांमध्यें राजेघाटगे उर्फ घाडगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे.ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडीलो पराजित वतन 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यांच्या काळ!त दुर्गादेवी दुष्काळ पडला होता.हेच कामराज घाटगे घराण्याचा जन्माला आलेला न्यात असलेल्या पैकी एकमेव पुरूष आहेत.ते आपलं मुळ पुरुष होय.प्राचीन काळमुख वंश,राठोड राजपुत/महाराष्ट्रात राष्ट्रकुट/घाटगेउर्फ घाडगे त्या शखेअधि महारष्ट्रात स्थिरावलेले जुने घराणे म्हणजे मलवडी, बुधकर घाटगे होत..पोळ उर्फ शंखपाल यांचे जावई घराणे होत. पुढे नाईक निंबाळकर घराण्याचे आप्त व त्या भागातील रामोशी, व पुंड लोकांचे निर्दालन करणारे विजयनगरचे पण मंडलिक संस्थांनी
👉धनाजी जाधव यांची वंशावळ पुढीलप्रमाणे 👉अनिरुद्ध 👉प्रतिबाहु 👉सुबाहुआजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ जून १६५३ 👉दृढप्रहर (द्वारकेहून चंद्रादित्यपूर/चांदोर ला राजधानी आणली)(८६०-८८०) 👉स्युनचंद्र १ (श्रीनगर/सिन्नर नगर वसवून दजैतेथे राज्य स्थापले)(८८०-९००) 👉धडीयप्पा १ 👉भिल्लम १ 👉श्रीराज 👉वद्दीग १ (९५०-९७०) 👉धडीयप्पा २ (९७०-९७५) 👉भिल्लम २ (९७५-१००५) 👉वेसुगी १ 👉अर्जुन 👉भिल्लम ३ (१०२०-१०४५) 👉वद्दीग २ 👉वेसुगी २ 👉भिल्लम ४ 👉स्युनचंद्र २ 👉सिंघण १ 👉मल्लूगी 👉भिल्लम ५ (स्वतंत्र देवगिरी राजधानी वसविले व सार्वभौमत्व घोषित केले)(११८५-११९३) 👉जैत्रपाल १ (काकतीयांशी लढताना युद्धात मारले गेले)(११९३-१२००) 👉सिंघण २ (सम्राट उपाधी घेतली)(१२००-१२४६) 👉जैत्रपाल २ (वडिलांच्या हयातीत मृत्यू) 👉कृष्णदेव (आजोबांचा उत्तराधिकारी झाला)(१२४६-१२६१) 👉रामचंद्रदेव (खिळजीचे मांडलीकत्व पत्करले)(१२७०-१३११) 👉शंकरदेव ( खिळजीकडून पराभव )(१३११-१३१८) 👉गोविंददेव (जाधव आडनाव सुरू केले व बहमणींकडून जहागिरी मिळविली)(१३१८-१३८०) 👉ठाकुरजी (१३८०-१४२९) 👉भूकनदेव/भूतजी (१४२९-१५००) 👉अचलक
राजे राष्ट्रकूट उर्फ ,राठोड उर्फ घाटगे/ घाडगे राजवंशाचा कुलाचार ----------------- --------------नितीन घाडगे @..............✍️ सार्वभौम सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे राष्ट्रकूट याचे वंशज राठोड यांना घाटगे 'किताब मिळाला घाटगे अर्थात घाडगे कुळातील तसेच पडनावाने राहणाऱ्या इतर सर्व वंशजांसाठी त्यांचा कुलाचार अथवा वंशजांसाठीची मंगल कार्यात उपयुक्त असलेली आवश्यक माहिती खाली दिली आहे..... 👉 टीप : कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी... 👉 कुळ - राजे राष्ट्रकूट वंशज असणारी सूर्यवंश असणारी शाखा अपभ्रंश होऊन राठोड उर्फ घाटगे घाडगे 👉 गोत्र - कश्यप 👉 देवक - मूळ देवक सूर्यफुल/ कागल भागामध्ये घाटगे साळुंखीपंख लावतात. 👉 विशेष सूचना :कागलकर हे मूळचे मलवडी (खटाव)मूळ पुरुष कमराज घाटगे याच्यावंशज शाखा आहे परंतु कोणत्या तरी कारणाने साळुंखीपंख वापरतात .परंतु घाटगे कुळ सूर्यवंशाचे असून देवक:-सूर्यफुल आहे.तर काही भागात पाचपालवी सुद्धा देवक म्हणून सांगितली जाते पुरोहित याच्या कडून. कारण देवक माहित नसेल तर बऱ्याच लोकांन
Comments
Post a Comment