पवार घराणे
सरदार पवार
शिरुर तालुक्यात राजगुरुनगरपासून ३० किमी अंतरावर *'मलठण'* या गावात सरदार पवारांचा एक भव्य वाडा आपले काही अवशेष घेऊन उभा आहे. वाड्याचा भव्य दरवाजा त्याला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या तटबंदीच्या भिंती व बुरुज आजमितीस व्यसस्थित पाहावयास मिळतात. बांधकाम घडीव दगड व वीटकामातील आहे. दरवाजावर पडिक अवस्थेत नगारखाना आपले अस्तित्व दाखवतो. आत समोर अतिशय सुंदर अशा घडणीचे जोते दिसते. जोत्याच्या मध्यभागी प्रवेशद्वाराच्या खुणा दिसतात. घडीव दगडांच्या भिंती, खांबांचे तळखडे आहेत. इमारतींच्या भिंतींचे अवशेष चारही बाजूंस दिसतात. डाव्या बाजूस तटबंदीलगत एक इमारत सुस्थितीत असून ती परवानगीने ती पाहता येते. आत तळघर, बारव, गच्चीत प्रशस्त खोलीसारखे दालन आहे.
बाहेरचा दिवाणखाना रेखीव खांब व कमानीयुक्त असून त्याचे जुने सरदारीपण स्वरुप दाखवून देतो. दिवाणखान्याच्या बाजूस देवघर असून दिवाणखान्यात कारंजेदेखील आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वराज्याच्या सेवेत असणाऱ्या , *धार* येथून आलेल्या पवार मंडळींनी राजाराममहाराजांच्या कारकिर्दीत पराक्रम केला आणि *'विश्वासराव'* हे पद प्राप्त केले. त्यांचे याच *मलठण* गावात दोन वाडे असून *कवठे यमाई,* व *आमदाबाद (शिरुर)* येथे भव्य वाडे आहेत.
साभार सौरभ कुलकर्णी
*फोटो - सरदार पवार वाडा,* *मलठण. शिरुर*
कुळाचे नाव पवार वंश सुअर्यवंश,सोमवंश , गादी धारगिरी गादी, निशाण लाल ध्वज त्यावर हनुमान, देवक धारेचे शस्ञ , गोञ वशिष्ठ .
धारवरून महाराष्ट्रत आल्यावर पवार घराण्याचा वास्तव प्रथम नगर जिल्ह्यात सुपे येथे होता नंतर पुणे जिल्ह्यातील मलठण, वाघाळे, अमदाबाद,कवठे , हिंगणी, पाथरे, वरडे,चिथणी, इत्यादी. गावात होते. तेथून पुढे पवारांचा विस्तार कोकणात ही होऊ लागला खानदेशात जलगावात जिल्ह्यात पवारांना जहागिरी मिळाली तेथे नगरदेवळा येथे सेनाबारसहस्ञी पवार म्हणून ओळखत आणि सांगलीत खानापूर तालुकात रेणावीतील पवारांना धारेराव हा खिताब आहे सोरटे पवार हे तळेगावचे धारकरी मानकरी यांना दाभाडेंकडून खिताब भेटला होता. तर वाल्हे गावातील पवार धारकर , वाल्हे , भांब्रुर्डे, खोपोडी, नाथाची वाडी , मालेगाव बारामती , बेलवाडी , सासवड , घेरा सिहगड , भुगांव, भुकूम, खेळपाने, सोनवाडी , मोराची, चिंचणी, लिंगाळी, गराडे चिंचणी , खर्डा , श्रीरामनगर येथे पवार घराण्याचा विस्तार झालेला आहे.
Comments
Post a Comment