आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ ऑक्टोबर १६७०*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ ऑक्टोबर १६७०*
युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते कारण खजिना पुढे पाठवायचा म्हणजे घोडदळ सोबत द्यावे लागेल कारण पायदळ लवकर पुढे जाणार नाही. जर घोडदळ पुढे पाठवले तर दाऊदखानाचा सामना फक्त पायदळानिशी करणे ही सोपे नव्हते, आणि आपल्या सैनिकांना सुद्धा याची भनक लागू द्यायची नव्हती. शेवटी शिवराय ते शिवरायच, शेवटच्या क्षणाला कोणाच्या डोक्यात कधी येऊच शकणार नाही असे निर्णय घेण्याचे त्यांचे कौशल्य कामी आले. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ ऑक्टोबर १६७९*
विजापूर जिंकून घेण्यासाठी दिलेरखानाने ऑगस्ट १६७९ ला कूच केले. त्यामुळे विजापूरचे रक्षण करण्यासाठी मसूदखानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे मदत मागितली. महाराजांनीही आपले वकील शामजी नाईक यांना विजापूरला बोलणी करण्यासाठी पाठवले. या पाठोपाठ १० हजार स्वार व २ हजार ओझ्याच्या बैलावरून साहित्य व रसद पुरवठा ही केला. कुतुबशहानेही शिवाजी महाराजांच्या मार्फत आदिलशहाला काही रक्कम पाठवून दिली. महाराज स्वता मात्र दिलेरखानाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्याच्या मुलखात लुटालूट करण्यासाठी मोरोपंतांना घेऊन जालन्याकडे निघाले. यासंबंधीची राजापूरकर इंग्रजांची नोंद, "इकडे खात्रीशीर अशी बातमी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी सल्ला केला. तो मात्र आपल्या सैन्यानिशी कोठे गेला हे मात्र खात्रीशीर समजले नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ ऑक्टोबर १६८०*
छत्रपती संभाजीराजे यांनी कोकणातील "चाफळ" येथील रामनवमी उत्सवासाठी वार्षिक इनाम चालवण्याचा हुकूम आजच्या दिवशी दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ ऑक्टोबर १६८४*
औरंगजेबाने विजापूरचा वेढा सुरू केला त्याच वेळी शहजादा आज्जम आपल्या सैन्यासह धारवाड बेळगाव या भागात आला होता. मराठ्यांच्याकडून या भागाच्या संरक्षणाची जबाबदारी रामचंद्र पंडित आणि धर्माजी पंडित यांच्याकडे होती. या भागात मराठे आणि मुघल सैन्याच्या हालचाली सुरू असल्याने त्या भागातील कारवारच्या इंग्रज वखारवाल्याना त्यांच्या मालाची ने आण करण्यास अडचण येत होती. यासंबंधी कारवारचे इंग्रज सुरतेला कळवतात, "जोपर्यंत मुघलांची फौज माघारी गेली नाही तोपर्यंत माल पाठवण्यास आम्ही संमती देऊ शकत नाही. कारण संभाजीराजांनी मुघल फौज इकडे उतरू नये म्हणून घाटावरील सर्व वाटा बंद करण्याचे हुकूम दिले आहेत. रामचंद्र पंडिताने घाटावरील आपला रस्ता रोखून धरला आहे. त्यामुळे काहीही खरेदी करता आले नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ ऑक्टोबर १६९२*
संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी बेळगाव व धारवाडी प्रदेशावर स्वारी केल्याची बातमी बादशहास समजताच त्याने हमीदुद्दीन खान यास बेळगावच्या तर मतलबखानास धारवाडच्या बचावासाठी पाठवले. आणखी भर म्हणून कासीमखान यास शिरे येथे बदशहाचा हुकूम आला की तुंगभद्रेच्या उत्तरेकडील बंकापूर, धारवाडच्या मुलखात मराठे दंगल करतील त्यांचा जप्ता ठेवावा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ ऑक्टोबर १७६०*
कुंजपुऱ्यावरील अधिपत्य
ऑक्टोबर १७६० मध्ये , मराठ्यांनी कुंजपुरा लुटले , कुंजपुरा मध्ये १५ हजार अफगाण होते, १६ ऑक्टोबर ला मराठयांनी कुंजपुराला वेढा घातला. इब्राहिम खानाने, कुंजपुरावर तोफांचा मारा केला. दुसऱ्याच दिवशी युद्ध झालं, मराठयांनी ८ हजार अफगाण कापले काहीच अवधीत उर्वरीत ४ हजार अफगाण तोंडात गवत घालून बाहेर आले. समादखान,
कुतुबशहा हे कुंजपुऱ्याच्या किल्ल्यात मराठ्यांना सापडले , यांनी जसं सरदार दत्ताजी शिंदे यांना जसं मारलं होतं, तसंच महादजींनी त्यांना  ठार मारले. कुंजपुरा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आल्यामुळे, मराठ्यांना धन मिळाले आणि १० हजार खिंडी गहू व उपयुक्त खाण्याचेसामान मिळाले आणि दारूगोळाही मिळाला ; यामुळे मराठ्यांची खाण्याची अबाल टळली . पुढे मराठे कुरुक्षेत्रावर गेले. कुरूक्षेत्राकडे जाण्यापूर्वी कुंजपुरा, हा गोविंदपंत बुंदेले यांच्या ताब्यात दिला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ ऑक्टोबर १८१७*
शिंदे, होळकर, भोसले यांजकडे आपल्या मदतीस येण्यासाठी श्रीमंत बाजीराव यांनी निकडीचे खलिते पाठविले. बाजीरावांनी इंग्रजांशी लढाई देण्याच्या उद्देशाने सर्व जय्यत तयारी गुप्तपणे चालविली होती. रेसिडेंटच्या लोकांस फितूर करण्यासाठी त्यांनी खूप पैसा चारला होता. तरी त्याच्या हालचालींच्या सर्व बातम्या यशवंतराव घोरपडे व बाळाजीपंत नातू हे इंग्रज रेसिडेंटास रोज पुरवित असत. त्यामुळे एल्फिन्स्टन सावध होऊन त्याने मुंबईची युरोपियन पलटण, मद्रास नेटीव्ह इन्कन्ट्री व जनरल स्मिथच्या हाताखालील लष्कर पुण्यास बोलाविले. अशा रितीने दोन्ही बाजूने तयारी चालू असता श्रीमंत बाजीरावांची व एल्फिन्सटनची भेट तारीख १६ ऑक्टोबर इ.स १८१७ या दिवशी झाली. भेटीत बाजीरावाने एल्फिन्स्टन समोर अंतकरण पिळवटून टाकणारे खालील उद्गार काढले “मी मूळ मंत्रावेगळा, तुमचे करन्यानी झालो. जो मी होतो तो आज नाही, तुम्ही कशास पुसता? तुमचे स्नेहाची जोड मात्र केली की जी कला अंगी होती ती दवडून बसलो" बाजीराव आता खडबडून जागे झाले. त्यांनी बापू गोखल्यास एक कोटी रुपये देऊन त्यास सर्व सत्ताधारी सेनापती नेमले. तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचीही मसलत ऐकणार नाही असे स्वदस्तूरचा लेख लिहून त्यास दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩


१६ ऑक्टोबर १६७०*
युद्ध हे होणारच हे महाराजांना अचूक ठाऊक होते. प्रश्न एकच होता की सुरतेवरून आणलेला खजिना कसा राखायचा. खजिन्यासकट पळ काढणे हे शक्य नव्हते आणि काही लोकांना खजिना घेऊन पुढे जाण्यास सांगणे हे ही शक्य नव्हते.
१६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांना समजले की पहाटेच्या वेळी आपली व दाऊदखानाच्या सैन्याची गाठ पडणार. म्हणून रात्रीच्या वेळी खजिना वाहणारी घोडी व बैले पायदळासोबत सप्तशृंगी व वणीच्या मार्गाने पाठवली आणि मुख्य सैन्य दाऊदखानाच्या दिशेने पाठवले.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...