इतिहासाच्या_पानातील_काही_अज्ञात_वीर_शिंदे_पुरुष

#इतिहासाच्या_पानातील_काही_अज्ञात_वीर_शिंदे_पुरुष

महाराष्ट्रास इतिहासाचा  प्राचीन वारसा आहे, महाराष्ट्राच्या ज्ञात राजकीय इतिहासाच्या पाऊलखुणा सातवाहन काळ (इ.स.पूर्व २५०) पर्यंत जातात. 
तेव्हा पासुण ते अगदी शिवकाळ व पुढे म्हराठा साम्राज्याची इतिश्री होऊन भारत देश स्वातंत्र्य होईपर्यंत अनेक महाराष्ट्र तील पुरुषांनी शात्र धर्माची पराकाष्टा केली. व आपल्या कुळाचे घराण्याचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले.त्यातीलच एक प्राचीन व गौरवशाली वारसा लाभलेले कुळ म्हणजे  शिंदे कुळ. 

शिंदे कुळ हे महाराष्ट्राच्या प्राचीन कुळांपैकीच एक आहे. आज महाराष्ट्रातील बरेच कुळांचे मूळ सबंध हे इतिहासातील राजपुताना व मध्यभारतातून दक्षिणेत संकट काळात स्थालनंतरीत झालेल्या वीर पुरुषांशी जोडले गेले आहेत. परंतू शिंदे कुळ हे महाराष्ट्रातील च आद्य कुळ आहे.

शिंदे कुळाचा अनेक प्राचीन उल्लेख हा  चालुक्यसबंधी इतिहासाची पाने वाचल्यास सापडतो. चालुक्य काळात शिंदे कुळ हे सेन्द्रक नावाने ओळखले जात. चालुक्य व कदंब ह्या प्राचीन कुळांशी शिंद्यांचे विवाह सम्बन्ध चे उल्लेख ही मिळतात.

 तर अशा ह्या प्राचीन शिंदे कुळातील काही वीर पुरुषांचे इतिहासाच्या पानातील उल्लेख  आपण पाहूया. 

सुरवात

१) #बाळाजी_शिंदे -

    बाळाजी शिंदे हा पुरुष १२ व्या शतकात होऊंन गेला. हा पैठण च्या भौम राजाच्या पदरी असलेला एक बऱ्यापैकी समकालीन विख्यात तलवार बहाद्दर होता.

 इ.स.११४० मध्ये अहिलवडा // अहिलंपट्टणम च्या चौलुक्य चा मंडलिक असलेल्या चंपानेर चा गोवर्धन बिंब राजा चा लहान भाऊ  प्रताप बिंब राजा जो शिलहारांच्या ताब्यातील ऊत्तर कोकण जिंकण्यास निघाला होता. त्याच्या मदतीस  पैठण च्या राजाने स्वतःचे दोन हजार सेंन्य हे बाळाजी शिंदेंच्या नेतृत्वात दिले होते.

 ह्या सेण्याचा मदतीने बिंब राजाने शिलहारांच्या ताब्यात असलेला समूळ उत्तर कोकण चा प्रदेश जिंकून घेतला होता.(ह्यात मुंबई चा प्रवाही टापू, थेट वाळकेशवर पर्यंत चा प्रदेश ही होता)ह्या लढाईत प्रताप बिंब राजास बाळाजी शिंदे चे विशेष सहायय झाले होते. 

पुढे ह्या बाळा जी बरोबर आलेले इतर शिंदे पुरुष(त्याचा वनश किंवा नातेवाईक) उत्तर कोकणात च वसल्याचे कळते.ह्यांच्याकडे आत्ताच्या मुंबई प्रांत (पूर्वीचे साष्ठी) मधील मालाड येथील #एरगळ_ची_पाटीलकी होती. इ.स.१२१२ व इ.स. १२२४ युद्धात त्यांनी पराकर्म केले. त्याचा उल्लेख खालील पोवाड्यात येतो

परदळ देखता केशवदेवाने देसायांना हांकारा दिला. देसाय देसाय देश मिळाला. #सिंद्याचा_जमाव_थोर_झाला. 
नगाऱ्या घाव घातला. कर्णे, बांके, शिंगे, दफ, काहाळा, विराणी वाजली. पाईकापाईक झाली. कळव्या युद्धा थोर झाले.'

