आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१७ जुलै १६५३*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१७ जुलै १६५३*
छत्रपती शिवरायांनी "सिद्धेश्वर ब्रम्हे" यांना वर्षासन दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१७ जुलै १६७३*
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अस्सल कौलनामा अथवा अभयपत्र ! पुणे प्रांतातील मौजे चिंचवडच्या मोकदमाने ‘गावावर मोगलांची सततची आमदनी (ये-जा.. थोडक्यात हल्ला) होते, तसवीस (तोशिस) लागते यामूळे गावात राहवत नाही. जर साहेबांचा (शिवाजी महाराजांचा) हुकूम असेल तर मोंगलांशी (दिखाव्यापुरता) तह करून कौल घेऊन गाव सुरक्षित ठेवावे’ अशी इच्छा महाराजांकडे बोलून दाखवल्याने महाराजांनी त्याला ‘मोंगलांशी साजिश करताना भल्या माणसाला मध्यस्ती ठेऊन त्याच्या हाते मोंगलांकडून कौल घ्यावा आणि रयतेस काडीचाही आजार लागत नाही असे पाहूनच सुखे गावावरी रहावे. जर मोंगलांचा कौल पुरता विश्वासाचा नसेल तर गावावरी राहण्यास परवानगी नाही’ असा कौल दिला... हे पत्र दि. १७ जुलै १६७३ रोजीचे, औरंगजेबाशी असलेला पुरंदरचा तह मोडल्यानंतरचे आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी असलेला तह मोडला आणि तहातले किल्लेपरत जिंकून घेतले यामूळे मोंगल भडकून पुन्हा स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर हल्ले चढवत होते. या कौलनाम्याच्या माथ्यावर महाराजांची ‘प्रतिपच्चंद्रलेखेव’ ही राजमुद्रा आहे, त्याखाली मायन्यात डाव्या बाजूला महादजी शामराज यांची मुद्रा असून अखेरीस ‘मर्यादेयं विराजते’ ही मर्यादा-मोर्तब आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१७ जुलै १६७७*
६ जुलै रोजी झालेल्या "छत्रपती शिवराय" आणि मदुरै'चा नायक "चौकनाथ" यांच्यात झालेल्या तहानुसार चौकनाथ तब्बल एक लाख रूपयांची खंडणी घेऊन आपल्या वकीलामार्फत शिवरायांपुढे हजर.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१७ जुलै १६८०*
राजापुरकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना कळविलेला वृत्तांत!
"इंग्रजांनी तहाची वासलात लावली, युद्धात पकडून आणलेल्या गलबतांचा सिद्दीने मुंबई बंदरात लिलाव केला. छत्रपती संभाजी महाराजांना आमचा संशय येईल. सिद्दी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी एकाच वेळी सलोखा राखणे शक्य नसल्याचे ते कळवितात, तसेच तसेच रहिवाशांच्या हालाची कल्पना देतात. छत्रपती संभाजी महाराज आता त्यांच्या गलबतांवर हल्ला चढवतील.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१७ जुलै १७३४*
मराठ्यांच्या भीतीने सवाई जयसिंहाने मेवाडच्या सर्व रजपूत राजांची बैठक बोलवली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१७ जुलै १७३७*
दिल्लीचा दक्षिणेस तीन मैल झील तलावावर मुक्काम श्रीमंत बाजीराव केला व बादशहास पत्र लिहून पुढील बेत
कळविला. बादशहाने त्यास आपले बारा हजार स्वार, वीस हजार पायदळ व तोफखाना आपला सरदार अमीरखान याजबरोबर देऊन बाजीरावावर हल्ला करण्यास पाठविले. शहरात सर्वानी सावध असावे अशा ताकीदी देण्यात आल्या. मोगल फौजेने मराठ्यांवर चाल दिली. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी भ्याल्यासारखे मागे सरून मोगलास पूर्णपणे अंगावर घेतले. मोगल पकडीत आलेले दिसताच सखोजी जाधव, मल्हारराव व राणोजी शिंदे यांनी चवताळून जाऊन मोगलास हातोहात तलवारीने कापून काढीले. काही जखमी झाले. काही जीव घेऊन परत गेले. जखमी झालेल्याच्या झुंडी शहरात शिरल्यावर शहरवासियांची बोबडीच वळली. बाजीराव साहेबांनी मनात आणिले असते तर दिल्ली लुटून फस्त केली असती. पण तसे त्यांनी न करता दिल्लीवासियांच्या मनातील घबराट नाहीसा करण्यासाठी झील तलावावरील मुकाम हलवून सात कोसावरील सराई आला बिदीखान येथे ते जाऊन राहिले. तेथे जाताच वजीर व गाजीउद्दीन आपल्यावर चालून येत आहेत हे ऐकून बाजीरावांनी त्वरेने दक्षिणेस कोट पुतळीस ९३ मैल येऊन पोचले. खानडौरान सादतखान वगैरे मातबर सरदार बादशहाच्या बोलावण्यावरून दिल्लीजवळ वजीरास येऊन मिळाले. पण श्रीमंत बाजीराव पेशवे लांब गेलेले त्यांचा पाठलाग करण्यात हंशील नाही असा पोक्त विचार करून सर्व सैन्य स्वस्थ बसले. मराठ्यांची धाड निघून गेलेली ऐकून दिल्लीत आनंद झाला. बादशहाच्या अवाढव्य फौजा अंगावर
