तुका_म्हणे...कामातूर मनुष्याला भय किंवा लाज वाटत नाही. किंवा योग्यायोग्य काय याचाही विचार त्यावेळी त्याच्या मनाला शिवत नाही. ।।१।।
कामातुरा भय लाज ना विचार ।
शरीर असार तृणतुल्य ।।१।।
नवल हे लीळा कर्त्याचे लाघव ।
प्रारब्धे भाव दाखविले ।।२।।
लोभालोभ एका धनाचिये ठायी ।
आणिकांची सोई चाड नाही ।।३।।
तुका म्हणे भूक न विचारी प्रकार ।
योजे तेचि सार यथाकाळे ।।४।।
अर्थ -
कामातूर मनुष्याला भय किंवा लाज वाटत नाही. किंवा योग्यायोग्य काय याचाही विचार त्यावेळी त्याच्या मनाला शिवत नाही. ।।१।।
अशा माणसाचे वागणे मोठे आश्चर्यकारक असते. तो जे काही करत असतो ते सर्व त्याचे प्रारब्ध असते. ।।२।।
धनाच्या लोभी असलेल्या मनुष्याचे मन त्याच्याच ठायी गुंतलेले असते. धनाव्यतिरिक्त असलेल्या इतर गोष्टींकडे त्याचे लक्षही नसते. ।।३।।
तुकोबा म्हणतात, भूकले मनुष्य ताटात कोणकोणते पदार्थ आहेत हे पाहत नाही. जे अन्न समोर आले ते आपण खाऊन घेतो. ।।४।।
।राम कृष्ण हरि।
#तुका_म्हणे
Comments
Post a Comment