२) #रामजीराव_रवीराव_शिंदे - 

रामजी राव शिंदे हे १६ व्या शतकाच्या पूर्वार्धात बहमनी सुलतानाच्या पदरी होते. त्यावेळस कोकनातील वारराव कोळी हा सरदार बहमनी सत्तेस जुमानत नसल्याने सुलतानाने त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी रामजीवरावांवर दिली. व त्यांनी ही दिलेली जबाबदारी  समर्थ पणे पेलत महाबळेश्वर मार्गे कोकणात उतरून इ.स. १५०८ ते इ.स.१५१० सतत दोन वर्षे संघर्ष करत  वारराव कोळी याचा पडावं केला. 

ह्या विजय प्रतिथ्य रामजीरावांनी तिथे राम वरदायनी देवीचे मंदिर बांधले.

व ह्या युद्ध नन्तर सुलतानाने त्यास कुडाळ व दादर येथे जहागीर दिली. त्यांचे वनशज आजही तिथे आहेत व ते दसपट शिंदे म्हणून ओळखले जातात.आजही त्यांची रामजीराव ह्यांच्या पासून सम्पूर्ण वनशावळ उपलब्ध आहे 

३) #स्वराज्याचे_प्रथम_सरनौबत_माणकोजी_दहातोंडे

सदर यादी ही शिंदे पुरुषाची असली तरी माणकोजी दहातोंडे ह्यांचे नाव समाविष्ठ करण्याचे कारण की त्यांचे पूर्वाश्रमीचे कुळ ही शिंदे च होते. व नन्तर दहातोंडे हे उपणाम लागले.

माणकोजी हे स्वराज्याचे प्रथम सरनौबत होते. त्यांनी भोसले कुळात शहाजी महाराज व  शिवाजी महाराज ह्या पितापुत्रांची तबबल ३५ वर्षे सेवा केली. 
माणकोजींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा ह्या गावी इ.स. १५९२ रोजी झाला. 

माणकोजींनी सुरवातीस निजामशाहीत शहाजी राजांच्या पदरी राहून मोगलांच्या विरुद्ध अनेक लढाया मारल्या. नन्तर पुढे सहजी महाराज कर्नाटकात गेल्यावर तेही तिकडे काही काळ राहून नन्तर मात्र १६४२ मध्ये जिजाऊ मासाहेबांबरोबर देशावर आले. व स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून नियुक्त झाले. 

फत्तेखानाविरुद्ध पुरंदर च्या लढाईत मानकोजींचा सक्रिय सहभाग होता. 

पुढे मानकोजींनी #लोहगड_व_विसापूर हे दोन गड स्वतः जिंकून घेतले होते. 

मानकोजींनी मोरेंच्या विरुद्ध जावळीच्या लढाईत व त्यांनतर अफजलखानाविरुद्ध प्रतापगड च्या लढाईत दोन्हीवेळेस रणतोंडी चा घाट अडवून धरला होता. व त्यामार्गे शत्रूची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. 

 पुढे मात्र वयोमानामुळे त्यांनी शस्त्र खाली ठेवले. व जुलै - ऑगस्ट १६६२ मध्ये शिवापूर येथे त्यांचा मृत्यू झाला. 

टीप - 
काही इतिहास अभ्यासक / संशोधक तुकोजी चोर ह्यांस प्रथम सरनौबत मानतात.

व मानकोजींनी महाराजांच्या हुकुमाची नाफार्मनी केल्याने शिक्षेस पात्र ठरल्याचे उलकेख करतात. 

४) विठोजी शिंदे - 

हे विठोजी शिंदे सातारा येथी बेंद्रे ह्या गावचे असून सरनौबत प्रतापराव गुजर ह्यांच्या पदरी होते.

 बहलोल खानास जीवनात सोडल्या प्रकरणी महाराजांनी प्रतापरावांस बोल लावला. व त्यामुळे उदिगण होऊन ते नेसरी च्या खिंडीत देहभान विसरून एकटेच खानावर चालून गेले. ह्या आशा वेळे त्यांच्या साथीस विठोजी शिंदे व  इतर ५ साथीदार होते.  ह्या आशा परिस्थितीत सेनापतींचे अनुकरण करत ह्या विठोजी व इतरांनी स्वतःचा जीव खानच्या छावणीत खर्ची घातला. 

उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या चढाईचा निकाल स्पष्ट पणे समोर  दिसत असून ही विठोजींनी व इतर साथीदारांनी सेनापतिंची साथ न सोडता जगदंबेच्या भुत्यांचे आवावाहन करीत खानाच्या छावणीत मृत्यू चा गोंधळ घातला. 

कवी कुसुमाग्रज ह्यांनी मराठ्यांच्या इतिहासातील ह्या साक्षात  मृत्यू वर चाल करून जाणाऱ्या घटनेवर आजारामर काव्य लिहले आहे. 

काव्य - वेडात मराठे वीर दौडले सात

शिवशाहीत नेसरीकर घराणे होते,वेडात मराठे वीर दौडले सात या नेसरीतीळ लढाईत प्रतापराव गुजर यांच्यात सोबत विठोजी शिंदे हे सरदार होते,विठोजीराव शिंदे हे शेद्रे बेंद्रे सातारा या गावचे

५) #लखमु_शिंदे - 

लखमु शिंदे ह्यांचे पूर्वाश्रमीचे उल्लेख काहीच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे मूळ ठिकाण, वतन, वनश ह्या बाबत इतिहास पूर्णपणे अनभिज्ञ आहे. 

लखमु शिंदे ह्यांनी १६९० च्या आसपास औरंगाबाद ते सोलापूर ह्या राजमार्गावर मोघलांना अक्षरश हैराण करून सोडले होते. ह्याच काळात लखमु शिंदेंनी रावदलपत बुंदेला व मामुरखान ह्यांच्या विरुद्ध भूम, माणेगाव, तुळजापूर येथे छापे घालून लुटालूट करत धावपळीच्या लढाया केल्या होत्या. 

पुढे मात्र देवराई गावात ह्यांच्यात मोठी लढाई  झाली ह्या लढाईत  #लखमु_शिंदे_सोबत_तीन_हजार_स्वार होते.  मात्र लढाईत अपयश येउन त्यांचे भाऊ बंद मारले गेले व ते स्वतः कैद झाले.ह्यांनंतर मात्र त्याचं बाबद्दल माहिती मिळत नाही.  

हा विजय मोघलांस एवढा महत्वाचा होता की बादशाहने ह्या विजयाबद्दल राव दलपत बुंदेलाची मनसब ५०० ने वाढवली. 

६) #रेतोजी_शिंदे - 

रेतोजी शिंदे हे बाजी जेधे (सर्जेराव) ह्यांच्याकडे सरदार होते.

१६८९ - १६९० च्या दरम्यान हे रेतोजी शिंदे #जिंजीस_जाऊन_छत्रपती_राजाराम_महाराजांना मावळातील वतनांच्या मसलती साठी भेटले होते. (जेधेंच्या वतीने)
त्या काळात जेधेंचा शब्द मावळात प्रमाण मानला जात असे.  व मावळातील सर्व पूर्वाश्रमीच्या वतनदारांनी जेधेंवर ह्या बाबी सोपवला होत्या. म्हणजेच सम्पूर्ण १२ मावळ खोऱ्यातील वतनाच्या मुद्दा सोडवण्याची जबाबदारी रेतोजी शिंदे ह्यांच्या  वर होती. व त्या साठी त्यांना जिंजी दरबारात पाठवले गेले. ह्या वरून त्यांची योग्यता लक्षात येते. 

७) #बाजी_शिंदे - 

लखमु शिंदे ह्यास प्रमाणे ह्यांचे पूर्वाश्रमीचे उल्लेख काहीच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे मूळ ठिकाण, वतन, वनश ह्या बाबत इतिहास पूर्णपणे अनभिज्ञ आहे. 

बाजी शिंदेंचा उल्लेख येतो तो  #मराठा_कालीन_पत्रांमध्ये. 
त्यावेळ सेनापती संताजी घोरपडे छत्रपती राजाराम महाराजांशी बिघाड करून जिंजी वरून महाराष्ट्रात आले. त्यावेळेस हुकूमतपनाह रामचंद्र पंत अमात्य ह्यांनी त्यांस व इतर एक सरदारांस सेनापतींची समजूत काढण्यास पाठवले होते. 

बाजी शिंदे ह्यांस अमात्य ह्यांस कडून स्वराज्याच्या सेनापती ची दिलजमाई ची जबाबदारी दिली जाते. ह्यांतच त्यांचा समकालीन स्वराज्यातील स्थान व योग्यता लक्षात येते. 

