मराठी भाषेतील चालत आलेल्या म्हणी व त्याचे अर्थ
1) अगं अगं म्हशी मला कोठे नेशी स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. 2.) पी हळद हो गोरी उतावळेपणा दाखविणे 3)आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. 4. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही 5. अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. 6. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर दोनपैकी एक पर्याय निवडणे 7. आयत्या बिळात नागोबा दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. 8. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच 9. उंटावरचा शहाणा मूर्ख सल्ला देणारा 10. आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. 11. नाचता येईना अंगण वाकडे स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो 12. आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. 13. छत्तीसाचा आकडा विरुद्ध मत असणे 14. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा. 15. तेरड्याचा रंग तीन दिवस एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे 16. आधी पोटोबा मग विठ्