सरदार थोरात
*सरदार थोरात घराणे*
भाग -1
- देवक सुर्यफूल, सूर्यवंशी, गोत्र वशिष्ठ,
कोल्हापूर, सांगली, सातारा, अकोले, सिन्नर, पारनेर, वाळकी, वीरगाव, पिंपळगाव, खुटबाव, वाळवणे, अष्टा, भूम, ओंड, कार्वे, बहे, वाळवे, येळवी, थोरातवाडी, अनगरे
छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवेकाळापर्यंतचे सरदार घराणे.
शिवकाळातील मराठा घराणे पेशवाईत उदयाला आले. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर चाललेल्या मुघल-मराठा संघर्षात या घराण्याने विलक्षण पराक्रम गाजवला. या घराण्याला दिनकरराव, अमिरुलउमराव व जंगबहादर हे किताब होते. १८व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरात, खानदेश व बागलाण प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे. या घराण्याला सूरत, संगमनेर, जुन्नर, कडेवलीत, पुणे आणि विजापूर या प्रांतात सरंजाम होता. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घराण्यातील अनेक पुरुष कामी आले. या घराण्याच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत त्यापैकी विरगावकर थोरात, वाळकीकर थोरात, वाळवेकर थोरात, पारनेरकर थोरात, नेवासकर थोरात आणि भूमचे थोरात या प्रमुख शाखा.
वाळकी हे गाव पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्थित आहे. हे गाव तालुक्याच्या सीमेवर आहे. तालुक्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले हे गाव आहे. मुळा-मुठा व भिमा नदीच्या संगमावर हे गाव वसलेले आहे. गावात थोरात घराण्याची ऐतिहासिक गढी व वाडे सुस्थितीत आहे.
वाळकी येथील थोरात घराण्याचा ऐतिहासिक वाडा
१७व्या शतकात वाळकी हे गाव पुणे प्रांतातील सांडस तर्फेत येत असत. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा सरदार सेखोजी थोरात दिनकरराव यास फौजेच्या खर्चासाठी सांडस तर्फेत एकूण सहा गावांचा सरंजाम मिळाला. वाळकी, बोरी भडक, भावडी, सिरसवाडी, डाळिंब, तरडे अशी या सहा गावांची नावे. पुढे या सरंजामाचा कारभार पाहण्याकरिता थोरात दिनकरराव घराण्याची एक शाखा विरगाव येथून वाळकी येथे स्थायिक झाली.
Comments
Post a Comment