मराठा साम्राज्याचे प्रतिकूल काळातील दोन आधारस्तंभ 🚩धनाजी संताजी 🚩
स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीनंतर. औरंगजेबने संभाजी महाराजांना पकडले. संभाजी महाराज त्याठिकाणी झुकले नाहीत. स्वाभिमानासाठी स्वराज्यासाठी महाराजांनी बलिदान दिले. यानंतर औरंगजेबाला वाटले. मराठा साम्राज्य जिंकून घेऊ. परंतु धनाजी जाधव वर संताजी घोरपडे यांनी जवळपास 17 वर्षे मुघल सैन्याशी लढा दिला आणि मराठा साम्राज्य अबाधित राखण्यात या दोन वीराचा सिहाचा वाटा आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा बदला मोगलांना व शत्रु सैन्यांचा सळो की पळो करुन घेतला.
आजही महाराष्ट्र मध्ये म्हण प्रचलित आहे. ती अशी शत्रुसैन्यामध्ये धनाजी संताजीची एवढी दहशत आणि वाचत बसली होती की अक्षरशः रडकुंडीला आणलं होतं.
नुस्त संताजी-धनाजी आले हीं बातमी शत्रुसैन्यामध्ये पसरली तरी. शत्रु सैन्याचे घोडे पाणी पीत नसत. त्यावेळी शत्रुसैन्यामध्ये सैनिक घोडेस्वार घोड्यांना ढोरांना जनावरांना उद्देशून म्हणायचे तुम्हाला काय पाण्यामध्ये संताजी-धनाजी दिसतात की काय?
एवढे प्रचंड दहशत!!
👉संताजी घोरपडे याच्या विषयी आहेक पराक्रमाचे कसे आहेत. परंतु एक किस्सा आम्ही जरूर या ठिकाणी सांगू.
👉 एक लाखाच्या फौजेची फक्त दहा जणांनी घुसून हल्ला करणे म्हणजे साक्षात मृत्यूला आव्हान देण्यासारखे होते. परंतू ही किमया सरसेनापती संताजी घोरपडे आणि त्यांच्या करणी करून दाखवली होती.
एक लाखाच्या औरंगजेबाच्या फौजा मध्ये फक्त निवडक 10 शूर वीरांना घेऊन. औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापून आणणे. ही काय साधी गोष्ट नव्हती!
औरंगजेब चुकून वाचला नाहीतर सोन्याच्या कळसा च्या जागी मुडक असते.
👉थेट हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेबावर हल्ला करणाऱ्या ह्या सेनानीला मराठी माणूस कधीच विसरणार नाही!
धनाजी जाधव यांच्या बद्दल सांगायचे झाले तर या शूर वीरला पाच छत्रपतींचा सहवास लाभला होता.
मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून 1697ते 1708या काळात सेनापती म्हूणन सेवा केली.
👉 थोरल्या शाहू महाराजांना गादीवर बसवण्यासाठी सरसेनापती धनाजी जाधव यांची भूमिका खूप महत्त्वाची होती.
👉 स्वराज्याच्या तिसरे छत्रपती राजाराम महाराजांनी वतनदारी सुरू केली. कारण काळ बिखट होता. अनेक सरदार मिळाले होते. खजिना रिकामा होता. अश्या वेळी वतनाच्या तुकड्यावर पण शत्रू सैन्यातले सरदार स्वराज्यात सामील होत होते.फुटत होते.त्यामुळे मुघला प्रमाणे वतनदारी चालू करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यावेळी त्यांचा निर्णय परिस्थितीनुसार योग्यच होता. परंतु याचे विपरीत परिणाम हे भोगायला लागत होते.
सैन्यामध्ये लढाऊ शिपाई असतात त्यांची ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन संबंधित वतनदार, जहागीरदार सोबत असायचे. त्यामूळे स्वराज्य ही संकल्पना थोडीशी माग पडायला सुरुवात झाली होती.
ते वतनदार त्यांच्या वतन पुरते स्वतंत्र राजे झाल्यासारखे वाघत. त्यांच्या स्वतंत्र तुकड्या वाढे गड्या, कारभारी होते. हे स्वतःला राजा समजत जाहगिरीचे.
त्यामुळेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा धोका ओळखूनच वतनदारी बंद करून वेतन दारी चालू केली होती. अशी अनेक उदाहरणे आपणास इतिहासात मिळतील.
👉 अवघड लढाई दिसली की हे वतनदार,जागीरदार, सरदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मुघलांना किंवा शत्रूसैन्याला वैयक्तिक स्वार्थासाठी जाऊन मिळत असत.
🚩 असा बिकट काळ चालू असताना सुद्धा या स्वराज्य मध्ये दोन सरदार असे होते की दोघेही देशप्रेम व छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मनात बाळगून होते.🚩
ते म्हणजे संताजी घोरपडे व धनाजी जाधव
त्या दोघांनी परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे धडे गिरवायला सुरुवात केली.
आकस्मित हल्ला करून, शत्रु सैन्याला नमो हराम करून. शत्रूचे वाघा सारखे लचकेतोड चालू केली. या दोघांसोबत प्रतिनिधी घोरपडे बंधू (बहिर्जी मालोजी) त्या सरदारांनीही छोट्या आघाड्या उभारल्या.
दिवस रात्र पायपिट करुन अकस्मात हल्ले करून अचानक माघार घ्यायची. आणि शत्रूला नामोहरम करून सोडायच.
स्वराज्य ही संकल्पना जनमानसामध्ये रुजवणून, कायम ठेवण्यासाठी हे लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली.
या दोन सरदारांनी पुढे सरसेनापती पदे भूषवली.
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीमध्ये या दोन्ही सरदारांनी, सरसेनापती नि निष्ठापूर्वक स्वराज्याची सेवा केली . स्वराज्यासाठी शेकडो लढाया केल्या.
धन्य ते धनाजी संताजी🙏🚩
लेख अपूर्ण
©®लेखक नितीन घाडगे
Comments
Post a Comment