*२ जुलै १६४९*फत्तेखान पराभूत होऊन पळाला, त्या बेलसरच्या छावणीपासून जवळच असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराला पुजेसाठी फुलझाडे लावावयास छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ बिघे जमीन अर्पण केली.
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ जुलै १६४४*
शहाजीराजे व आदिलशाहीमधे तडे...
रणदुल्लाखानच्या मृत्यूनंतर शाहजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले.
२ जुलै १६४४ ला आदिलशाह ने त्याच्या दरबारातील शाहजीराजेंच्या वकीलाचा हात कलम केला औरंगाबादच्या मुघल दफ्तरामधे सुद्धा ही नोंद सापडते त्यात हे देखिल दिले आहे की सामोपचाराची बोलणी फारशी लागू पडत नव्हती १ ऑगस्ट १६४४ ला आदिलशाहने कान्होजी जेधेला लिहीलेल्या पत्रात शाहजीराजें विरुद्ध मोहिमेचा उल्लेख आहे...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ जुलै १६४९*
फत्तेखान पराभूत होऊन पळाला, त्या बेलसरच्या छावणीपासून जवळच असलेल्या मोरगावच्या मोरेश्वराला पुजेसाठी फुलझाडे लावावयास छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ बिघे जमीन अर्पण केली. पहिल्या विजयानंतर श्रींना वाहिलेल्या श्रींच्या राज्यातील या पुष्पदूर्वा !!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ जुलै १६८२*
छत्रपती संभाजीराजांकडील असणाऱ्या अंजदीव बेटावर गोव्याचा पोर्तुगीज कॅप्टन 'आमारू सिम्मोइस पेरेर' याने तेथील किल्ल्याचा पहिला दगड बसवला. पुढे ६ महिन्यात किल्ला बांधून पूर्ण झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ जुलै १९४३*
२ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर आले होते. लक्ष्मीसहगल यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी अशी इच्छा व्यक्त केली. या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या, शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले. सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment