भोर_संस्थान

भोर_संस्थान 

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक संस्थान होते. भोर संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या संस्थानांपैकी एक संस्थान होते.
भोर संस्थान
इ.स. १६९७ – इ.स. १९४८

 पहिला राजा: शंकराजी नारायण पंतसचिव
 (इ.स. १६९७-१७०७)
अंतिम राजा: रघुनाथ शंकर पंतसचिव 
(इ.स. १९२२-१९५१)

भोर संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण हे छत्रपती राजाराम महाराजांच्या अष्टप्रधानमंडळातील सचिव होते


 पंतसचिव ह्या नावाने त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी भोर संस्थानाचा कारभार पाहिला.

भोरच्या पंतसचिव घराण्याच्या राज्यकर्त्यांची नावे अशी

Q*पंतसचिव शंकराजी नारायण (कार्यकाल १६९७ - १७०७)
*पंतसचिव नारो शंकर (कार्यकाल १७०७ - १७५७) - शंकरजी नारायण ह्यांचे चिरंजीव
*पंतसचिव चिमणाजी] (कार्यकाल १७३७ - १७५७) - नारो शंकर ह्यांचा पुतण्या
*पंतसचिव सदाशिवराव (कार्यकाल १७५७ - १७८७) - चिमणाजी ह्यांचे जेष्ठ पुत्र
*पंतसचिव रघुनाथराव (कार्यकाल १७८७ - १७९१) - चिमणाजी ह्यांचे कनिष्ठ पुत्र
*पंतसचिव शंकरराव (कार्यकाल १७९१ - १७९८) - रघुनाथराव ह्यांचे चिरंजीव
*पंतसचिव चिमणाजी दुसरे (१७९८ - १८२७) - शंकरराव ह्यांचे दत्तक पुत्र
*पंतसचिव रघुनाथ चिमणाजी (१८२७ - १८३७)- चिमणाजी दुसरे ह्यांचे दत्तक पुत्र
*पंतसचिव चिमणाजी रघुनाथ (१८३९ - १८७१) - रघुनाथराव चिमणाजी ह्यांचे दत्तक पुत्र
*पंतसचिव शंकर चिमणाजी (१८७१ - १९२२) - चिमणाजी रघुनाथ ह्यांची चिरंजीव
*पंतसचिव रघुनाथ शंकर भाऊसाहेब पंडित (१९२२ - १९५१) - शेवटचे पंतसचिव
८ मार्च १९४८ रोजी हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यात आले.



इतिहास
संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर
 (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिले . हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे.



 त्याचा पुत्र नारोपंत. हा  छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली.छत्रपती संभाजी राजांच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. राजाराम महाराज जिंजीस गेले, तेव्हां महाराष्ट्रांत एकटे रामचंद्रपंत अमात्य होते. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर होती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें राजाराम महाराज यांनी शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) राजाराम महाराज परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन  त्यांना रिकामें असलेलें सचीवपद दिलें. ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं.
संदर्भ 
फोटो  :-  भोर गं.प.वाचनालय.
             खंड 1 2

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४