१३ ऑक्टोबर १६७०*छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय सुरत लुटुनंतर औरंगगजेबाची झोप उडाली त्याने दाऊदखान ह्यास तातडीचे पत्र लिहिले व शिवरायांस पकडण्यासाठी जाण्याचे आदेश दिला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ ऑक्टोबर १६७३*मराठ्यांनी वाई नजिकचा पांडवगड जिंकल्याबद्दलबाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ ऑक्टोबर १६७९*मुंबईतील जवळ जवळ सर्वच फौज खांदेरीच्या नाकेबंदीत सामील असल्यामुळे मुंबईचे संरक्षण कमी झाले होते व त्याचा धोका जाणवून इंग्रजांनी १३ ऑक्टोबर रोजी २ शिबाडे भाडेतत्वावर घेऊन मुंबई बंदर संरक्षित केले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ आॅक्टोबर १२४०*
रझिया सुलतान – दिल्ली तख्तावर राज्य करणारी पहिली महिला रजिया सुलतान हिचा मृत्यू झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ ऑक्टोबर १६७०*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय सुरत लुटुनंतर औरंगगजेबाची झोप उडाली त्याने दाऊदखान ह्यास तातडीचे पत्र लिहिले व शिवरायांस पकडण्यासाठी जाण्याचे आदेश दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ ऑक्टोबर १६७३*
मराठ्यांनी वाई नजिकचा पांडवगड जिंकल्याबद्दलबाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ ऑक्टोबर १६७९*
मुंबईतील जवळ जवळ सर्वच फौज खांदेरीच्या नाकेबंदीत सामील असल्यामुळे मुंबईचे संरक्षण कमी झाले होते व त्याचा धोका जाणवून इंग्रजांनी १३ ऑक्टोबर रोजी २ शिबाडे भाडेतत्वावर घेऊन मुंबई बंदर संरक्षित केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ आॅक्टोबर १७२७*
निझामाविरुद्ध लढाईला सुरुवात
१७१३मध्ये छत्रपती शाहूने बाळाजी विश्वनाथला पेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजीने मोडकळीस आलेल्या मोगल साम्राज्याचे लचके तोडून मराठा साम्राज्यास जोडण्याचा उद्योग लावलेला होता. याचे पारिपत्य करण्यासाठी मोगल सम्राट मुहम्मद शाह याने ऑक्टोबर १७२४मध्ये निझाम-उल-मुल्क यास दख्खनचा वजीर नेमले व त्यास दख्खनेत पाठवले. तोपर्यंत बाळाजीचा मुलगा बाजीराव पहिला पेशवेपदी आला होता.
याच सुमारास मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण होऊ घातली होती. साताऱ्यास छत्रपती शाहू तर कोल्हापूरास छत्रपती संभाजी यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे जाहीर केले होते. निझामाने याचा फायदा घेण्याचे ठरवले व कोल्हापूरच्या गादीस आपला पाठिंबा दिला. याउप्पर निझामाने दख्खनातील देशमुखांकरवी सरदेशमुखी व चौथ (महसूली उत्पन्नाचा चौथा भाग) मराठ्यांच्या हवाली करणे बंद करवले. या कारणांस्तव छत्रपती शाहू व बाजीराव पेशव्यांनी निझामास धडा शिकवण्याचे ठरविले.
१७२७ च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होता. निझामाने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातील श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीला निझामाशी वाटाघाटी करण्याचे सुचवले. पावसाळा संपतासंपता बाजीरावाने सैन्यास कुमक लावून घेतली व औरंगाबादकडे कूच केले. १३ आॅक्टोबर १७२७ ला  निझामाविरुद्ध लढाई सुरू झाल्याचे छत्रपती शाहुंनी घोषित केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१३ ऑक्टोबर १७५१*
शाहुपुत्र रामराजा महाराणी ताराराणीकडुन मुक्त 
पुण्यश्लोक शाहू महाराजांचे सातारा येथे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी ताराराणीचा  राजाराम उर्फ रामराजा हा नातू ( ताराराणी व छत्रपती राजाराम यांच्या शिवाजी द्वितीय या मुलाचा मुलगा ) रीतसर दत्तकविधान न होता मराठ्यांच्या सातारा गादीचा उत्तराधिकारी सिंहासनारूढ झाला. ताराराणी व तिचा मुलगा शिवाजी द्वितीय यांना, सवत राजसबाई ने ऑगस्ट-सप्टेंबर १७१४ मध्ये रामचंद्रपंत अमात्याने घडवून आणलेल्या सत्तांतरामुळे, सुमारे १५-१६ वर्षे पन्हाळ्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवले होते. शिवाजी द्वितीय  कैदेत असतानाच १७२६ मध्ये मृत्यू पावला. त्यावेळी त्याची पत्नी भवानीबाई गरोदर होती. त्यानंतर दोन महिन्यांनी तिला जो पुत्र झाला तो राजाराम उर्फ रामराजा होय.

रामराजे सत्तारूढ झाल्यावर महत्वाकांक्षी ताराराणी ने त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले, रामराजा आपल्या नियंत्रणाखाली राहावा असे नानासाहेब पेश्व्यास पण वाटत होते. ह्या दोघा महत्वाकांक्षी राजकारण्यांच्या कचाट्यात राज्यकारभाराचा अजिबात अनुभव नसलेला रामराजा सापडला. स्वतः रामराजाला स्वतंत्रपणे कारभार करण्याची इच्छा होती पण त्यासाठी त्याला ताराराणी पेक्षा पेशवा जास्त भरोशाचा वाटत होता. ताराराणी ने बाबूजी नाईक, प्रतिनिधी व पेशव्याच्या विरोधी सरदाराना आपल्या बाजूस वळवून एक वेगळा पक्ष निर्माण करून रामराजा ला सत्ताभ्रष्ट करण्याचे डावपेच सुरु केले. रामराजाशी पटत नाही म्हणून ताराराणी ऑक्टोबर १७५० मध्ये सिंह गडावर आल्या. नानासाहेबाने समजूत घालून त्यांस पुण्यात आणले व ऑगस्ट १७५० मध्ये रामराजास पण पुण्याला बोलावून दोघांमध्ये समेट घडवून आणला. पेशव्याने रामराजाच्या संरक्षणाची व्यवस्था ठेवली होती. पण नोव्हेंबर १७५० ला ताराराणी नी रामराजास चंपाषष्ठी च्या निमित्त पारण्यास किल्ल्यावर बोलविले. रामराजाच्या सल्लागारांनी तसेच बहिणीने पण किल्ल्यावर दगा फटका होईल, जाऊ नये असे सांगून पण रामराजा किल्ल्यावर गेला. परतताना किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी त्यांना रोखून धरण्यात आले, सर्व दरवाजे बंद करून त्यांना बंदिस्त करून ताराराणी ने कारभार आपल्या हातात घेतला. पेशव्याने किल्ल्याभोवती फौज आणून ठेवली होती पण संभाव्य परिणाम विचारात घेऊन बळाच्या वापरापेक्षा वाटाघाटी करून प्रश्न सोडविणे उचित समजले. नानासाहेबाने दमाजी गायकवाडाचा गुजरातमध्ये पराभव केल्याने ताराराणी ची बाजू काहीशी डळमळीत होऊन त्यांनी पेशव्याला शांततेने प्रश्न सोडविण्यासाठी निरोप पाठविले. दोन्ही पक्षात सप्टेंबर १७५१ मध्ये समेट झाला.त्यानुसार पेशव्यांचा कारभार पेश्व्यान्कडेच चालू राहील, ताराराणीच्या बाजुने लढले त्यांविरुद्ध कुठली कारवाई होऊ नये, त्यांची वतने, सरंजाम कायम राहू द्यावा, दाभाडे, गायकवाड यांना सोडून द्यावे, निम्मा गुजरात व सिंहगड पेशव्यांना द्यावा, असे ठरले. त्यानंतर १३ ऑक्टोबर १७५१ रोजी ताराराणी रामराजा सह किल्ल्यावरून खाली आल्या पण कारभाराची सूत्रे आपल्याच हाती ठेवली. पेशव्यांनी रामराजा ला ताराराणीच्या नजरकैदेतून सोडविण्याचा प्रयत्न केला पण ताराराणीच्या बंदोबस्तामुळे असे प्रयत्न अयशस्वी ठरले वा रामराजाला त्याचा उपयोग करून घेऊन आपली मुक्तता करून घेता आली नाही.क्षताराराणीच्या कारवायांना पेशव्याने पण मूक संमती देऊन ताराराणी बरोबर संघर्ष टाळला. ताराराणी १० डिसेंबर १७६१ ला वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू पावल्या. त्यांचे क्रियाकर्म रामराजाने माहुली इथे केले. त्याच वर्षी नानासाहेब पेशवा पण पानिपत युद्धाच्या परिणामाच्या धक्क्याने मृत्यू पावला. नानासाहेबा नंतर त्यांचा ज्येष्ठ पुत्र माधवराव पेशवा झाला. त्याच्या मनात छत्रपतीन विषयी आदर, सन्मानाची भावना असल्याने त्याने रामराजा ला मुक्त करून त्याच्यावरचे सर्व प्रतिबंध काढून टाकले, छत्रपतींच्या वाड्याची दुरुस्ती करून नुतनीकरण केले, रामराजाच्या दोन्ही मुलींची लग्न शाही थाटात पार पाडली, रामराजाच्या मदतीसाठी माधवरावा ने महिपतराव पुरंदरेस सातारा दरबारात ठेवले. अशा प्रकारे पुन्हा छत्रपतीना मानाचे स्थान प्राप्त झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४