आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*९ आॅक्टोबर १६३५*शिवरक्षक जिवा महाले यांची आज जयंती.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ आॅक्टोबर १६३५*
शिवरक्षक जिवा महाले यांची आज जयंती.
प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म ९ ऑक्टोबर १६३५ रोजी झाला. आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ ऑक्टोबर १६४८*
शिवाजी महाराजांनी पुरंदर ताब्यात घेतला 
हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४८ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ आॅक्टोबर १६६७*
मोघलांना जाऊन मिळण्याबाबत काही राजकारण असेनही...
छत्रपती शिवरायांनी आग्र्यावरून परतताच छत्रपती संभाजीराजेंना सात हजार स्वारांची मनसबदारी मिळवुन मोघलांशी सख्य केले. त्यावेळी दक्षिणेचा सुभेदार होता शहजादा मुअज्जम उर्फ शहा आलम. छत्रपती संभाजीराजेंनी ९ आॅक्टोबर १६६७ ला शहाजाद्याच्या भेटीस राजगडावरुन प्रयाण केले.
वा. सी. बेंद्रे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी महाराज या पुस्तकात अॅबे करेने लिहलेला अवहाल मांडतात" .....हा अॅबे करे आपल्या अवहालात लिहतो की," छत्रपती शिवाजी महाराज या मुलाला मुघली प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतु म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर म्हणजे शहजाद्याबरोबर गुप्त कट घडवुन आणावा. शहजाद्याची आणि छत्रपती संभाजीराजेंची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या राजकारणांत एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडुन गुप्त असे काहीच राहात नसे. तो छत्रपती संभाजी राजेंना अधिकाधिक प्रेमाने वागवित असे. कारण की , शहजाद्याला संभाजीराजेंकरवी छत्रपती शिवाजी महाराजांची मदत हवी होती. 
करे पुढे सांगतो की " शहा आलमने त्याच्या बापाकडुन त्याच्याविरूद्ध अविश्वासाचे उद््गार एकायला मिळतात; कारण औरंगजेबाच्या दरबारातील लोक आपला द्वेष करतात त्यामुळे आपल्याला दरबार सोडुन दक्षिणेच्या सुभेवर पाठवलंय. येथे बापाचे पुष्कळ सैन्य आहे त्या सैन्यावरील अधिकारी आपले बाजूचे असून ते केव्हाही आपण सांगू तेव्हा पादशहाविरूद्ध बंड करतील. आणि छत्रपती संभाजी हे सर्व घटना छत्रपती शिवाजी महाराजांना वारंवार कळवीत असे. आपल्या आकांक्षा सुफलित करून घेण्यास नवीन राजकारण हाती आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना फार आनंद झाला. अशा तह्रेने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनितीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला." 
अॅबे करेचा हा अहवाल खुप महत्वाचा आहे. कारण या अहवालाच्या सहाय्याने पुढील अपरिचित गुप्त राजकारणाचे रहस्य दडले आहे.
ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले त्यावेळेस शहजादा शहाआलम पुन्हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आलेला होता. आपल्या आधिच्या मैत्रपुर्ण संबंधातुन अर्धवट राहिलेली राजकारण छत्रपती संभाजीराजेंना सिद्धिस न्यायचे होते अशी दाट शंका येते कारण शहजादा औरंगबादेस येईपर्यंत संभाजीराजे मुघलांकडे गेलेच नाहीत.नोव्हेंबर १६७८ अखेर शाहा आलम औरंगाबादेस येऊन पोहचेल अशी बातमी होती आणि छत्रपती संभाजीराजे ३ डिसेंबर १६७८ रोजी मुघलांकडे गेले.
फितुर झालेल्या बर्‍याच जणांचे हात पाय तोडण्याची शिक्षा करणारे आपले महाराज संभाजी राजांना मोगलांच्या छावणीतुन हरप्रकारे प्रयत्नकरुन का सोडवले असतील... हंबीरराव मोहिते फौजेसह मोगल छावणीच्या परिसरात फिरत होते व योग्य वेळी छत्रपती शंभुराजांना मोगली छावणीतुन बाहेर काढले. महाराजांना स्वराज्यावर येणार्‍या पुढील संकटाची (औरंगजेबची स्वारी) कल्पना होती. त्यांनी त्या द्रूष्टीने तयारी म्हणून मुद्दाम छत्रपती संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्याविषयी असलेल्या गढूळ वातावरणामुळे त्यांच्यावर मुघल लोकांची मर्जी बसेल आणि बरीच माहिती गोळा करता येईल असा हेतू असावा. नंतर या गोष्टीचा छत्रपती संभाजीराजांना जेव्हा ते औरंगजेबाशी झुंजत होते तेव्हा फायदा झाला . कदाचित मुघल छावणीत राहून छत्रपती संभाजीराजांनी काही माणसे हेरली असावीत ज्यांनी नंतर छत्रपती संभाजीराजांना मदत केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ ऑक्टोबर १६८४*
औरंगजेबाने शहाअलमला कुमक पाठवली
छत्रपती संभाजीमहाराजांचे राज्य जिंकून घेण्यासाठी विजापूरकरांचा फारसा उपयोग होणार नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले म्हणून त्याने आदिलशहावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालूच ठेविले. औरंगजेब आणि त्याचा मुलगा शहाआलम यांनी शिकंदर पातशहाकडे १७ एप्रिल १६८४ व ३० एप्रिल १६८४ रोजी फर्माने पाठविली. त्यांत खालील मुख्य कलमे विजापूरकरांसाठी होती :-
(१) स्वारीचा खर्च व रूखद विजापूरकरांनी काही एक सबब न सांगता पोहोचविणे.
(२) आपले मुलूखातून फौजेचा व रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
(३) संभाजीची मैत्री व सख्य बाह्यात्कारी व अंतरयामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल
होऊन संभाजीचा समूळ फडशा करण्याकरिता विचार करणे. 
पण फर्मानांतील बहुतेक कलमे शिकंदर शहाने मान्य केली पण औरंगजेबाने पाठविलेल्या एकही फर्मानाची शिकंदरकडून अंमलबजावणी होऊ शकली नाही. तेव्हा औरंगजेबास आदिलशहा छत्रपती संभाजी राजांशी मैत्री व सख्यत्व करतो असा संशय आला. मराठ्यांविरुद्ध मोहिमेत १६८४ मध्यापर्यंत सर्व आघाड्यांवर अपयशच आले होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्धच्या युद्धात टिकाव लागेना म्हणून औरंगजेबाने दिनांक ३० ऑक्टोबर रोजी आदिलशहीविरुद्ध युद्ध पुकारले. औरंगजेबाने ९ ऑक्टोबर १६८४ शहाअलमला फार मोठी मदत पाठविली. २८ डिसेंबरला एक मणाची तोफ व २०/२० शेरांची एक अशा चार तोफा रूहुल्लाखानाच्या मदतीस विजापुरास रवाना केल्या. या हालचालीत इ.स. १६८४ हे साल गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री",* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...