हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान)

हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान)
👉 हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान) यांचे स्मारक आहे.

अहमदनगरमध्ये दिल्लीगेटच्या पुढे आल्यावर अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यु आर्टस्, काॅमर्स अँड सायन्स कॉलेज समोर रस्त्याच्या पुर्व बाजुस हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर संस्थान) यांचे स्मारक आहे.

👉चौथ्या शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे या गावी ५ एप्रिल १८६३ रोजी नारायण दिनकरराव राजेभोसले या नावाने झाला.

👉महाराज उंचेपुरे रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे होते. २३ ऑक्टोबर १८७१ रोजी विजयादशमीला ते करवीर गादीला दत्तक आले.

👉ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले?
महाराजांना घोडेस्वारी, शस्त्र आणि शास्त्र, राज्यकारभारात विशेष रुची होती. मराठी, इंग्रजी, हिंदी व मोडी भाषेवर महाराजांचे प्रभुत्व होते. ब्रिटीश सरकारकडून रयतेची होणारी पिळवणूक आणि छळ महाराजांनी पाहिला होता त्याची महाराजांना जाणीव होती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत या गोष्टीचा त्यांना सार्थ अभिमान होता आणि त्यांच्या पुण्याईने आपल्याला हे राज्य मिळाले आहे याची जाणीव होती. रयतेच्या कल्याणाची आपल्यावर जबाबदारी आहे याची त्यांना कल्पना होती. म्हणून महाराजांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.


महादेव बर्वे नावाच्या ब्रिटीश धार्जीन्या हरामखोर कारभार्याने ब्रिटीशांच्या मदतीने महाराजांना वेढे ठरवून अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात नजरकैदेत ठेवले होते.

महारांना ग्रीन नावाच्या अंगरक्षकाच्या निगराणीखाली ठेवले होते ग्रीन हा महाराजांना सारखा छळत असे या साऱ्या त्रासाला महाराज कंटाळले होते यातच महाराजांची ब्रिटीश अंगरक्षक ग्रीनशी झटापट झाली यात ग्रीन या अंगरक्षकाने महाराजांच्या पोटात जोराचा लथप्रहार केला यात महाराजांचा मृत्यू झाला ती तारीख होती २५ डिसेंबर १८८३ परशुराम ऊमाजी भोसले यांनी महाराजांना अग्नी दिला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पित्याच्या समाधीचे दर्शन घेऊन तेथे एका वसतिगृहाची स्थापना केली.
"छत्रपती शिवाजी महाराज चौथे (करवीर संस्थान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा"
🙏🙏🙏⛳⛳⛳

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४