अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू

अजिंक्यतारा झुंजविणारे प्रयागजी प्रभू

८ डिसेंबर १६९९ औरंगजेब बादशाह अजिंक्यतारा घेण्यासाठी सरसावला.


 अजिंक्यताराचे किल्लेदार होते प्रयागजी प्रभू. गड घेण्यासाठी बादशाहचे प्रयत्न सुरु झाले. गडाच्या वाटेवर मोगल गस्त घालू लागले.

मराठ्यांचे गडावर येणे जाणे कठीण होउन बसले. गडावर तोफांचा मारा सुरु झाला, औरंगजेबास जास्तीत जास्त आठवडाभरात गड ताब्यात येइल, असे वाटत होते. पण महीने गेले तरी सुद्धा गडावरचे मराठे काही दाद देई नात.

एकदा तर बादशाही सैन्याने गडावर सुलतानढवा सुद्धा केला पण मराठ्यांच्या तिखट प्रतिकारा समोर मोगली सैन्याला माघार घ्यावी लागली.

२ मार्च १७०० रोजी छत्रपति राजाराम राजांचा सिंहगडावर मृत्यु झाला. या बातमीने मोगली गोटात आनंदाचे वातावरण पसरले. त्यांना वाटले आता मराठे शरण येतील आणि मग आपला उत्तरेतला मार्ग मोकळा. पण कसले काय, जरी या बातमीने मराठे खचले होते तरी सुद्धा त्यांनी किल्ला तसाच लढ़वायचा ठरविले. आता त्यांना एक नवे नेतृत्व मिळाले होते, ताराराणीच्या रुपात साक्षात् भवानी माताच मोगलांचा विनाश करण्यास सरसावली होती.

राजाराम राजे जाऊन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे. मोगलांनि किल्ल्याच्या तटा खाली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले.

गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंग्जेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...