बिग बॉस विजेता मराठ मोळा अभिनेता विशाल निकम.कोण आहे विशाल निकम? जाणून घ्या त्याचा बिग बॉस पर्यंतचा प्रवास.
विशाल हा एक भारतीय मराठी अभिनेता, मॉडेल आणि जिम ट्रेनर आहे. त्यांचे खरे नाव विशाल बाळासो निकम आहे. पण ते बिग बॉस विजेता अभिनेता विशाल निकम म्हणून ओळखले जातात.
ज्योतिबाची भूमिका ते बिग बॉस; सांगलीकर विशाल निकमचा भन्नाट प्रवास
स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. जय दुधाने आणि विशाल निकम हे 'बिग बॉस मराठी सिझन 3' चे टॉप 2 सदस्य होते. त्यातून विशाल निकम या पर्वाचा महाविजेता झाला आहे. विशालने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊयात विशालबाबत काही खास गोष्टी...
विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे. विशालने सांगलीतील विटा येथून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली.
मूळ गाव देवीखिडी येथील निकम घरण्यातील. या घराण्यात अभिनय वारसा नसताना सुद्धा. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आपले स्वतंत्र छाप पडली आहे.
सांगली जिल्ह्यातील देवीखिडी हे गाव सोने चांदी च्या व्यवसाय मध्ये प्रसिद्ध असे गाव आहे. या गावातील सोन्या-चांदीची व्यवसायिक दुकाने संपूर्ण भारतभर पाहायला मिळतील.विशाल चे वडील सुद्धा याचं व्यवसाया त आहेत. विशाल सध्या तो पुणे, मुबंई येते कामानिमित्त असतात . जन्मतारीख 10 फेब्रुवारी 1994 इटरनेट च्या माध्यमातून सापडली.
विशाल निकम एक भारतीय टीव्ही कलाकार दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेमध्ये जोतिबाच्या रोल मध्ये समोर आला. भूमिका लोकांना एवढी आवडली अक्षरशः रसिकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला.
त्यांना मराठी टीव्ही सीरियल 'दक्खनचा राजा जोतिबा' आणि 'सता जल्मच्य गठी' मध्ये मुख्य भूमिका निभावताना दिसलें होते.
. ते जय भवानी जय शिवाजी या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत शिवा काशीद याचा रोल केला.
जन्मतारीख - १० फेब्रुवारी १९९४
जन्म ठिकाण - सांगली, महाराष्ट्र
मूळ गाव :-देविखिडी
वय - २७ (२०२१ पर्यंत)
धर्म - हिंदू
अविवाहित
उंची - ५ फूट ८ इंच
वजन - ७२ kg
कौटुंबिक पार्श्वभूमी :-
विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात १० फेब्रुवारी १९९४ साली झाला. त्याचे शालेय शिक्षण NSV मधे झाले आणि KW कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. सांगलीतील विटा येथून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली तर उच्च शिक्षण BG महाविद्यालयातून पूर्ण केले.
विशाल निकम च्या टीव्ही वरील कार्याबद्दल सांगायचं झालं तर मिथुन चित्रपटातून २०१८ मधे त्याने आपले पहिले पाऊल चित्रपट सृष्टीत टाकले.
त्यानंतर स्टार प्रवाह वरील साता जन्माच्या गाठी मधे त्याची युवराज ही मध्यवर्ती भूमिका असलेली पहिली मालिका होती.
धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला तसेच The Sniper या वेब सिरीज मधेही तो प्रमुख भूमिकेत होता.
विशाल निकम हा आपल्याला स्टार प्रवाह वर नव्याने सुरू झालेल्या जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद च्या भूमिकेत पाहायला मिळाला होता.
अतिशय रुबाबदार आणि रांगड्या व्यक्तीमत्वाच्या विशाल निकम चा कलाप्रवास आकांक्षा आणि मेहनतीच्या बळावर खूपच छान राहिला आहे. स्टार प्रवाह वरील दख्खनचा राजा जोतिबा (२०२१) या पौराणिक मालिकेतील त्याची जोतिबांची भूमिका आणि जय भवानी जय शिवाजी या मालिकेतील शिवा काशिद चे पात्र त्याच्या कारकीर्दीत मानाचा तुरा उभरणारी होती.
विशाल निकम अभिनेता नसता तर आर्मी ऑफिसर किंवा क्रिकेटर झाला असता.
विशाल निकम स्वतः व्यायाम प्रशिक्षक आहे त्यामुळे सुदृढ आणि निरोगी राहणे हा त्याच्या आयष्यातील भागच आहे.
तो रोज न चुकता २ तास व्यायाम करतोच करतो.
जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा त्याला चित्रपट पाहणे, वाचन करणे, कोणताही खेळ खेळणे आणि भटकंती करणे आवडते. आणि क्रिकेट खेळणे हा विशालचा आवडता छंद आहे.
विशालच्या फॅशन वर बोलायचे झाले तर त्याला जे पेहराव परिधान केल्यावर आत्मविश्वास वाढतो आणि मनाला आनंद देतात ते त्याला परिधान करायला आवडतात.
विशाल त्याच्या वडिलांना आयुष्यातील आदर्श व्यक्ती मानतो. स्वतः सोबत प्रामाणिक राहणे, अभ्यास, कठोर परिश्रम, कुटुंबाचा आशीर्वाद आणि देवावर श्रद्धा यावर तो खूप विश्वास ठेवतो.
बहुचर्चित ठरलेल्या bigg boss marathi ला अखेर तिसऱ्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. विशाल निकम 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. या महाअंतिम सोहळ्यामध्ये जय आणि विशाल निकम यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, अखेर प्रेक्षकांचा कौल विशालकडे झुकला आणि तो यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
अंतिम फेरीमध्ये जय, विशाल, विकास, उत्कर्ष आणि मीनल शहा हे पाच स्पर्धक Top 5 फायनलिस्ट ठरले होते. परंतु, ग्रँड फिनाले सुरु झाल्यानतंर अवघ्या काही वेळातच मीनल आणि उत्कर्ष यांना या शोचा निरोप घ्यावा लागला. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ विकास पाटील याचाही प्रवास येथीच संपला. त्यामुळे शेवटी जय आणि विशाल यांच्यात अटीतटींचा सामना रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व जिंकल्यानंतर विशालला बक्षीस स्वरुपात 'बिग बॉस'ची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.
अभिनेते विशाल निकम यांना भावी वाटलीस हार्दिक शुभेच्छा
अभिनेते विशाल निकम याच गावाकडील घर.
विशाल निकम व युवा उदयोजक सचिन निकम (चितळी )याचे चुलत भाऊ आहे आहेत.त्याचे आजोबा आणी विशाल निकम चे आजोबा भाऊ भाऊ आहेत. सर्वांची अभिमानाची बाब आहे.
Comments
Post a Comment