४) महादजींचे परकीय धोरण


४) महादजींचे परकीय धोरण


उत्तर भारतीय नागरिक आणि राज्यकर्ते महादजींकडे कसे पाहत?

मराठ्यांबाबत त्याकाळी उत्तर भारतात संमिश्र भावना होत्या, असं प्रा. देशपांडे सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "रोहिल्ला आणि जाट यांच्यासोबत मराठ्यांचे कायमच संदिग्ध संबंध होते. रोहिल्यांच्या दृष्टीने मराठे हे उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात आलेले Intruder म्हणजे घुसखोर होते. हा प्रदेश रोहिल्यांच्या अंमलाखाली होता. नजीबउद्दौलाचा हा प्रांत होता. त्याने नजीबाबाद वसवलं होतं. या सगळ्या भागात मराठ्यांचा रोहिल्यांशी संघर्ष सुरू असे. महादजी शिंदेंकडे सशस्त्र सैन्याचं आधुनिकीकरण करणारा सेनापती म्हणून पाहिलं जातं."

त्या काळात मराठा, मुघल, रोहिला अशा सगळ्याच सैन्यांकडे वसुली करणाऱ्या, लूट गोळा करणाऱ्या सैनिकांचा ताफा असे. त्यांना 'पिंडारी' म्हटलं जाई. पिंडावरचंही लुटणारा म्हणून 'पिंडारी'

एखाद्या भागात दहशत निर्माण करून जम बसवणं, सैन्यासाठीचा शिधा, रक्कम गोळा करणं हा यामागचा हेतू असे.

17 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून हे पिंडारी मराठा सैन्यासोबतही असत असं   ब्रिटानिका एनसायक्लोपिडीयाने म्हटलंय.

एखाद्या प्रदेशाची टेहळणी करण्यासाठी, मोहीम संपुष्टात आणण्यासाठी, सैन्याला मदत म्हणूनही या पिंडारींचा वापर केला जाई असं प्रा. देशपांडे सांगतात. नंतरच्या काळात या पिंडारींची दहशत इतकी वाढली की ब्रिटीश गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सने त्यांच्या विरोधात मोहीम उघडली. 1817-18 च्या सुमारास झालेल्या या युद्धाला      Pindari Warम्हटलं जातं.


सावित्रीबाई फुले विद्यापीठातल्या इतिहास विभागाच्या पोस्ट डॉक्टरल फेलो डॉ. गुंजन गरूड सांगतात, "पिंडारी सगळ्या सैन्यांमध्ये असायचे. शिंदे, होळकरांच्या सैन्यातही पिंडारी असायचे. जिंकलेल्या प्रदेशातली खंडणी गोळा करण्याचं काम त्यांच्याकडे असे. लूटमार करणं हे त्यांचं काम होतं. दबदबा निर्माण करायचा तर दणकट माणसं हवीत. तो दबदबा निर्माण करायचं काम हे पेंढारी करायचे. प्रदेशात जाऊन युद्ध न करता खंडणी गोळा करण्याचं काम ते करीत."

मराठा सैन्यांसोबतचे पिंडारी गावांमध्ये लूट करत असल्याने मराठा सैन्याविषयी त्याकाळच्या उत्तरेतल्या जनतेत संमिश्र भावना होत्या. महादजींनी फ्रेंच अधिकारी सैन्यात नेमल्याने राजपूत मराठा सैन्यावर आणि महादजींवर विशेष खुश नव्हते. उत्तरेतल्या राज्यकर्त्यांसाठी देशावरून आलेले शिंदे हे परप्रांतीय होते.

महादजी शिंदेंची वानवडीमधली छत्री

पुण्याजवळच्या वानवडीमध्ये 12 फेब्रुवारी 1794 ला महादजींचं ज्वराने निधन झालं. महादजींच्या समाधीसाठी सवाई माधवरावांनी वानवडीमध्येच जमीन दिली. महादजींची छत्री आजही वानवडीत आहे. महादजींना अपत्य नसल्याने त्यांनी त्यांच्या भावाच्या नातवाची दौलतरावांची जहागिरीचा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती.





महादजींचा मृत्यू

दिल्लीतल्या वास्तव्यानंतर महादजी शिंदे 1792मध्ये पुण्याला परतले. वानवडीला भरलेलया दरबारात त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांना मुतालिकी अर्पण केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षं महादजी पुण्यातच वास्तव्याला होते.


संदर्भ

  • महादजी शिंदे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33475/
  • शिंदे घराणे, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/33474/
  • ग्वाल्हेर संस्थान, मराठी विश्वकोश - https://vishwakosh.marathi.gov.in/22727/
  • पिंडारी, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari
  • पिंडारी वॉर, ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया - https://www.britannica.com/topic/Pindari-War
  • English Record of Maratha History Vol - 1, Mahadaji Sindhia and North Indian Affairs - Author Jadunath Sarkar
  • https://www.indianculture.gov.in/ebooks/english-record-maratha-history-voli-mahadji-sindhia-and-north-indian-affairs-1785-1794
  • डॉ. गुंजन गरूड, पोस्ट डॉक्टरल फेलो, इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
  • पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक
  • प्रा. अनिरुद्ध देशपांडे, दिल्ली विद्यापीठ

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४