८) #बत्तीस_शिराळ्या_चे_ठाणेदार_शिंदे_पुरुष
     (नाव अज्ञात)

छत्रपती शंभाजी महाराजांच्या काळात हा पुरुष बत्तीस शिराळाचा ठाणेदार होता. ह्याचा नक्की काळ ठरवायचं झाल्यास शंभाजी महाराज ह्यांच्या काळात #मिरज_चे_ठाणे_मोगलांनी_घेतले_होते,त्या वेळेस हा पुरुष बत्तीस शिराळाचा ठाणेदार होता. 

९) #संताजी_शिळिंमकर (शिंदे)

संताजी शिळिंबीकर हे गुंजन मावळातील पिढीजात वतनदार होते.  त्यांचे शिळीमकर हे घराणे मूळचे सतारा मधील  वाई प्रांतातील श्री लिंब ह्या तीर्थ क्षेत्र ठिकाणचे. 
गुंजन मावळात आल्यावर पूर्वीच्या वास्तव्याचे ठिकाण श्रीलिंब वरून व पुढे त्याचा अपभ्रंश होऊन शिळीमकर हे उपणाम कायम झाले. 

ह्या घराण्याकडे निजामशाही काळात राजगड ची (भोरप्याचा डोंगर,मुरुम्ब देवाचा डोंगर, शहामृग गड) किल्लेदारी होती. पुढे नंतर वनशवाढीने ह्या कुटुंबाचे तीन घरात रूपांतर झाले व ह्याची वाटणीचे शिवकाळातील कागद आजही उपलब्ध आहेत. ह्यांच्या वाटण्यात शहाजी महाराज, रनदौलाखान, मोरोपंत पेशवे ह्यांनी निवाडे दिले आहेत. 

ह्या घरणयाने जवळीच्या लढाईत, प्रतापगड चालढाईत व सिंहगड च्या छाप्यात सक्रिय सहभाग घेतला होता. रायरीचा डोंगर (रायगड) हा ह्याच घराण्यातील पुरुषांनी मोर्यांकडून ताब्यात घेतला होता.

पुढे संताजी हे द्वितीय शिवाजी महाराज (राजाराम महाराज पुत्र) ह्यांच्या काळात #राजगड_वर_सुवेळा_माचीचे_तटसरनौबत  होते. औरंगजेब बादशाहने राजगडावर आक्रमण केले त्या वेळेस संताजी शिळिंबकर प्रनोप्रणाने झुंजले. व २० डिसेंबर १७०३ रोजी सुवेळा माचीवरील बिनी बुरुजावर समोरील धमधम्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा स्वतःच्या छातीवर झेलून धारातीर्थी पडले. 

सुवेळा माचीवर गणेश शिल्पाच्या उजविकडे तटबंदीला लागून च त्यांची #वीरगळ आजही तिथे आहे. 

१०) #महिपतराव_शिळीमकर (शिंदे) 

हे संताजी शिळीमकर ह्यांचे बंधू होत व हे ही #राजगड लढ्यात शर्थीने झुंजले होते. 

११) #सुभानजीराव_शिळीमकर - शिंदे.

हे ही संताजी शिळिंमकर ह्यांचे भाऊ असून ते राजगड च्या आधी औरंगजेबाच्या विरुद्ध #पुरंदर_च्या_युद्धात #धारातीर्थी पडले. 

१२) #नेमाजी_शिंदे - 

नेमाजी शिंदे हे जिंजी च्या वेढ्यात राजाराम महाराजांना मिळाले असा एक सर्वसामान्य समज आहे, परंतु नेमाजी सुरवातीस शिवकाळात स्वराज्यात होते. सभासत बखर मध्ये शिलेदारांच्या पागेच्या यादीत त्यांचा उल्लेख आहे. पुढे शम्भू काळात ते मोगलांकडे गेले असावे. पण वर सांगितल्या प्रमाणे ते पुन्हा  २३ नोव्हेंम्बर १६९० रोजी ते जिंजीस स्वराज्यात आले. 

पुढे त्यांचा पराक्रम सर्वश्रुत असल्याने इथे सविस्तर देणे टाळले जात आहे.

परन्तु त्यांच्या काही ठराविक नोंदी पुढील प्रमाणे. 

१६९३ मध्ये अल्पकाळा साठी जिंजी चा वेढा उठल्याने ते देशावर आले होते. 

