आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*७ ऑक्टोबर १६५९*
रुई द लैतांव व्हीएगश यांचे मुंबईस निवेदन !
"मी रुई द लैतांव जाहीर करतो की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जहाजे बांधण्याच्या कामावर कल्याण येथे होतो. माझ्या हाताखाली काही काळे आणि गोरे लोक होते. शिवाजी महाराज यांनी पेण येथे आणि अन्यत्र २० युद्ध नौका बांधावयास घेतलेल्या होत्या. त्याचा उपयोग दांड्याच्या सिद्दिविरुध्द होणार असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाहीर केले होते. या कामावर मी देखरेख करीत असता एके दिवशी वसईच्या कॅप्टनी माझ्या कडे जुआंव द सालाझार यांना पाठवुन मला कळविले की छत्रपती शिवाजी महाराज जे आरमार बांधित आहे. त्याचे काम जर तुम्ही बंद पडले तर तुमच्या हातुन तुमच्या देशाची आणि तुमच्या राजाची मोठीच सेवा घडेल मी माझ्या राजाचा इमानी प्रजाजन असल्याने त्यांच्या हितसंबंधांना बाधा येईल असे क्रुत्य माझ्या हातुन होणे इष्ट नाही असा विचार करून वसईच्या कॅप्टनचा आदेश पाळण्याचे मी ठरवले. माझ्या हाताखाली गोरे काळे आणि बायका मुले मिळुन ४०० लोक होते. त्यांच्या शिवाय बाटगे लोक होते ते वेगळे आम्ही सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नोकरी सोडून इकडे येण्याचा निर्णय घेतला. आम्ही मोठ्या शिताफीने इकडे आलो. या कामी जुआंव द सालाझार मोठा धोका पत्करला निघण्याचा सर्व खर्च मला एकट्यालाच करावा लागला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*७ ऑक्टोबर १६७०*
दुसऱ्यांदा सुरत लुटीनंतर शिवराय परतीच्या मार्गावर निघाले.
दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू. शहजादा मुअज्जमने दाऊदखानाला मराठ्यांना बागलाण-नाशिक येथे अडवण्यास सांगितले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*७ ऑक्टोबर १६७९*
खांदेरीवर कब्जा मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने इंग्रज अधिकारी केज्वीन मुंबईहुन निघाला.
मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे.तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*७ ऑक्टोबर १६८२*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अफाट सैन्यबळ आणि अमाप संपत्ती घेऊन बादशाह औरंगजेबाने स्वराज्यावर आक्रमण केले. इ.स.१६८२ मध्ये पुण्याजवळील चाकण प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. चाकणचा किल्लेदार जानबाजखान होता. प्रतिकूल परिस्थितीतही मराठ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुघल प्रदेशात स्वारी करून लूट करण्यास प्रारंभ केला. १६८२ च्या ऑक्टोबर महिन्यात मराठ्यांची एक सैन्य तुकडी चाकणच्या प्रदेशात स्वारीसाठी गेली. चाकणचा किल्लेदार जानबाजखान आजारी असल्यामुळे त्याचे सैन्य किल्लेदाराला सोडून लांब जायला तयार नव्हते. त्यामुळे मराठ्यांच्या बंदोबस्तासाठी शहाबुद्दीन खानाला त्या परिसरात जाण्यास सांगण्यात आले. पण हुलकावणी देण्यात तरबेज असणारे मराठे तोपर्यंत जुन्नरकडे गेले. तेंव्हा जुन्नरजवळच्या आलबंद ठाण्यावर जाऊन त्या बाजूने मराठ्यांना प्रवेश करू देऊ नये असा हुकूम शहाबुद्दीन खानाला देण्यात आला. शहाबुद्दीन खानाला आलबंद ठाण्यावर जाण्याचा हुकूम देण्यात आला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*७ आॅक्टोबर १९३०*
हुतात्मा भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना ७ आॅक्टोबर १९३० रोजी फाशी सुनावली गेली आणि २३ मार्च १९३१ रोजी दिली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment