जुलमी ब्रिटिश राजवटीशी एक असामान्य लढा देवून इतिहास घडवणारे देशभक्त, येरवडा जेल फोडणारे वीर किसन महादेव वीर ऊर्फ आबासाहेब वीर यांची आज ४२ वी पुण्यतिथी.
जुलमी ब्रिटिश राजवटीशी एक असामान्य लढा देवून इतिहास घडवणारे देशभक्त किसन महादेव वीर ऊर्फ आबासाहेब वीर यांची आज ४२ वी पुण्यतिथी.
|| रक्ताच्या नात्यापेक्षा स्वातंत्र्य चळवळीचे नाते महत्वाचे ||
. साहेब आणि आबासाहेब म्हणजेच यशवंतरावजी आणि किसन वीर म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीपासूनचे जीवाभावाचे मित्र. एकदा जिल्ह्याच्या राजकारणात एका बाजूला साहेबांचे नातेवाईक आणि दुसऱ्या बाजूला किसन वीर असा एक प्रसंग उद्भवला. त्यावेळी साहेबांनी बराच काळ या संघर्षावर मौन बाळगले. पुढे एका मेळाव्यात बोलताना यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपले मौन सोडले आणि ते म्हणाले ‘आबांची जी काँग्रेस आहे, तीच माझी काँग्रेस आहे. आबा सांगतील तीच पूर्व दिशा. मी त्याच वाटचालीने जाणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एका बाजूला रक्ताचे नाते, तर दुसरीकडे स्वातंत्र्य आंदोलनाचे नाते आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा मी स्वातंत्र्य चळवळीच्या नात्याला अधिक महत्त्व देईन,’ असे यशवंतरावांनी जाहीर केले.
----------------------------------------------------------------------
येरवड्याचा तुरुंग फोडणारे स्वातंत्र्यसैनानी खासदार किसन वीर उपाख्य आबासाहेब यांची आज पुण्यतिथी त्यांच्या विचार व कार्याला विनम्र अभिवादन!
----------------------------------------------------------------------
#यशवंतनीती - जागर यशवंत विचारांचा
देशभक्त क्रन्तिकारक किसन वीर याच्या नातू याच्या वॉल करून
Comments
Post a Comment