नेमाजिंनी आपल्या लष्करी कारकिर्दीत दक्षिणेतील #जिंजी_हैद्राबाद पासून महाराष्ट्रातील #व्हरांड_खानदेश_सोलापूर_नंदूरबार_थाळनेर व #बृहनपूर ते #भोपाळच्या पुढे व #माळव्यात_उजैन_मालोदा_काळबाग_बुंदेलखडतील_सिरोंज पर्यंत यशस्वी  मोहिमा काढल्या.

 विशेष म्हणजे ह्या सर्व मोहीम त्यांनी दस्तुरखुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत  असताना काढल्या. 

 त्यांनी #व्हरांड व #नंदूरबार येथील #रुस्तमखान व #हुसेनखान ह्या मोघली सुभेदारांना ही लढाईत जीवंत कैद केले होते. 

ब्राहपुरीच्या मोघली छावणी वर केलेल्या हल्ल्यात ही त्यांचा समावेश होता. 

शिव काळ पासून शाहू महाराज असे जवळ जवळ पाच छत्रपतींची सेवा करणारा हा काही मोजक्या सरदारां पैकी एक असा  रणांगणावरील जातीवंत मोहरा होता. ह्याच्या बद्दल #शेवटचा_उल्लेख १७१८ मध्ये खानदेशातील नेमणुकीचा मिळतो . 

१३) #कर्णाजी_शिंदे - 

कर्णाजी शिंदे हे कुडाळचे होते. त्यांनी स्वराज्याच्या एन भरारी च्या दिवसात अनेक महत्त्वाच्या लढाईत भाग घेतला. 

कर्णाजी चंदन वनदन व माहुली किल्ल्याचे किल्लेदार होते. 

कर्णाजी शिंदे ह्यांचा उल्लेख आपल्याला १७३७ ची वसई ची मोहीम व १७३९ ची   त्रिचिरपल्ली  येथील ही मोहिमेत येतो.

कर्णाजी शिंदे ह्यांनी १७३७ ते १७३९  ह्या काळात वसई चा किल्ला, केळवे माहीम (महिकावती), केळवे पाणकोट व भुईकोट ह्यास अनेक वेळा वेढा देत, शेवटी जिंकून घेतले. त्या शिवाय ह्या मोहिमेत इतर अनेक घडा मोडीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.

त्यांनतर पुढे १७३९, मध्ये दक्षिण मोहिमेत त्यांनी त्रिचिरपल्ली किल्ल्या च्या वेढ्यात विलक्षण असा पराक्रम करत किल्ला जिंकून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. व मोहिमेत इतर ठिकाणी ही पराक्रम केला होता. 

कर्नाजींनी नाशिक जिल्ल्यातील त्रिलंगवाडी गड व प्रसिद्ध असा हरिषचन्द्र गड अनुक्रमे १७४४ व १७४८   मध्ये जिंकून स्वराज्यात आणला. ह्या बद्दल कर्नाजींना #सोन्याचे_कडे_बक्षीस मिळाले होते.

१४) रामोजी शिंदे - 

रामजी शिंदे हे मराठ्यांच्या वसई मोहिमेत सहभागी होते. व त्यांनी उत्तर कोकण मधील महत्वाच्या डहाणू चे ठाणे व किल्ला एन युद्ध च्या धामधुमीत ११ जानेवारी इ.स.१७३९  कबीच केला होता .

रामजी हे अतिशय महत्वाचे सरदार असावेत, कारण त्यांच्या नावापुढे राजेश्री हा शब्द कागद पत्रात येतो. 

१५) गुणजीराव शिंदे - 

गुणजीराव हे वसई च्या मोहिमेतील एक नामांकित सरदार होते. 

२८ जून १७३७ रोजी ते ४००० फौजे सकट व इतर सरदारांच्या साथीने बहादूर पुऱ्या हुन  वसई च्या कोटावर चालून गेले. परन्तु  अपयशी होऊन धारातीर्थी पडले. 

१६) रुद्राजी शिंदे - 

रुद्रजी शिंदे हे वसई च्या मोहिमेत सक्रिय होते. 
त्यांच्या बद्दल सध्या तरी वसईची मोहीम व्यतिरिक्त जास्त महिती मिळत नाही. 

१७) कृष्णाजी शिंदे- 

कृष्णाजी शिंदे हे १७४८ पासून पुढे प्रसिद्ध असे हरिषचन्द्र गड चे किल्लेदार होते. 

१८) येसाजी शिंदे - 

येसानी शिंदे हे तारगळ च्या शिंदे घराण्यातील होते.
त्यांच्या निष्ठा ह्या कोल्हापूर च्या छत्रपतीस वाहिल्या होत्या. छत्रपतींनी त्यांना #सेनासाहिबसुभा हे पद दिले होते. 

 त्यांच्या बहिणीचा म्हणजेच जिजाबाईसाहेब महाराणी ह्यांचा विवाह छत्रपती शंभाजी महाराज (कोल्हापूर गादी) ह्यांच्याशी झाला होता. महाराजांच्या मृत्यू पश्चयात त्यांनी 
पोर्तुगीजांनी सिंधुदुर्गावर केलेलं आक्रमण परतवून लावले होते. व पुढे बारभाई कारस्थानच्या वेळेस महादजी शिंदेंनी कोल्हापूर वर केलेल्या स्वारी समोर ते खंबीर पणे उभे राहिले होते. 

सिंधुदुर्ग वर सध्या अस्तित्वात असलेलले #शिवछत्रपतींच्या_उजव्या_हाताचा_आणि_डाव्या_पायाचा_ठसा वरील कोनाडे व गच्ची (मंदिर) येसाजी शिंदेंनी महाराणी जिजाबाई साहेब ह्यांच्या आज्ञेने बांधले. व त्यास नैवेद्य व पूजा चालू केली. 

तसे पत्र उपलब्ध आहे. तारीख - २१ नोव्हम्बर १७६३.

१९) साबाजी शिंदे

साबाजी शिंदे हे कण्हेरखेड च्या शिंदेंचेच भाऊबंद होते. 

साबाजी शिंदेंचा लाहोर चा किल्ला व अटक चा किल्ला जिंकण्यात सर्वात महत्वाचा वाट होता. 

लाहोर मध्ये प्रथम प्रवेश करणार वीर व अटक च्या किल्यावर भगवा फडकवणार वीर असा त्यांचा उल्लेख केला जातो. 

पुढे मराठ्यांच्या पंजाब विजया नंतर त्यांनी १७५८ - १७५९ ह्या काळात मोठं मोठ्या अफगाण सरदारांचा पराभव करत पंजाब प्रांत शर्थीने राखाला होता. त्यांनी त्या काळात पेशावर पार करत आताच्या #अफगाणिस्थानातील_जलालाबाद 
(काबुल पासून १४९किमी) वर ही छापे घातले होते. 

२०) मानाजी शिंदे. - 

मानाजी शिंदे हे साबाजी शिंदे ह्यांचे पुत्र होते. व म्हराठ्यांच्या इतिहासातील तीन फाकडयांपैकी एक होते. 
 
मानाजी हे राघोबा दादा ह्यांचे पक्षपाती होते. त्यांनी राघोबा दादा नच्या वतीने मही नदि च्या लढाईत भाग घेतला होता. पुढे पुरंदर तहा नंतर बारभाई च्या करभाऱ्यां ना मिळाले. 

उत्तर पेशवाई तील घाशीराम कोतवाल प्रकरण ह्यांनीच बाहेर काढून खुद्द नाना फडणवीस ह्यांना अंगावर घेतले होते.

पुढे सवाई माधवराव पेशवे ह्यांच्या मृत्यू नंतर व बाजीराव द्वितीय पेशवे बनताना च्या आधीच्या काळात त्यांनी ही बऱ्याच उलाढाल्या केल्या.

पुढे त्यांच्या पुत्राने पुण्याच्या सर्जेरावी स कुप्रसिद्ध असलेल्या सर्जेराव घाटगे ह्यांस २७ जुलै १८०९ रोजी ठार केले. 

समाप्त

तर असे हे इतिहासातील काही निवडक शिंदे पुरुष व त्याची कामगिरी बद्दल काळानुरूप माहिती देण्याचा  हा छोटासा प्रयत्न. 

वरील यादीत कण्हेर खेड- ग्वाल्हेर च्या शिंदेंचे उल्लेख कटाक्षाने टाळले आहेत. कारण इथे काही अपरिचित पुरुषांचा परिचय करून द्यायचा होता. 

