*महाराष्ट्रातील इतिहास संशोधक अभ्यासक लेखकांसाठी सुवर्णसंधी.*

*महाराष्ट्रातील इतिहास संशोधक अभ्यासक लेखकांसाठी सुवर्णसंधी.*

*श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य(भारत)आयोजित*
📕राज्यस्तरीय शोध निबंध स्पर्धा 2023📕
_🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩_______________________________
महाराष्ट्र हा शूरवीर आणि पराक्रमी महामानवांचा देश(राज्य)म्हणून ओळखला जातो अशा या महाराष्ट्रात अनेक कर्तुत्ववान इतिहास पुरुष होऊन गेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून सुरू केलेली घोडदौड पुढे अनेक  वर्ष अखंडितपणे सुरू राहिली ती महाराष्ट्रातील रांगड्या कणखर मावळ्यांच्या कर्तृत्वावरच आजही या कर्तृत्ववान महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र आपला जगभरात नावलौकिक वाढवत आहे याचं पराक्रमी आणि कर्तुत्ववान परंपरेतील एक नाव म्हणजे *दिल्लिदिग्विजयविर श्रीमंत महादजी शिंदे सरकार* स्व राष्ट्राच्या संरक्षणासाठी परकीय शत्रू समोर उभा ठाकलेल्या महाराष्ट्राचा आशिया खंडात दबदबा निर्माण करणारा आणि छत्रपती शिवरायांचे अहद तंजावर तहद पेशावर हे स्वप्नं पूर्ण करून दिल्लीच्या तख्तावर अधिकार गाजवणारा हा *महायौद्धा..* लाखभर मराठ्यांनी दिल्लीच्या रक्षणासाठी पानिपतच्या महासंग्रामात रक्ताचे पाट वाहिले त्या सर्व मराठ्यांच्या मृत्यूचा बदला घेणारा हा *महानायक..* आणि दिल्लीच्या लाल किल्यावर मराठ्यांचे जरीपटक्याचे निशाण दिमाखात फडकविणारा *दिल्लीदिग्विजयवीर..* ग्वाल्हेर नरेश श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या  ऐतिहासिक कामगिरीची व पराक्रमाची  विविधांगी ऐतिहासिक माहिती सर्वसामान्य वाचकांसमोर यावी या उद्देशाने श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांचे कार्य कर्तुत्व या विषयावर शोध निबंध स्पर्धा आयोजित करीत आहोत महाराष्ट्र आणि देशातील इतिहास संशोधक आभ्यासक लेखक आणि वाचक यांनी या सर्धेत सहभागी होऊन आम्हास सहकार्य करावे हि नम्र विनंती
या शोध निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना पुढील प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहेत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
▪️ *प्रथम बक्षीस - 21000, एकवीस हजार रुपये आणि प्रमाणपत्र*
श्री विलास विष्णू शिंदे अध्यक्ष,सह्याद्री शेतकरी उत्पादक  कंपनी, नाशिक यांच्या वतीने
▪️ *द्वितीय बक्षीस - 15000, हजार रुपये रोख व प्रमाणपत्र*
स्वर्गीय मोहनराव मारुती शिंदे माजी नगरसेवक कराड यांचे स्मरणार्थ मा.श्री अतुल मोहनराव शिंदे नगरसेवक कराड नगर परिषद यांच्या वतीने

▪️ *तृतीय बक्षीस -10000, दहा हजार रुपये रोख व प्रमाणपत्र*
कै. गुरुवर्य जालिंदर ज्ञानू शिंदे यांचे स्मरणार्थ प्रा सूर्यकांत जालिंदर शिंदे जरंडीकर शिंदे सरकार प्रांत तासगाव(सांगली)यांच्या वतीने

▪️ *चतुर्थ बक्षीस -7000,सात हजार रुपये रोख व प्रमाणपत्र*
स्वर्गीय गोविंदराव नारायणराव  शिंदे यांचे स्मरणार्थ प्रा विजय गोविंदराव शिंदे सरकार उपाध्यक्ष(विदर्भ विभाग) श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रांत खडकी बू. अकोला यांचे वतीने
▪️ *पंचम बक्षीस -5000,पाच हजार रुपये रोख व प्रमाणपत्र*
(चि. सुर्यवर्धन(केसरी) सुमितराव शिंदे- रवीराव सरकार प्रांत पुणे यांच्या वतीने)

*सर्व विजेत्या स्पर्धकांना चषक व सन्मानपत्र श्री जयकुमारदादा शिंदे सरचिटणीस भाजपा सातारा व श्री अजय शशिकांत शिंदे Mulberry Group of Hotels Mahableshwar & Pasure Bhor यांच्या सौजन्याने*

*स्पर्धेतील शोध निबंधाचे विषय*
 १) महादजी शिंदे सरकार यांचे लष्करी कार्य त्यांनी जिंकलेला प्रदेश व प्रमुख लढाया
२)महादजी शिंदे सरकार यांचे आध्यात्मिक
 कार्य
३)महादजी शिंदे सरकार यांचा अस्सल पत्रव्यवहार
४) महादजींचे परकीय धोरण
५)महादजी शिंदे सरकार यांचे मराठा साम्राज्या साठीचे योगदान

नियम व अटी
१)शोध निबंध 5000 शब्द अथवा त्यापेक्षा जास्त शब्दांचा असावा
२)शोध निबंध ऐतिहासिक संदर्भासहित असावा(संदर्भ ग्रंथ नावे देणे)
३)शोध निबंध दिनांक 30 ऑगस्ट 2023 पर्यंत आमच्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचावा
४)शोध निबंध माहिती अप्रकाशित व संशोधनात्मक असावी
   *शोध निबंध पाठवणेसाठी पत्ता व ईमेल आयडी*
श्री  सुहास रघुनाथराव शिंदे सरकार
मू पो वडगाव (ज. स्वा.)ता.खटाव जि.सातारा पिन कोड नंबर 415512
deepak.shinde940@gmail.com

        ▪️ आपले नम्र▪️
*श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य(भारत)8083445577,9764958590,9922061634,9923119610*

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४