*आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१५ जुलै १५८३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ जुलै १५८३*
दोन पराभव पत्करले तरी पोर्तुगीज सैन्य आणि मिशनरी नाउमेद झाले नाहीत... ते आता पुरते हट्टास पेटले होते. दि.१५ जुलै १५८३ या दिवशी ते मोठ्या संख्येने कुकल्लीवर तिसऱ्यांदा चालून आले परंतु हिंदू आता थकले होते. त्यांना बाहेरुन कुमक येण्याची आशा नव्हती त्यांनी कुकल्लीचा कोट खाली करून आपल्या बायका मुलांसह आदिलशाही अंमलाखालच्या बाल्ली महालात स्थलांतर केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ जुलै १६११*
मिर्झा राजा जयसिंग यांचा अंबर (सध्याचे जयपूर) येथे जन्म.
वडील महासिंह आणि आई दमयंती यांच्या पोटी जन्म घेतलेले मिर्झा राजे जयसिंग हे अतिशय पराक्रमी सरदार होते. वंशपरंपरेने चालत आलेली सरदारी मान आणी सन्मान यामुळे एक स्वतंत्र राजा अशी प्रतिमा त्यांची तयार झाली. त्यांच्या ४ पिढ्यांनी मोगलांची चाकरी केली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ जुलै १६७४*
छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला त्यासमयी मोगलांचे दोन सरदार दिलेरखान आणि बहादुरखान हे मोगल साम्राज्याचे संरक्षण करत होते. यावेळी काही कारणास्तव औरंगाजेब याने दिलेरखानास उत्तरेकडे बोलावून घेतले त्यामुळे एकट्या बहादुरखानावर दक्षिणेतील जबाबदारी पडली होती. बहादुरखान हा पेड़गाव येथे छावणी टाकून स्वस्थपणे चैन करत होता आणि महाराजांना ही संधी मिळाली व राज्याभिषेकानंतर काही दिवसातच मराठ्यांनी पेड़गावी बहादुरखानाच्या छावणीवर हल्ला केला. पहिल्यांदा २ हजार मराठा घोड़दळाने खानाच्या छावणीवर हल्ला केला आणि खानाच्या सैन्यास आपल्या मागे ५० मैल दूर नेले व त्याचवेळी मराठ्यांच्या दुसऱ्या ५-७ हजार सैन्याच्या तुकडीने त्याच्या छावणीवर हल्ला केला. मराठ्यांनी या मोहिमेत जवळपास १ कोटी रूपये आणि २०० घोड़े स्वराज्यात सामील केले आणि छावणी जाळून टाकली ..
मराठ्यांनी बहादुरखानाच्या पेड़गाव येथील छावणीवर हल्ला केलेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १४-१५ जुलै १६७४

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ जुलै १६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
१५ जुलैला सहीसलामत सोडण्याबदल्यात शेरखानने राजांशी तह केला, तहानुसार खानाने राजांना
त्याचा सर्व मुलुख आणि २० हजार होन रोख दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ जुलै १६८०*
मुंबईकरांनी राजापूरमधील इंग्रजांना कळवले कि, "छत्रपती संभाजी राजांशी किंवा त्यांच्या मंत्र्यांशी सध्या तरी बोलणी करू नये त्याचा काहीही उपयोग होणार नाही."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ जुलै १८१५*
बडोद्याचे गायकवाडांचा वकिल गंगाधर शास्त्री राजकारणातील वाटाघाटीसाठी दुसरे बाजीरावाचे भेटीस पंढरपूरी आल्यावर त्यांचा १५ जुलै १८१५ ला खून पाडण्यात आला. आणि हे वकिलाच्या खूनाचे प्रकरण सर्व तत्कालिन हिंदुस्थानातील सर्व संस्थानात गाजले. केवळ हिंदुस्थानभरच नव्हे तर युरोपातही गाजले. परिणामी पेशव्यांचा सरदार त्र्यंबकजी डेंगळ्यावर त्याचे खापर फोडून त्याला इंग्रजांंनी शिक्षा केली. तो खून गंगाधर शास्त्री देवदर्शन आणि कीर्तन श्रवण करून पालखीतून आपल्या मुक्कामी जाण्यास हरिदास वेशीतून बाहेर पडल्यावरच वेशी जवळच झाला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१५ जुलै १८१८*
मुल्हेर किल्ला ब्रिटिशांच्या तावडीत सापडला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४