आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*११ आॅक्टोबर १६७३*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ आॅक्टोबर १६७३*
छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ ऑक्टोबर १६७९*
खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ ऑक्टोबर १७८०*
दि. ११ ऑक्टोबर १७८० रोजी हालेचा मुक्काम उल्हास नदीकाठावर असलेल्या बदलापूरानजीक कुळगाव येथे असताना आनंदराव रास्त्यांच्या फौजांनी त्याच्यावर हल्ला
चढवला. यात हालेचे विशेष नुकसान झाले नाही. तरीही बदलापूराजवळच्या हल्ल्याची धास्त खाऊन तो टिटवाळा मुक्कामी गेला. रामचंद्र गणेश कानडे हे वसईच्या कुमकेकरता जात असतानाच टिटवाळ्याच्या जवळच हालेने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला रामचंद्रपंतांनीही असे कडवे प्रत्युत्तर दिले की, हार्टलेची पाचावर धारण बसली. अशावेळी दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी वज्रेश्वरी नजिक आकाशात खूप मळभ असताना रामचंद्रपंत गुपचूप हार्टलेला पकडण्यासाठी पुढे सरसावले. परंतु, ऐनवेळी चक्क उन पडले आणि हार्टलेला रामचंद्रपंत दिसले. इंग्रजांनी त्यांच्यावर बेछूट गोळ्या झाडल्या आणि रामचंद्रपंत ठार झाले. इकडे वज्रेश्वरीला पंत पडले अन् तिकडे त्याच सुमारास वसईदेखील पडली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ ऑक्टोबर १७८८*
गुलाम कादरने नवीन बादशहाचे सहाय्याने जनानखाना व राजपुत्रांचे महाल लुटले. एके दिवशी शहाजाद्यांना व दासींना आपल्या समोर उभे करून गावयास व नाचावयास लाविले, तसेच बादशहास दिवाणी इ-खासात ओढून आणून चाबकाने मारिले. इतकेही करून द्रव् मिळेना म्हणून बादशहास पुरलेल्या द्रव्याचा ठावठिकाणा विचारला, तेव्हा बादशहाने आपल्याला असे द्रव्य माहीत नाही असे उत्तर करताच तक्तावर हुक्का ओढीत बसलेल्या गुलाम कादरने एकदम उडी टाकून बादशहा शहा अलम यास खाली पाडले व त्याचे उरावर बसून पेषकबजाने बादशहाचे दोन्ही डोळे फोडले. शहरात सतत लुटालूट चालू ठेविली. इस्माईल बेग यास गुलाम कादरचे हे वर्तन मुळीच आवडले नाही. अशा वाईट कृत्यात आपण सामील असल्याने आपल्यावरही केव्हातरी गदा येईल म्हणून तो घाबरून गेला आणि सरळ महादजी शिंद्यास येऊन मिळाला महादजीनी काळजीपूर्वक योजना आखून ऑक्टोबर १७८८ ला आपला सरदार राणेखान यास फौज व तोफा देऊन दिल्लीचा कबजा घेण्यास रवाना केले. तसेच गुलाम कादरचे अंतर्वेदीतील मुलुखात मराठी फौज पाठविली. अंतर्वेदीतील या मराठे फौजेने सन १७८८ च्या ऑक्टोबरात रोहिल्यांची ठाणी उठवून मराठ्यांचा अंमल पूर्ववत स्थापिला. मराठ्यांची फौज आपल्यावर चालून येत आहे असे पाहून गुलाम कादरखान दिल्ली सोडून आपल्या मुलुखाचे रक्षण करण्यासाठी निघून गेला. पुढे दिनांक ११ ऑक्टोबर १७८८ रोजी मराठी फौजेने दिल्लीच्या किल्ल्यात प्रवेश केला. त्यानंतर २२ ऑक्ट रोजी मराठे सरदार अंध बादशहा शहाअली यास नजर शिष्टाचार करून भेटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४