Posts

Showing posts from October, 2023

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२६ आॅक्टोबर १२७०*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ आॅक्टोबर १२७०* संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ आॅक्टोबर १६७२* महाराज केव्हाही गुजरातचे मालक बनतील अशी भीती मुंबईकर इंग्रज व्यक्त करताना दिसतात. आधीच धास्तावलेले सुरत कर यामुळे अधिकच भेदरून गेले. त्यातच प्रतापराव गुजरांकडून पुन्हा सुरतेच्या सुभेदारकडे व प्रजैकडे चौथाईची मागणी करणारे कडक पत्र आले. पाठोपाठ महाराजांचे सैन्य रामनगर पर्यंत येऊन धडकले. त्यामुळे सुरत करांच्या तोंडाचे पाणी पळाले नसते तरच नवल ! महाराजांच्या संभाव्य आक्रमणाला आवर घालण्यासाठी मोगलांनी जंजिरेकर सिद्धीला महाराजांवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले. सुरतेहून वीस गलबतांचे आरमार त्यांच्या मदतीसाठी व किनारपट्टीवरील महाराजांचा मुलुख झोडपून काढण्यासाठी रवाना झाले. दिलेरखान ही सुरतेच्या आसपासच वावरत होता त्यामुळे गणदेवी पर्यंत येऊन ठेपलेले मराठी खानदेश, वराड, तेलंगणा भागाकडे वळले. बहादुरखान दिलेरखान सह त्यांच्या पाठलागावर निघाला पण वार्याच्या वेगाने पळणाऱ्या मराठ्यांचा बंदोबस्त करणे त्यांना शक्य होईना मराठ्यांनी रामगिरी (

वारकरी संप्रदायावर मोठा आघात, ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन...* 😢

Image
🙏 *वारकरी संप्रदायावर मोठा आघात, ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन...* 😢 ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अनोख्या कीर्तन शैलीने त्यांनी देश विदेशातील जनतेवर गारुड केलं होतं. ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. नवी मुंबईतील नेरुळ येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजल्यानंतर नेरुळ जिमखान्याच्या समोर असलेल्या आणि बाबामहाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर उद्या संध्याकाळी पाच वाजता नेरुळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. *कोण होते बाबामहाराज सातारकर ?* नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे बाबामहाराज सातारकर यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंत शिक्षण घ

२४ ऑक्टोबर १६५७*शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ ऑक्टोबर १६२४* भातवडी येथे मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महंमद ह्या दोघांच्या छावणीवर मलिक अंबरच्या सैन्याचा अचानक हल्ला झाला व मलिक अंबराने त्या दोघांच्या पाडाव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ ऑक्टोबर १६५७* शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला. औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच. २४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात  झाली. सागरावर प्रभुत्व निर्माण करावयाचे आसेल तर बलशाली आरमार (Navy) ऊभारले पाहीजे ही बाब शिवरायांच्या लक्षात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ ऑक्टोबर १६६६* आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औ

नवरात्रउत्सव रात्र नववी घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध

Image
♦️नवरात्रउत्सव रात्र नववी  घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध          नितीन सावंत परभणीकर          मो : 9970744142                  इतिहास जपण्याच्या साधणांत आणि पुराव्यांच्या प्रकारात लिखीत, कागदोपत्री हेच एकमेव साधन नसते.तसे पुराव्यांचे विविध प्रकार आहेत.त्यावर अन्यत्र चर्चा करता येइल.पुर्वजांचा इतिहास जपून ठेवण्यात एक आगळेवेगळे ऐतिहासिक साधन म्हणून ज्याचा उल्लेख करवा लागेल ते म्हणजे टाक होत.            आपल्या पुर्वजांची आठवण म्हणून देवघरात सोने, चांदी, पितळ, इ. धातुंचे बनवलेले प्रतिके म्हणजे टाक होत.                 आपल्या देवघरात आज्जी, पंजी, अज्जोबा, पंजोबांचे जसे टाक असतात, अगदी त्याच सारखे, खंडोबा, बहिरोबा, जोतीबा, जाकाई, जोकाई, मेसाई, जानाई यांचे देखील टाक दिसतात. म्हणजेच हे सर्व आपले कुळ पुर्वज होत. आपले सख्खे सलोहीत रक्तसंबधाचे पुर्वज होत.                     काही  टाक हे पंचकोनी आसतात तर काही चौरस. त्यापैकी काहींच्या देवघरात पुजल्या जाणाऱ्या जाणाईच्या टाका बद्दल आपण चर्चा करू या. सातारा जिल्ह्यातील अनेकांच्या देवघरात हा जाणाईचा टाक आढळून येतो. तिच्या हातात गव्हाची ओंबी आ