गवाहलेर च्या शिंदेंच्या पराक्रमाणे १८ व्या शतकातील मराठ्यांच्या इतिहासातील अनेक पाने रक्ताने लाल झाली आहेत. पानिपत च्या महासंग्रामा पर्यंत कण्हेरखेड शिंद्यांनी अनेक नररूपी नैवेद्य रणदेवतेस अर्पण करून आपल्या रक्ताचा अभिषेक काल भैरव ह्या रनांगनाच्या देवतेस घातला. त्याचेच फळ म्हणून पुढे १९ व्या शतक पासून ते पुढे भारत स्वतंत्र होस पर्यंत १५० वर्ष कण्हेरखेडच्या शिंद्यांनी मध्यभारताच्या छातीवर स्वतःचे प्राचीन काळ पासून स्वतःचे कुळ चिन्ह असलेले नाग व सूर्य हे भगव्या ध्वजावर चिन्हांकित करुन फडकवत ठेवले. 

ह्यांच्या व्यतिरिक्त  महाराष्ट्रातील खेडोपाडी शिंदेंकुळ पसरले आहेत. त्यांच्या पैकी कुडाळ चे शिंदे, दसपट शिंदे, कऱ्हाड चे शिंदे हे घराणी प्रसिद्ध आहेत. 

वरील यादीतील व इतर घराण्यातील हे सर्व शिंदे कुळी पुरुषांनी कठीण प्रसंगी सांप्रत काळात तांब्रा च्या जोडीस राहत व पुढे शिव छत्रपतींनी स्वराज्याचा उद्योग हाती घेताच त्यांच्या पवित्र कार्यात सामील होऊन तळहातावर शीर घेत  ह्या सप्तसिंधु च्या खोऱ्यात जीवाचा जौहर मांडला. व कित्येक प्रसंगी ह्या वीरांनी आपल्या आयुष्याचे माप स्वराज्याच्या पदरात टाकले. 

ह्या आशा सर्व ज्ञात अज्ञात शिंदे पुरुषांस शतशः नमन.

 माहिती संकलन

रोहित शिंदे

संदर्भ

महिकावतीची बखर
महिकावतीची बखर प्रस्तावना
मायबोली ब्लॉग
समग्र राजवाडे ब्लॉग
रामवरदायनी ब्लॉग
विकिपीडिया
विकासपीडिया
माणकोजी दहातोंडे प्रतिसष्ठान
संताजी
मराठे शाहीचे अंतररंग
श्री समप्रदायाची ची कागद पत्रे
तारीख इ दिलखुशा
शिवपुत्र छत्रपती राजाराम
मराठ्यांच्या इतिहासाची साधने 
कित्ता
पंत अमात्य बावडा दफ्तर
सेनापती धनाजी जाधव
केतकर ज्ञानकोश
शिवचरित्रसाहित्य
शिवचरित्रप्रदीप
मुन्तरववुललुबाब-इ-मुहंमदशाही
मोगल दरबाराची बतमी पत्रे
रायगड कथा पंचविसी
मासिर इ आलमगिरी
वसई ची मोहीम
जिजाबाई कालीन कागद पत्रे
महाराष्ट्राची शोधयात्रा ब्लॉग
दुर्गदौलत महाराष्ट्राची
भ्रमंती गड किल्ल्यांची
नियतीशी झुंज
छत्रपती शिवाजी महाराज

फोटो साभार
आंतरजाल

टीप - 

काही इतिहास अभ्यासक शिंदे कुळ हे  इतरांप्रमाणेच उत्तरेतून - राजपुताना महाराष्ट्रात आल्याचे सांगतात. व दसपट शिंदेंचे मूळ पुरुष रामजीराव ह्यांचे पूर्वज राजपुटण्यातील असायचा दावा करतात. 

तर इतर अभ्यासक हे पूर्वी सिंदकुळाची दकसजीनेच्या १२ राज्ये होती व सध्याचे कऱ्हाड चे शिंदे हे त्यांचे वनश असल्याचे मत नोंदवतात. 

वरील यादीतील सर्व पुरुषांची इतर ही माहिती संग्रही आहे, परंतु विस्तारभयास्तव देण्याचे टाळले. परंतु भविष्यात प्रत्येक पुरुषांवर एक किंवा जास्त स्वतंत्र लेख तयार होऊ शकतो. 

कृपया लेख पूर्ण वाचा व आपल्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्स मध्ये कळवा

लेख आवडल्यास तो इतरत्र शेअर करून आपला अज्ञात इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा. 

सदर लेख व्यतिरिक्त अजून असेच इतर ऐतिहासिक लेख  वाचण्यासाठी खालील लिंक द्वारे दुर्ग मावळा च्या अधिकृत  ब्लॉग ला भेट द्या

http://durgmavala.com/blog/

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४