काटकर घराणे

काटकर याचा मूळपुरुष नागोजी चिंगो मालो काटकर. याचा ठिकाण कुकुडवाड. येथून त्याची मातोश्री राहीजी नेवा पाटील आवताडे याची कन्या ते गरोदर होती. कुकुडवाडी मारा जाहला, त्यामुळे ते बायको पळोन माहेरास कामारी आली. ते प्रसूत जाहली. तिचे पोटी पुत्र माळो काटकर जाहाला. त्यास कामारी कट्याळा याची मिरास बोराळपटीस जा २८३ होती, ते मशारनिलेचे जिमे करून दिल्ही.



लेखांक ६६
मंगळवेढची हकीकत
श्री.
१|२० रास

प्रकरण पहिले
जाबीता कसबे मंगळवेढा, पा| मजकूर, कारकीर्द. बेदर सुभ्याखाली गांव चालत होता. ते समयी कसवेमजकूरची पांढर उद्वस होऊन साठ वर्षे बेचिराख पांढर पडली होती. वस्ती अजीबात नव्हती. कसगावडा व कुळकर्णी गोत्र विश्र्वामित्र ऐसी दोन घरे कृष्णा तळेनजीक वस्तीस राहून कालहरण करीत होत असतां कसबेमजकुरीची व पामजकुरीची उस्तवारी व्हावी या उद्देशे, आपली दाद लागोन वस्ती व्हावी या उद्देशे विठल कसगावडा व चंडरस कुळकर्णी या उभयतांनी बेदरच्या पादशाचा रस्ता मार्गी चालत होता तो मौजे चल्हे पा मजकूर त्या स्थळी दरीरदेव याचा खोरा आहे त्या स्थळी रस्ता मार्गाचा आणून त्या स्थळी ठेविला. बेदर सरकार येथे बोभाटा जाहला जे, पादशाही रस्ता कोणी मारून न्हेला. ऐसा बलांढी कोण आहे त्याची चौकशी करणेविसी हुकूम जाहला. तो अगोदर विठल कसगावडा व चंडरस कुळकर्णी या उभयतांनी बेदरास अर्जी लिहून पाठविला जे आपला प्रगाणा साठ वर्षे बेचिराख वैराण होऊन पडला आहे, आपली दाद लागत नाही या उद्देशे आपली दाद लागून प्रगणेची उस्तवारी व्हावी या उद्देशे रस्ता हाजम करून ठेविला आहे, आपणास अभय द्यावे, जिवानिसी येऊन हाजीर होतो. त्यावरोन मुछदी यांनी पादशाहास अर्ज करून कौल उभयतांस पाठऊन दिल्हे. तो शिरी वंदोन बेदरास उभयतां जाऊन रुजूं जाहले. रस्ता हाजमा केला होता, त्याचा अन्याय माफ करून पोची उस्तवारी करणेबद्दल कौल सादर केला, तो घेऊन सरकारांतून तसरीफ देऊन रवाना केले. परगणा मातबर, बहुत दिवस झाडी लागून पडला, कुळभरणा अगदी नाही, लावणी करणे जरूर, जाणोन चौकडे कुळाचा तलास करावयास लागले. ते समयी इंगळे सरकारांत नोकर होते. त्यांचे ठिकाण नागांव, प्रतापरुद्र यास बोलाऊन आणले. त्यास पामजकुरीची देशमुखीची तक्षीम करार केली. त्यांनी मुदा घातला जे, वडिलकी आपणास द्याल तर आपण येऊन वस्ती करून जमिनीची लावणी करू. नाइलाज जाणोन, कसगावडे यांनी वडिलपणा प्रतापरुद्र इंगळे यास देऊन, त्यांचे पाठशी आपण कागदीपत्री नावनिशीस वर्तणूक करावी ऐसा तह करून, इंगळे यास घेऊन आले. त्याचा जमाव भाऊपणा सुध्दा भालेवाडीचे तळावर येऊन मु|| केला. त्यांनी आपले कुवतमाफीक जमीन कबूल करून कीर्द माहामोरी केली. जिमीन भारी, त्याचेन जमिनीची लावणी झाडून होईनाशी जाहली. तेव्हा आळूरआचेरळे ऐथून भागन शेट होनराव याचा भाऊपणाचा जमाव पाहून, त्यास आणोन आपले नाव चालवावा ऐसा करार करून देशमुखीची तक्षीम तिसरी कबूल करून कसगावडे यान होनराव जमावसुध्दा आणून कसबे मजकुरची जमीनची लावणी त्याचे जिमे करून कौलमाफीक कीर्द महामोरी केली.

परंतु जमीन भारी, लावणीस कुळभरणा नाही, तेव्हा आणगरामध्ये निकम होत, त्यांचा भाऊपणेयाचे जमाव पाहून, त्यासी करार करून चौथी तक्षीम देशमुखीची कबूल करून, कोयाजी बिन नागदेव पटेल आणगराहून भाऊपणेसुध्दा कसवेमजकुरास आणोन, जमीन मशारनिलेचे जिमे करून, लावणीची उस्तवारी केली. परंतु आणखी कुळभरणा आणल्याशिवाय झाडून जमिनीची लावणी होत नाही ऐसे जाणून आणखी तलास करून कुळे आणली बीतपसीलवार-

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४