२३ आॅक्टोबर १६७१*छत्रपती शिवाजी महाराजांच्या बसरूर स्वारी नंतर एक महत्वाची माहिती - दंडाराजपुरी , जंजिऱ्याच्या सिद्दींवर दहशत बसवायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार पाठवले -

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ ऑक्टोबर १६६२* छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये 'रोहिडखोरे - कारी' येथील देशमूख 'सर्जेराव जेधे' यांना पत्र लिहिले. १६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ आॅक्टोबर १६७१* छत्रपती शिवाजी महाराजांच्या बसरूर स्वारी नंतर एक महत्वाची माहिती - दंडाराजपुरी , जंजिऱ्याच्या सिद्दींवर दहशत बसवायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार पाठवले - इ. स १६७१ ऑक्टोबर २३ (Mumbai- Surat Records) छत्रपती शिवाजी राजांचे राजपुरीदंडावर एक लहान आरमार गेले, राजीयांची जहाजे पाण्यातील सजली. गुराबा, तरांडी, गलबते, शिबाडे, पग

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ ऑक्टोंबर १६५९*अफजलखानाच्या भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी...

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ ऑक्टोंबर १६५९* अफजलखानाच्या भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी... आजच्या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाचे भेट जवळपास नक्की होणार होती. वाटाघाटी अंतिम टप्यात आल्या होत्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ ऑक्टोबर १६७९* मुंबई बेटाजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर आपली माणसे उतरवून कोटाचे बांधकाम सुरू केले होते. मुंबई जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार असणे इंग्रजांना धोकादायक असल्याने त्यांनी या बांधकामाला विरोध करत खांदेरीची नाकेबंदी केली. पण मराठ्यांचे चपळ आरमार त्यांना मात देत खांदेरीवर रसद पोहोचवत असे. त्यामुळे इंग्रजानी मुंबईहून ८ तोफा, १४ इंग्रज सैन्याच्या ५ फायली आणि ३० खलाशी देऊन फोर्टून नावाचे जहाज कॅप्टन स्टीफन अंडरटन याच्या नेतृत्वाखाली खान्देरीच्या नाकेबंदीला पाठवले. या जहाजाबरोबर आणखी दोन तोफा असलेली शिबाडे पाठवली. आता खांदेरीच्या नाकेबंदीत असलेल्या पथकात रिव्हेंज, हेक्टर गुराब, फोर्बुन, ५ शिबाडे आणि मचवे एवढे सामील झाले. खांदेरीच्या नाकेबंदी साठी फोर्चुन मुंबईहू

श्री क्षेत्र तुळजापूर येथे असणारा, देवी तुळजाभवानी मातेचा पलंग*. =

🚩 *श्री क्षेत्र तुळजापूर येथे असणारा, देवी तुळजाभवानी मातेचा पलंग* .         = नवरात्र उत्सव = *दरवर्षी* चा, श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा प्रवास, हा खूप थक्क करणारा आहे, चला तर आपण पाहूया, श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा, *बनविण्यापासून* ते  तुळजापुरात *पोहोचण्या पर्यंत* चा सर्व प्रवास...!! श्री तुळजाभवानी मातेचा हा *पलंग बनविण्याचा मान*  मूळचे घोडेगाव (पुणे) (भिमाशंकर जवळ),  पण सध्या पुण्यात स्थायिक असणारे *ठाकूर* (कातारी) कुटुंबियांना आहे.  त्यांना हा मान *राजमाता जिजाऊंच्या* नवसपूर्तीमुळे *राजे शहाजी* यांनी त्यांना दिला व  घोडेगाव (पुणे) येथे बक्षीस म्हणून  जागा सुद्धा दिलेली आहे.  पलंगाचे कातीव कामासाठी आंब्याचे आणि सागवान लाकुड, रंगकाम कामाकरिता लाखाचे रंग, लोखंडी साहीत्य खिळे पट्टी, सुती नवार पट्टी, दोरखंड, गादीसाठी कापुस, वरील छताकरिता कापड तसेच  इतर लागणारे सर्व काही साहित्य-सामान हे  जबाबदारीने *अहमदनगर* येथील *पलंगे* (नगरचे तेली) घराण्याकडुन घोडेगावच्या *ठाकूर* कुटुंबियांना *पुरवले* जातात. मग हे ठाकूर कुटुंबिय *रविवार पेठ पुणे* येथे स्वत:चे दुकानात, श्री तुळजाभवानी देवी