आल्या असता त्यास चीत करून बादशहास न दुखविता दिल्लीवर अचानक धाड घालण्याचा धूर्त प्रयोग बाजीरावांनी केला. त्यामुळे ते शाहू महाराजांच्या प्रशंसेस पात्र झाले. स्वारी दिग्विजय मिळवून मोहिम सिद्धीस नेऊन
तारीख १७ जुलै १७३७ रोजी पुण्यास आली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*१७ जुलै १७९८*
नाना फडणवीसांची सुटका
ऑक्टोबर १७९५ ला सवाई माधवरावांचा मृत्यू झाल्यांनतर पेशवाई साठी त्यांच्या घराण्यात कुणी वारस राहिला नव्हता. राघोबा दादाचा थोरला मुलगा म्हणून बाजीराव हाच वारस होता. परंतु राघोबादादा व नाना फडणवीस ह्यांच्यातील वैमनस्यामुळे ( नारायणरावच्या हत्तेमुळे) नानांना भीती होती कि पेशवाईची सूत्रे बाजीरावकडे गेली तर तो नानाने राघोबा कुटुंबीयांना जो वनवास घडवला त्याचा बदला नक्की घेईल. बाजीरावला पेश्वेपदी येण्यापासून अडविण्यासाठी नानांनी बऱ्याच राजकीय खेळ्या खेळल्या. परंतु बाजीराव पण त्यांना पुरून उरला. दौलतराव शिंदे महादजी शिंदेंचा उत्तराधिकारी बाजीरावच्या बाजूने होता. तर नानांनी इंग्रज, निजाम व नागपूरकर भोसल्यांबरोबर संधान बांधले होते. शिंद्यांवर दबाव आणण्यासाठी नानांनी इंग्रज दिल्लीवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची अफवा सोडली. त्यामुळे दौलतराव ने आपली जागीर वाचविण्यासाठी आपले पुण्याच्या आसपास आणलेले सैन्य उत्तरेकडे रवाना केले. त्यावेळी नाना व शिंदे यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे बाजीरावास पेश्वेपदी नियुक्त होण्यास नानाने कुठली आडकाठी करू नये, नाना पूर्वीप्रमाणे मुख्य कारभारी राहतील, बाजीराव पेश्वेपदी आरूढ झाल्यावर दौलतराव उत्तरेकडे निघून जावे, शिंदे आपल्या जांब गावी पोचल्यावर पन्नास लाख व गोदावरी ओलांडल्यावर आणखीन पन्नास लाख रुपये देण्याचे इ. ठरले. ४ डिसेंबर १७९६ ला बाजीरावास पेश्वायीची वस्त्रे मिळाली व तो पेशवा झाला. नाना पुन्हा कारभारी झाले. परंतु बाजीराव, दौलतराव व नाना तिघांमधील एकमेकांविषयीचा अविश्वास कायम राहिला. नानाच्या नियंत्रणात बाजीरावला सुरक्षित वाटत नसल्याने तो खराडीला शिंद्यांच्या छावणीतच राहत असे.
नानाने कारभार सांभाळल्या बरोबर दौलतराव ने नानांस सांगितले ते( शिंदे) पुणे सोडून गेल्यावर द्यावयाचा पैसा पुण्यातच द्यावा. बाजीरावची पण आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली होती, दौलतराव व बाजीराव ह्यांची खात्री झाली होती कि नानांकडून सहजासहजी पैसा हाती लागणार नाही. तेव्हा त्यांनी कपट कारस्थान करून नानास अटक करण्याचे ठरविले. शिंदेंच्या फौजेत एक फिलोज नावाचा फ्रेंच अधिकारी होता ज्याच्याशी नानांचे मित्रत्वाचे संबंध होते. फिलोज ने नानांची भेट घेऊन सांगितले कि शिंदेंचे सैन्य लवकरच करारा प्रमाणे पुणे सोडून उत्तरेकडे कूच करणार आहे व त्यानिमित्त आयोजित मेजवानीस उपस्थित राहण्याची बायबल धर्मग्रंथावर हात ठेवून विनंती केली. तरी पण नाना आपल्या दीड हजार सैनिक व काही विश्वास लोकांना घेऊन शिंद्यांच्या छावणीत गेले. शिंद्यांच्या सैनिकांनी नाना व त्यांच्या साथीदारांस कैद केले. बराच प्रयत्न करून हि नानाकडून पैसा न मिळाल्याने नानांची रवानगी अह्मदनगर किल्ल्यात केली गेली. इकडे बाजीराव व शिंदे ह्यांच्यातहि मतभेद निर्माण झाले व बाजीरावला शह देण्यासाठी दौलतराव ने १७ जुलै १७९८ ला नानांची मुक्तता केली. दोन्ही पक्षात पुन्हा एक करार झाला. बाजीराव पेश्वेपदी आरूढ झाल्यावर नानाबरोबर त्याचे संबंध ठीक झाले नाही.
दोन वर्षांनी १२ मार्च १८०० ला मराठा साम्राज्याच्या ह्या मुत्साद्ध्याचे निधन झाले. त्यावेळी नवकोट नारायण म्हणविल्या जाणाऱ्या नानांची आर्थिक स्थिती अशी झाली होती कि त्यांच्या अरब सैनिकांनी पगाराची थकबाकी चुकती केल्या शिवाय नानांचे पार्थिव उचलू दिले नाही. शेवटी दुर्लाभ्दास सावकाराने पैशाची व्यवस्था केली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment