आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇३जुलै
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जुलै १३५०*
संत नामदेव यांचा मृत्यू
संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जुलै १६७३*
छत्रपती शिवरायांचे राजापूरच्या मोहिमेवरुन रायगड किल्ल्यावर सुखरूप आगमन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जुलै १६८६*
औरंगजेब विजापुरच्या वेशीवर पोहोचला
स्वतः औरंगजेब हा १४ जून १६८६ रोजी सोलापूराहून निघून ३ जुलै रोजी विजापुरजवळ पोहचला. ह्यावेळी शहाजादा अकबराने उत्तरेस जाऊन राजपुतांस आपलेसे करून औरंगजेबाविरुद्ध उठाव करावा असा विचार केला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या विचारास उचलून धरले नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जुन १६८७*
किल्ले हातगड मोगलांनी जिंकला
किल्ले होलगड (हातगड) हा बागलाणमध्ये असून तो कठीण अशा पाषाणाचा मजबूत किल्ला आहे. सय्यद अब्दुल्ला याने त्याचा मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते. किल्लेदाराने त्यांच्याशी लढा दिला. पण त्याच्या जवळ जास्त सैन्य नसल्याने त्याला युद्ध करण्याचे धैर्य झाले नाही. त्याने होलगड किल्ला हवाली केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*३ जुलै १७४५*
राणोजी शिंदे यांचा मृत्यू इ.स. ३ जुलै १७४५ रोजी मिर्झापूर प्रांत सुजालपूर भोपाळजवळ येथे झाला. यासंबंधी जयाजी शिंदे पेशव्यांना लिहितात: 'मौजे मिर्झापूर प्रांत सुजालपूर येथे तीर्थरूपांस कैलासवास जाला. त्या स्थलावरील छत्री करावयासी दोघे सिलाट पाठविणे.' राणोजींच्या पत्नी मीनाबाई (मैनाबाई) या श्रीगोंदे येथे राहात होत्या. त्यांना १९ जुलै १७४५ ला पेशव्यांनी दुखवटा पाठविला. मृत्यूच्या वेळी राणोजींजवळ त्यांचे पुत्र जयाप्पा होते. त्यांनी आपल्या तीर्थरूपांचे उत्तरकार्य मिर्झापूर येथे करून रक्षा उज्जनीस आणून क्षिप्रातीरी टोलेजंग छत्री बांधली. त्या गावास राणीगंज' असे नाव ठेवले व छत्रीस इनाम दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जुलै १७५१*
मराठा सरदार पिलाजी जाधवराव यांचा आज स्मृतिदिन...
सरदार पिलाजी जाधवराव यांना त्रिवार वंदन...🙏🚩
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जुलै १८५०*
इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला ’कोहिनूर’ हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३ जुलै१८५२*
महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment