*१० आॅक्टोबर १६६४*छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॅक्टोबर १६६४*
छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडेला मुधोळ येथे ठार केले. आदिलशहाने १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि कोकणात अंकुश ठेवण्यासाठी खवास खानयाची नेमणूक केली आणि त्याला मदत करण्यासाठी वाडीचे देशमुख लखम सावंतआणि खेमसावंत यांनीही ठरवले परंतु खवास खानाचा या मोहिमेत पराभव झाला हे समजताच आदिलशहाने बाजी घोरपडे यास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले हे वृत्त शिवाजी महाराजांना समजता सत्यांनी मुधोळ येथे असलेल्या चालून येणाऱ्या बाजी घोरपडे वर हल्ला चढवला आणि त्याला ठार केले. याच बाजी घोरपडेच्या मदतीने शहाजीराजे यांना जिंजी जवळ अटक झाली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० ऑक्टोबर १६७३*
१० ऑक्टोबर १६७३ रोजी सिद्दी संबळ आपल्या आरमारासह इंग्रजांची परवानगी न घेता मुंबई बंदरात आला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मालकीची पेण व नागोठणे नदीवरील ठाणी त्याने उद्ध्वस्त केली. सिद्दी संबळने तेव्हा अनावश्यक रक्तपात केला आणि कित्येक माणसे, स्त्रीया व मुले पळवून गुलाम बनवून आपल्याबरोबर मुंबईस आणिली. काही प्रमाणात व्यापारास उपद्रव झाला. त्यामुळे मुंबईच्या इंग्रज प्रमुखाने सिदीला आपली नाराजी कळवणारे व तंबी देणारे पत्र पाठवले. प्रेसिडेंटच्या ह्या पत्राकडे दुर्लक्ष करून सिद्दीने आपले अत्याचार, दहशतयुक्त जुलूम चालूच ठेवला. श्रीमान रायगडाहून आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या शंभर सैनिकांनी सिद्दीच्या माणसांना चकित करून निदर्यपणे कापून काढले.  ह्या घटनेनंतर सिद्दीचे निघृण अत्याचार शांत झाले असे वाटते. इ.स. १६७४ च्या फेब्रुवारी महिन्यात छत्रपती  शिवाजी महाराज आणि सिद्दी यांच्यात तुंबळ युद्ध झाले. दोन्ही पक्ष अगदी जेरीस आले होते. तेव्हा सिद्दीने सुरतच्या इंग्रज प्रेसिडंटाला दोघांत मध्यस्थी करून शांतता निर्माण करण्याची विनंती केली. मार्च १६७४ मध्ये सिद्दी संबळने रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंदी खाडीत शिवाजी महाराजांचा आरमार प्रमुख दौलतखान यांजवर हल्ला चढवला. दोन्ही नौदल प्रमुख जखमी झाले. सिद्दीचे १०० तर मराठ्यांचे ४४ सैनिक कामी आले. मराठ्यांचा विजय झाला. त्यामुळे सिदी संबळ जंजिऱ्याच्या २१ मैल दक्षिणेकडील हरेश्वर बंदरात निघून गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॅक्टोबर १६७५*
"किल्ले सिंहगड" वरील सुभा कचेरीत छत्रपती शिवरायांची गोतसभा.
गडाखालील ३४ गावातील कारभारी पाटील या मसलतीस हजर होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० आॅक्टोबर १६७५*
१० आॕक्टोबर १६७५ रोजी या संदर्भात खामगाव येथे एक मजहर आला. त्यावर मावळातील करंजवणे येथील देशमुख, जैतजी नाईक, बिनमल्हारजी नाईक तसेच कोंढवे, कात्रज, नांदेड, खडकवासला, नांदोशी, वडगाव, आंबेगाव, बावधन, हिंगणे, खेरडी, गोऱ्हे, भुकुम, सुस, लवळे, कोथरुड, इ. गावच्या पाटलांच्या निशाणी तसेच परीट-मोगरी, सुतार-वाकस, तेली-पहार, महार-विळादोरी, गुरव, कुंभार, लोहार, तराळ यांच्याही निशाणी मजहरावर आहेत.
संदर्भ - शिवचरित्र साहित्यखंड -२ ले. २७५ ते २७७, २८० ते २८५ (ले-वि.का.राजवाडे)., महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० ऑक्टोबर १७६०*
भाऊसाहेबासह मराठे सैन्य दिल्लीत दि. २२ जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंत राहीले. त्यानंतर त्यांनी  आपली छावणी दिल्ली पासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या शालीमार बागेत हलवली. तेथे मराठ्यांची दि. १० ऑक्टोबर १७६० पर्यंत छावणी होती. ह्या ८० दिवसांच्या वास्तव्यात मराठ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. उत्तरेकडील मामलतदाराकडील येणाऱ्या पैशावर खर्च भागविण्याची पाळी आली. जाटांकडील सालाबाद खंडणीचे पैसेही भिडेमुळे भाऊस मागता आले नाहीत. उत्तरेत गारा व गव्हावरली रोग पडल्यामुळे दुष्काळ पडला, महागाई झाली तसा सैन्याचा खर्च वाढत चालला होता. दिल्ली घेतल्यामुळे तेथील राजवंश व राजवाडा यांच्या खर्चाचा बोजाही मराठयांवर पडला. तो खर्च महिना सुमारे १ लाख रुपये होता. मराठ्यांच्या छावणीच्या दरमहाच्या ७ लाख रुपये खर्चात आणखी एक लाख रुपये खर्चाची भर पडली. हा खर्च भागविण्यास भाऊस पैशाचा पुरवठा सारखा व्हावयास हवा होता. पण तसे होईना. पेशव्यांच्या पत्राप्रमाणे उत्तरेतील मामलेदारांनी अर्धा वसूल भाऊकडे व अर्धा पेशव्यांकडे पाठवावयाचा होता. तेव्हा मामलेदार भाऊस लिहित की, वसूल झालेले पैसे पेशव्यांस पाठविले व पेशव्यास लिहित की, भाऊस पाठविले. आणि पैशाचा भरणातर कोठेच करत नसत. ह्यामुळे हलाखी निर्माण झाली. “फौजभारी पण पोटास नाही. घोडी दाणा खावयास विसरली, माणसास अन्न मिळतां कठीण असे झाले" मराठ्यांच्या तोफखान्याचे बैल खाण्यास नमिळाल्यामुळे व आजारामुळे मरु लागले. यामुदतीत अबदालीच्या फौजेने अंतर्वेदीतील मुलुख व्यापला त्यामुळे दिल्ली शहरात धान्याचा व घासदाण्याचा पुरवठा होईना. सैन्यास उपवास पडू लागल्यामुळे वादशाही दिवाणी-इ-खास ह्या दरबारच्या जागेस रुप्याचे छत होते त्याचा पत्रा काढून गरज भागविण्याची भाऊने तोड काढली. दि. ६ ऑगस्ट रोजी छत फोडून ते वितळवून ९ लक्ष रुपये तयार केले. ह्या छताचा काही भाग वजीर गाजिउद्दीन खानाने त्यापूर्वी काढून नेला होता. ह्या ९ लाखापैकी काही रुपये सरदारास दिले, बाकी फौजेस वाटले. जेणेकरुन सुमारे एक महिना गुजरण झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० ऑक्टोबर १७७३*
दादांनी निजामअली आणि हैदरयाजवर स्वारी करण्यासाठी विसाजीपंतांनी आणलेल्या पैशातून सैन्य उभारणी केली आणि वरील दोधावर स्वारी करावी अशी मसलत सखाराम बापू, प्रमुख मंडळी व शिंदे, होळकर वगैर सरदार मानकरी यांना बोलावून आणून विचार केला. सर्वांचा रुकार झाला. त्यावरून दसऱ्यास १० ऑक्टोबर १७७३ रोजी पुण्याहून निघून डेरे गारपिरावर दिले. बापू, त्रिंबकराव, नाना, हरिपंत, मोरोबा वगैरे मंडळीस आपल्यामागे पुण्यास ठेविल्यास आपल्याला मोठा धोका निर्माण होईल अशी दादास सार्थ भिती वाटल्याने त्या सर्व मावळ्यांची त्यांनी मोट बांधली व त्यास आपल्याबरोबर लष्करात चालविले. गारपिरावरून ते पेडगांवला आले. तिथेच आनंदीबाईच्या सांगण्यावरून आणलेली पेशवेपदाची वस्त्रे दादांनी स्विकारली आणि ह्याच ठिकाणी रामशास्त्रींनी येऊन 'दादा तुम्ही खुनी आहात आणि खुनास शिक्षा देहांत प्रायशित्ताची, ती तुम्ही भोगली पाहिजे' हे त्यास ऐकविले. त्यामुळे दादांवरील कारभाऱ्यांचा विश्वास विचलित झाला आणि त्यांची मने दादांविरुद्ध एक झाली, आणि त्यातूनच बारभाईचे कारस्थान उभारले गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४