*१६ जुलै
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ जुलै १६७७*
दक्षिण दिग्विजय मोहीम छत्रपती शिवराय आणि त्यांचे
सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांची तंजावर येथे भेट झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ जुलै १६८१*
मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"शहजादा अकबराचे सैन्य दिवसेंदिवस वाढत असून त्याच्याजवळ १५०० स्वार असून त्र्यंबकहून आणखी पाच सहा हजार घोडेस्वार मिळणार आहेत. छत्रपती संभाजी महाराज त्याच्या भेटीस येण्याची रोज शक्यता वाटते. आणि असे बोलले जाते की, बुऱ्हाणपुर मोहिमेसाठी त्यास ते बरोबर घेऊन जातील. तेथे त्यांना आणखी काही हिंदुराजे व त्यांचे मित्र मिळतील. तेथून त्यांना तडख दिल्लीला धडक मारण्याचा बेत असावा.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१६ जुलै १७२९*
मराठे व छत्रसाल यांचा समाचार घेण्यासाठी अलाहाबादचा सुभेदार महंमद बंगश यास हुकूम दिला. सन १७२८ च्या डिसेंबरात जैतपूरनजीक बंगशाने छत्रसालावर हल्ला करून त्यास शरण आणले. बंगशाचा पराभव करण्याकरिता छत्रसालाने अंतस्थ रीतीने पेशवे बाजीराव यांची मदत मागितली. त्यानुसार बाजीराव पेशवे पंचवीस हजार सैन्यानिशी छत्रसालाचे मुलुखात मार्च १७२९ त पोहचले. मराठे-बंगश युद्धास तोंड लागले. बंगशजवळ वीस हजार फौज व तोफखाना होता. मराठ्यांनी त्यास जेर करून कोंडले, गोट लुटून फन्ना केला. सहा हजार फौज बुडविली. सरदार मृत्यू पावला. एकोणीस हत्ती पाडाव झाले. मेपर्यंत जैतपुरावर बंगशाने श्रीमंत बाजीराव पेशव्यांस करार लिहून दिला की, “आम्ही बुंदेलखंड सोडून जातो, पुन्हा छत्रसालावर चढाई करणार नाही.” मराठ्यांना विजय मिळाला. छत्रसालाची सुटका श्रीमंत बाजीरावांनी केली म्हणून छत्रसाल खूष होऊन त्यांनी बाजीरावांस आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा तोडून दिला. याच स्वारीत बाजीरावास मस्तानीची प्राप्ती झाली. बाजीराव व चिमाजी आप्पा हे विजय संपादून १६ जुलै १७२९ ला पुण्यास आले आणि तिथून छत्रपतींच्या बोलावण्यावरून पावसाळ्यात दोघे बंधू महाराजांच्या दर्शनास साताऱ्यास गेले. बुंदेलखंड हाती आल्यामुळे मराठ्यांस या स्वतःच्या मालकीच्या मुलुखात मुख्य ठाणे ठेवून आग्रा, दिल्ली, दुआबकडे स्वाऱ्या करणे सोपे झाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१६ जुलै १७३३*
साताऱ्याचे पंतप्रतिनिधी हे सुरुवातीपासूनच बाजीराव पेशव्यांचे अंतस्थ विरोधक. ते कायम बाजीरावांच्या मोहिमांमध्ये अडता घालण्याचा प्रयत्न करत असत. दि. १६ जुलै १७३३ मध्ये बालाजी नाईक महाडिक पेशव्यांना लिहितात, “जंजिरे सुवर्णदुर्गीहून अंजनवेलीचे कार्यभागास निघालो ते श्रीभार्गवस्थलावरून (चिपळूण) येता गोवलकोटची स्वारी (सिद्दी) श्रीस्थळी येऊन अनाचार करणार व ब्राह्मणाचे घरचा गला (पैसे) व घरे दग्ध करावयास स्वारी आली. हे वर्तमान मार्गी कलल्यानंतर श्रीस्थळी येऊनु गनिमाचे स्वारीचा दाखला घेऊनु युद्ध प्रसंग केला. त्याचा मोड करून सेपनास माणूस त्याचे मारले…”. पुढे प्रतिनिधींनी तर थेट सिद्दीसाताशी बोलणी करून महाडिकांनाही ‘एक किल्ला तुम्हाला देतो’ म्हणून वश करण्याचा प्रयत्न केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ जुलै १८२१*
छत्रपती संभाजीराजे यांचा खून प्रकरण
करवीरचे छत्रपती शिवाजीराजे (छत्रपती शिवराय महाराजांचे पणतू) यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र शंभुराजे उर्फ आबासाहेब महाराज वयाच्या तेराव्या वर्षी गादीवर बसले. वयाच्या मानाने शंभुराजेंची बुद्धिमत्ता व राजनीतिकौशल्य वाखाणण्याजोगे होते. महाराजांचे कौशल्य व कर्तृत्वाची खरी कारकीर्द सुरु झाली तोच वयाच्या विसाव्या वर्षी शंभुराजेंचा सयाजी मोहिते या त्यांच्याच नोकराने खून केला.
सयाजी मोहिते हा पूर्वी कराडकर प्रतिनिधींच्या पदरी नोकर होता ; पण इ.स.१८११ साली राव बाजी पेशव्याने प्रतिनिधींचा प्रदेश जप्त केल्यामुळे सयाजी मोहिते करवीर छत्रपतींच्या पदरी नोकरी करु लागला. त्याच्या तैनातीसाठी छत्रपतींनी त्याला भोगाव व केर्ली ही दोन गावे दिली. काही दिवसांनी केर्ली गावातील पाच बिघे जमीन महाराजांनी आपल्या नोकराला इनाम दिली, पण मोहित्याने त्या जमिनीचा ताबा देण्याचे नाकारले. याबाबतीत त्याने छत्रपतींशी वादही घातला. त्याने शंभूछत्रपतिंना सांगितले, एकतर हुजऱ्याची इनामी सनद रद्द करण्यात यावी किंवा सरकारकडे आपली वीस हजार रुपये बाकी निघते ती ताबडतोब परत करावी, म्हणजे मी या राज्यातून निघून जाईन. परंतु त्याच्या अर्जाकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापून तो १६ जुलै १८२१ रोजी राजवाड्यात गेला. त्यादरम्यान तीन प्रहरीच्या वेळी छत्रपती संभाजी महाराज राजवाड्यातील भवानी चौकात असताना तेवढयात सयाजी मोहिते व बाबाजी, बापूजी व बाजीराव हे त्याचे तिन मुलगे तसेच नातू भाऊ मोहिते व पुतण्या माधव मोहिते असे सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ जुलै १८५७*
तात्या टोपेंनी १८५७ मध्ये सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्त्वाची स्थळे जिंकली आणि ग्वाल्हेर येथे नानासाहेबांची पेशवे म्हणून द्वाही फिरवली. १८५७ चा उठाव मीरत, दिल्ली, लाहोर, आग्रा, झांशी, ग्वाल्हेर इ. ठिकाणी पसरला.
उठावात तात्याने नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इ. ठिकाणी दौरे काढले. जून १८५७ मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला, त्या वेळी तात्याने महत्त्वाची कामगिरी बजावली; परंतु तात्या, रावसाहेब, ज्वालाप्रसाद यांचा १६ जुलै १८५७ रोजी पराभव झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१६ जुलै १९८४*
इतिहासाचे भीष्माचार्य कै. वा. सी. बेंद्रे यांचा स्मृतिदिन
(जन्म - १३ फेब्रुवारी १८९४)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment