१२ ऑक्टोबर १६८१*छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटात सुलतान अकबराला गोवण्याचा कट केला होता पण अकबराने आपला दूत पाठवून ही गोष्ट संभाजीराजेंना कळवली. संभाजीराजेंच्या हालचालींची माहिती मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात येते, "छत्रपती संभाजी महाराज हल्ली रायरीस आलेला आहे. त्याच्या खुनाच्या कटाबाबत तो तेथे आला. पूर्वी कळवल्याप्रमाणे थोड्याच दिवसांपूर्वी त्याने अण्णाजीपंत, हिरोजी फर्जंद, बाळाजी पंडित आणि आणखी पाच जण हत्तीच्या पायाखाली घालून मारविले. आणि असे म्हणतात की,या कटात सापडलेल्या आणखी वीस जणांना ठार मारण्यात येईल. राजा आपल्या सैन्याची जमवाजमव करीत आहे व बातमी अशी आहे की तो थोड्याच दिवसात सुलतान अकबरा बरोबर बुऱ्हाणपुरास जाण्यासाठी कूच करील.🏇🚩🏇🚩🏇🚩

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ ऑक्टोबर १६५९*
पंताजी गोपीनाथांची वकील म्हणून निवड
अफजलखानाचा वकील आला मग रिवाजानुसार आपलाही वकील खानाकडे जायला हवा हे मनोमन ठरवून गोपीनाथपंथांची निवड केली. ही निवड केवळ वकील म्हणून साधीसुधी नव्हती तर खानाच्या गोटात शिरून खानाच्या छावनीचा संपूर्ण अंदाज बांधणे शत्रुपक्षाच्या मनीचे हेतू जाणता आले तर पाहावे या हेतूने ही निवड होती. आणि म्हणूनच पंताजी गोपीनाथ यांचे बरोबर काही हुषार हेर‌ हुजऱ्यांच्या रुपाने शिवरायांनी पाठवून आपले फासे टाकायला सुरुवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ आॅक्टोबर १६७३*
मराठा फौजेचा वाई जवळील "किल्ले पांडवगड" वर हल्ला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ ऑक्टोबर १६८०*
स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे यांचे श्रीमान रायगडावर महानिर्वाण झाले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे सांत्वन करून छत्रपती शंभुराजांनी त्यांना पेशवेपद दिले. निळोपंत हे स्वराज्याचे पेशवे बनले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ ऑक्टोबर १६८१*
छत्रपती संभाजी महाराज राज्यपदावर आल्यावर त्यांच्याविरोधात काही मंत्र्यानी कट केला होता. मंत्र्यानी या कटात सुलतान अकबराला गोवण्याचा कट केला होता पण अकबराने आपला दूत पाठवून ही गोष्ट संभाजीराजेंना कळवली. संभाजीराजेंच्या हालचालींची माहिती मुंबईकर इंग्रजांच्या एका पत्रात येते, "छत्रपती संभाजी महाराज  हल्ली रायरीस आलेला आहे. त्याच्या खुनाच्या कटाबाबत तो तेथे आला. पूर्वी कळवल्याप्रमाणे थोड्याच दिवसांपूर्वी त्याने अण्णाजीपंत, हिरोजी फर्जंद, बाळाजी पंडित आणि आणखी पाच जण हत्तीच्या पायाखाली घालून मारविले. आणि असे म्हणतात की,या कटात सापडलेल्या आणखी वीस जणांना ठार मारण्यात येईल. राजा आपल्या सैन्याची जमवाजमव करीत आहे व बातमी अशी आहे की तो थोड्याच दिवसात सुलतान अकबरा बरोबर बुऱ्हाणपुरास जाण्यासाठी कूच करील.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ ऑक्टोबर १६८७*
औरंगजेब समोर बादशहा कुतुबशहा शरण आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ आॅक्टोबर १७०७*
खेडच्या लढाईत "छत्रपती शाहू (थोरले)" यांच्याकडून करवीरच्या "महाराणी ताराबाई" पराभूत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ ऑक्टोबर १७०७*
सप्तसहस्त्री गणोजी जाधव (परिंचे, पुरंदर) यांना वीरमरण 
मराठ्यांच्या इतिहासात सर्वात संघर्षाचा कालखंड म्हणून ज्या काळाची नोंद होते, तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचा कालखंड होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत स्वराज्यनिष्ठेसाठी पराक्रम करून परिंचे गावाचे नावलौकिक करणारे थोर महापुरुष म्हणजे "सप्तसहस्त्री गणोजी बाबा" होय. विशेष करून या संघर्षाच्या काळात इस्लामी फौजांशी झुंजत राहून स्वराज्य सेवा एकनिष्ठपणे करणारे परिंचेकर सप्तसहस्त्री गणोजी बावा व त्यांचे पुतणे जनाजी जाधव होय. गणोजी बावांचे राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम हे अलौकिक असे होते. गणोजी बाबा हाडाचे लढवय्ये असल्याने त्यांनी अनेख लष्करस्वाऱ्या केल्या असाव्या यात शंका नाही. मात्र जिंजीचा आठ वर्षाचा रणसंग्राम हा विशेष पराक्रम त्यांचा ठरतो. या जिंजीच्या संग्रामातूनच गाणोजींची झुंजार वृत्ती लक्षात येते. जिंजीच्या लढ्याचा आठ वर्षाचा काळ हे एक प्रकारचे धाडसच होते. हे धाडस गणोजी रावांनी यशस्वीपणे पूर्ण केले होते. 
सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांची फौज ज्या मोगली प्रदेशावर जात त्या भागावर गणोजी बावा व जनाजीराव तुटून पडत. या चुलत्या पुतण्याच्या कामगिरीचे वर्तमान ऐकून राजाराम महाराजांनी यांचा बहुमान केला. संताजी घोरपडे यांच्या सांगण्यावरून परिंचेकर गणोजी जाधव यांना इ. सन. १७ फेब्रुवारी १६९३ रोजीच्या आसपास त्यांच्या स्वामीनिष्ठेचे फलित म्हणून "सप्तसहस्त्री" हा किताब दिला. ही गोष्ट सामान्य नाही झाली. तसेच सातारा प्रांतातील मौजे कुसवडे हे गाव इ. सन. १७ फेब्रुवारी १६९३ रोजी इनाम करून दिले. तसेच गणोजीबावा यांचे पुतणे जनाजी जाधव यांनाही यांच्या पराक्रमाबाबत मौजे चिंचनेर, प्रांत तारगाव हा गाव इनाम करुन दिला. 
महाराष्ट्रातून मरहट्टे कर्नाटक प्रांतात जाऊन कडव्या मोगली सेनेशी लढून गनिमांना जेरीस आणून व त्यातून सुखरुप आपला व आपल्या राजाचा बचाव करून मायदेशी परतणे ही गोष्ट सामान्य नाही. समरांगणात मोगली फौजांना हटकून कबज्यात आणणे ही कसब गणोजीरावांच्यात प्रकट झालेली होती. 
पुढे सन १७०० रोजी राजाराम महाराजांच्या मृत्यूमुळे मराठी राज्याची जणू खिळच निघाली, अशी अवस्था सगळीकडे निर्माण झाली. त्यात औरंगजेबाने किल्ले जिंकण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे हे हिंदवीराज्य राखण्यासाठी राजाराम महाराजांची पत्नी ताराराणीसाहेब यांनी आपला मुलगा दुसरे शिवाजीराजे यांना गादीवर बसवले. हे शिवाजीराजे लहान असल्याने राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी विशाळगडावर राहून तिथून आपला राज्यकारभार चालू केला. त्यावेळी त्यांच्याकडील रामचंद्रपंत अमात्य, धनाजी जाधव, परशुरामपंत प्रतिनिधी, शंकराजी नारायण सचिव हे मुत्सदी औरंगजेबास तोंड देत होते. या धामधुमीच्या काळातही गणोजी बावांनी धनाजी जाधवांच्या सोबत राहून आपला पराक्रम यथोच्य गाजवला. म्हणून ताराराणी साहेबांनीही गणोजी बावांचा बहुमान करून त्यांना परिंचे गाव इनाम करून दिला. त्या संदर्भात शंकराजी नारायण पंतसचिवांचे ई. सन. बुधवार १३ नोव्हेंबर १७०० रोजीच्या पत्रावरुन लक्षात येते.
पुढेही छत्रपती थोरले शाहु महाराज मोगल्यांच्या कैदेतुन सुटुन आल्यावर गणोजी बाबांनी महाराजांच्या प्रति आपली असलेली स्वामिनिष्ठा दाखवली. 
अखेर १२ ऑक्टोंबर १७०७ च्या सुमारास भिमानदीच्या तीरी खेड येथे एका लढाईत गणोजी जाधव यांची निकराईची झुंज झाली. अखेर गणोजी बावा लढता लढता आपले येथोच्छ कर्तव्य बाजाबत असताना धारातीर्थी पडून त्यांचा त्यात मृत्यू झाला. एक धगधगती ज्वलंत आग तप्त ज्वालामुखी अखेर या लढाईत विझला गेला. मात्र या लढाईत शाहू महाराजांना विजय मिळाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ ऑक्टोबर १८००*
निजामाने इंग्रजाशी तैनाती फौजेचा तह करून त्यांचे मांडलिकत्व पत्करले. यानंतर निजामाचे घराणे इंग्रजांचे मांडलिक म्हणून इ.स.१९४७ पर्यन्त शिल्लक राहिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४