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ ऑक्टोबर १६७०*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ ऑक्टोबर १६७०* युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१६ ऑक्टोबर १६७९* विजापूर जिंकून घेण्यासाठी दिलेरखानाने ऑगस्ट १६७९ ला कूच केले. त्यामुळे विजापूरचे रक्षण करण्यास

१३ ऑक्टोबर १६७०*छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय सुरत लुटुनंतर औरंगगजेबाची झोप उडाली त्याने दाऊदखान ह्यास तातडीचे पत्र लिहिले व शिवरायांस पकडण्यासाठी जाण्याचे आदेश दिला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ ऑक्टोबर १६७३*मराठ्यांनी वाई नजिकचा पांडवगड जिंकल्याबद्दलबाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ ऑक्टोबर १६७९*मुंबईतील जवळ जवळ सर्वच फौज खांदेरीच्या नाकेबंदीत सामील असल्यामुळे मुंबईचे संरक्षण कमी झाले होते व त्याचा धोका जाणवून इंग्रजांनी १३ ऑक्टोबर रोजी २ शिबाडे भाडेतत्वावर घेऊन मुंबई बंदर संरक्षित केले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ आॅक्टोबर १२४०* रझिया सुलतान – दिल्ली तख्तावर राज्य करणारी पहिली महिला रजिया सुलतान हिचा मृत्यू झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ ऑक्टोबर १६७०* छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय सुरत लुटुनंतर औरंगगजेबाची झोप उडाली त्याने दाऊदखान ह्यास तातडीचे पत्र लिहिले व शिवरायांस पकडण्यासाठी जाण्याचे आदेश दिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ ऑक्टोबर १६७३* मराठ्यांनी वाई नजिकचा पांडवगड जिंकल्याबद्दलबाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ ऑक्टोबर १६७९* मुंबईतील जवळ जवळ सर्वच फौज खांदेरीच्या नाकेबंदीत सामील असल्यामुळे मुंबईचे संरक्षण कमी झाले होते व त्याचा धोका जाणवून इंग्रजांनी १३ ऑक्टोबर रोजी २ शिबाडे भाडेतत्वावर घेऊन मुंबई बंदर संरक्षित केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ आॅक्टोबर १७२७* निझामाविरुद्ध लढाईला सुरुवात १७१३मध्ये छत्रपती शाहूने बाळाजी विश्वनाथला पेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजीने मोडकळीस आलेल्या मोगल साम्राज्याचे लचके तोडून मराठा साम्राज्यास जोडण्याचा उद्योग लावलेला होता. याचे पा

सरदार थोरात

*सरदार थोरात घराणे*  भाग -1 - देवक सुर्यफूल, सूर्यवंशी, गोत्र वशिष्ठ,  कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोले, सिन्नर, पारनेर, वाळकी, वीरगाव, पिंपळगाव, खुटबाव, वाळवणे, अष्टा, भूम, ओंड, कार्वे, बहे, वाळवे, येळवी,‌‌ थोरातवाडी, अनगरे  छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवेकाळापर्यंतचे सरदार घराणे. शिवकाळातील मराठा घराणे पेशवाईत उदयाला आले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चाललेल्या मुघल-मराठा संघर्षात या घराण्याने विलक्षण पराक्रम गाजवला. या घराण्याला दिनकरराव, अमिरुलउमराव व जंगबहादर हे किताब होते. १८व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात, खानदेश व बागलाण प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे. या घराण्याला सूरत, संगमनेर, जुन्नर, कडेवलीत, पुणे आणि विजापूर या प्रांतात सरंजाम होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घराण्यातील अनेक पुरुष कामी आले. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी विरगावकर थोरात, वाळकीकर थोरात, वाळवेकर थोरात, पारनेरकर थोरात, नेवासकर थोरात आणि भूमचे थोरात या प्रमुख शाखा. वाळकी हे गाव पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्थित आहे. हे गाव तालुक्याच्या सीमेवर आ

१२ ऑक्टोबर १६८१*छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटात सुलतान अकबराला गोवण्याचा कट केला होता पण अकबराने आपला दूत पाठवून ही गोष्ट संभाजीराजेंना कळवली. संभाजीराजेंच्या हालचालींची माहिती मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात येते, "छत्रपती संभाजी महाराज हल्ली रायरीस आलेला आहे. त्याच्या खुनाच्या कटाबाबत तो तेथे आला. पूर्वी कळवल्याप्रमाणे थोड्याच दिवसांपूर्वी त्याने अण्णाजीपंत, हिरोजी फर्जंद, बाळाजी पंडित आणि आणखी पाच जण हत्तीच्या पायाखाली घालून मारविले. आणि असे म्हणतात की,या कटात सापडलेल्या आणखी वीस जणांना ठार मारण्यात येईल. राजा आपल्या सैन्याची जमवाजमव करीत आहे व बातमी अशी आहे की तो थोड्याच दिवसात सुलतान अकबरा बरोबर बुऱ्हाणपुरास जाण्यासाठी कूच करील.🏇🚩🏇🚩🏇🚩

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ ऑक्टोबर १६५९* पंताजी गोपीनाथांची वकील म्हणून निवड अफजलखानाचा वकील आला मग रिवाजानुसार आपलाही वकील खानाकडे जायला हवा हे मनोमन ठरवून गोपीनाथपंथांची निवड केली. ही निवड केवळ वकील म्हणून साधीसुधी नव्हती तर खानाच्या गोटात शिरून खानाच्या छावनीचा संपूर्ण अंदाज बांधणे शत्रुपक्षाच्या मनीचे हेतू जाणता आले तर पाहावे या हेतूने ही निवड होती. आणि म्हणूनच पंताजी गोपीनाथ यांचे बरोबर काही हुषार हेर‌ हुजऱ्यांच्या रुपाने शिवरायांनी पाठवून आपले फासे टाकायला सुरुवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ आॅक्टोबर १६७३* मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ ऑक्टोबर १६८०* स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे यांचे श्रीमान रायगडावर महानिर्वाण झाले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे सांत्वन करून छत्रपती शंभुराजांनी त्यांना पेशवेपद दिले. निळोपंत हे स्वराज्याचे पेशवे बनले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ ऑक्टोबर १६८१* छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटा

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*११ आॅक्टोबर १६७३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ आॅक्टोबर १६७३* छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ ऑक्टोबर १६७९* खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *११ ऑक्टोबर १७८०* दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक

*१० आॅक्टोबर १६६४*छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० आॅक्टोबर १६६४* छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० ऑक्टोबर १६७३* १० ऑक्टोबर १६७३ रोजी सिद्दी संबळ आपल्या आरमारासह इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मालकीची पेण व नागोठणे नदीवरील ठाणी त्याने उद्ध्वस्त केली. सिद्दी संबळने तेव्हा अनावश्यक रक्तपात केला आणि कित्येक माणसे, स्त्रीया व मुले पळवून गुलाम बनवून आपल्याबरोबर मुंबईस आणिली. काही प्रमाणात व्यापारास उपद्रव झा

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*९ आॅक्टोबर १६३५*शिवरक्षक जिवा महाले यांची आज जयंती.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ आॅक्टोबर १६३५* शिवरक्षक जिवा महाले यांची आज जयंती. प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म ९ ऑक्टोबर १६३५ रोजी झाला. आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ ऑक्टोबर १६४८* शिवाजी महाराजांनी पुरंदर ताब्यात घेतला  हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४८ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्य

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ ऑक्टोबर १६५९* रुई द लैतांव व्हीएगश यांचे मुंबईस निवेदन ! "मी रुई द लैतांव जाहीर करतो की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जहाजे बांधण्याच्या कामावर कल्याण येथे होतो. माझ्या हाताखाली काही काळे आणि गोरे लोक होते. शिवाजी महाराज यांनी पेण येथे आणि अन्यत्र २० युद्ध नौका बांधावयास घेतलेल्या होत्या. त्याचा उपयोग दांड्याच्या सिद्दिविरुध्द होणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाहीर केले होते. या कामावर मी देखरेख करीत असता एके दिवशी वसईच्या कॅप्टनी माझ्या कडे जुआंव द सालाझार यांना पाठवुन मला कळविले की छत्रपती शिवाजी महाराज जे आरमार बांधित आहे. त्याचे काम जर तुम्ही बंद पडले तर तुमच्या हातुन तुमच्या देशाची आणि तुमच्या राजाची मोठीच सेवा घडेल मी माझ्या राजाचा इमानी प्रजाजन असल्याने त्यांच्या हितसंबंधांना बाधा येईल असे क्रुत्य माझ्या हातुन होणे इष्ट नाही असा विचार करून वसईच्या कॅप्टनचा आदेश पाळण्याचे मी ठरवले. माझ्या हाताखाली गोरे काळे आणि बायका मुले मिळुन ४०० लोक होते. त्यांच्या शिवाय बाटगे लोक होते ते वेगळे आम्ही सगळ्यां

सांगलीचा इतिहास इ. स.* *१०२४ ते इ. स.**१९७७ :-*

*सांगलीचा इतिहास इ. स.* *१०२४ ते इ. स.* *१९७७ :-* १०२४ :- गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ' मिरिच' (मिरज) व ' करहाटक' (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता. १२०५ :- शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला. कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत. १२५० - १३१८ :- देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन हजार गांवे होती. १३१९ - १३४७ :- दिल्लीच्या खिलजी व तुघलकानी या भागावर राज्य केले. १३४८ - १४८९ :- बहामनी सुलतानानी या भागावर राज्य केले. १४९० - १६५९ :- विजापूरच्या अदिलशहाने या भागावर राज्य केले. यावेळी मिरज प्रांत रायबाग महालात होता. १६५९ :- छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती नेताजी पालकर याने हा भाग जिंकून घेतला. परत अदिलशहाने हा भाग जिंकून घेतला. १६७२ :- पन्हाळयापासून मिरजे पर्यंतचा सर्व भाग शिवाजी महाराजांनी जिंकला. या नंतर मुसलमान सरदार विजापुरास निघून गेले. तेव्हापासून या भागाची सरदारकी मिरजेचे सरदार कदम यांच्याकडे होती. १७३०:- बाजीराव बल्लाळ पेशवे

समर्थ स्थापित अकरा मारुती दर्शन दोन दिवसात पूर्ण करू शकता.

Image
समर्थ स्थापित अकरा मारुती मोहीम!! १. लिंब- बारा मोटेची विहीर २. शिंगण वाडी *(पहिला मारुती)*. ३. शिंगण वाडी ( शिवराय आणि स्वामी समर्थ भेट स्मारक). ४. चाफळ *(दुसरा आणि तिसरा मारुती)* ५.चाफळ - शिवकालीन बुरुज आणि।दरवाजा. ६.माजगाव *(चौथा मारुती)* ७. उंब्रज *(पाचवा मारुती)* ८. मसूर *(सहावा मारुती)* ९. शाहपूर *(सातवा मारुती)* १०. कोळे नरसिंह पूर मंदिर ११. बाहे *(आठवा मारुती)* मुक्काम - पलूस !! दिवस दुसरा -  १२. औदुंबर ( दत्त स्थान) १३. ३२ शिराळा *(नववा मारुती)* १३. पारगाव *(दहावा मारुती)* १४. मनपाडळे *(अकरावा मारुती)* १५. तळबीड - हंबीरराव मोहिते समाधी आणि त्यांच्या वंशांजांची भेट. १६. पाली खंडोबा दर्शन. १७. तारळे येथील भवानी बाई वाडा १८. शिरवळ येथील पुरातन पाणपोई 

कोळे नरसिह येथील हजारो वर्षां पूर्वीचे शाळीग्राममधी नरसिह भगवान मूर्ती मंदिर

Image
🚩श्री क्षेत्र ज्वाला नृसिंह तीर्थ, कोळे नरसिंहपूर आज श्री नृसिह जयंती   मंगल दर्शन श्री नृसिह मंदिर कोळे नृसिंहपुर.ता.वाळवा. जि.सांगली. महाराष्ट्र. भुयारातील नरसिंहपुरचे ज्वाला नरसिंह मंदिर         सांगली जिल्ह्याच्या वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात नरसिंहपूर हे श्री नृसिंहाचे स्थान आहे. इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. तेथे श्री नृसिंहाचे मंदिर भुयारामध्ये आहे. मंदिर पुरातन असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. बहे गावी कृष्णा नदीवर पूल आहे. बहे गावी कृष्णा नदी दोन प्रवाहांनी वाहते, त्यामुळे मध्ये बेट तयार झाले आहे. त्या बेटावर रामदासस्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. कथा अशी, की श्रीराम दंडकारण्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आले व दैनंदिन आन्हिके करण्यासाठी बेटावर बसले असताना कृष्णा नदीला पूर आला. त्यावेळी मारुतिरायांनी दोन्ही हात आडवे धरल्यामुळे नदीचे दोन प्रवाह निर्माण झाले व रामाचे आन्हिक निर्विघ्नपणे पार पडले! बहे या गावाचा ‘श्रीगुरुचरित्र’ पोथीत ‘बाहे’ असा उल्लेख आढळतो. 🔖नरसिंहपूर येथील मंदिर तीन पिढ्यांनी बांधले असल्याचा