कोंकण संगमेश्वरचे कल्याणपुरवर्धिश्वर चालुक्य / चाळके 👑

कोंकण संगमेश्वरचे कल्याणपुरवर्धिश्वर चालुक्य / चाळके 👑

  चालुक्य वंशाच्या  संपूर्ण महाराष्ट्रात सोळंके, साळुंके, पाटणकर,  मारणे देशमुख, महूरकर सरदार, इंगळे इत्यादी अशा अनेक शाखा व उपशाखा होत्या , तरी आपण कोकणातील संगमेश्वरपासून राज्य करणाऱ्या मुख्य चालुक्य / चाळके शाखेवर लक्ष केंद्रित करू. संगमेश्वरचे चालूक्य हे मूळचे सध्याचे महाराष्ट्र आणि कर्नाटकभर साम्राज्याचा विस्तार असणाऱ्या कल्याणी शाखेच्या चालूक्य सम्राटांचे वंशज जे बाणावसी वरून कोकणातील संगमेश्वर मध्ये स्थायिक झाले आणि देवगिरीच्या यादव/ जाधव सम्राटांचे महामंडलेश्वर झाले.  संगमेश्वर महात्म्य हे पहिले संगमेश्वर चालुक्य राजा कर्णदेवाचे दरबारी कवी शेष याने रचले होते असे म्हटले जाते हे महात्म्य चालूक्य सम्राट   कर्णदेवाच्या कारकिर्दीचा ज्वलंत वृत्तांत देते  आणि त्याला एक पौराणिक अर्ध-दैवी महापुरुष  म्हणून दाखवते . कर्णदेवाच्या पश्चात वेतुगीदेव आला त्यानंतर सोमेश्वर पाचवा आला ज्याचा धाकटा भाऊ सोमदेव गादीवर आला. संगमेश्वरचे  कावदेवराय किंवा कामदेव भूपाल हे देवगिरीच्या यादव / जाधव सम्राटांचे महामंडलेश्वर होते आणि  त्यांचे पुत्र शूरवीर हुतात्मा हरपालदेवराय चालुक्य हे चक्रवर्ती सम्राट रामदेवराया यादव यांचे जावई होते . देवगिरी यादव / जाधव साम्राज्याचे सार्वभौमत्व परत मिळवण्यासाठी हरपालदेव यांनी विशाल खिलजी सेनेला कडवी  झुंझ दिली पण त्यांचे स्वतंत्र दक्खन चे स्वप्न ते हौतात्मा झाल्यासरशी अपूर्ण राहिले परंतु त्यांचे वंशज सुद्धा काही कमी नव्हते १५ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांच्या वंशजांनी गनिमी युद्ध पद्धती  आणि ३००च्या  मजबूत नौदल ताफ्यासह बहमनींवर  नियमितपणे मारा करत कोकणात राज्य केले. १४७० मध्ये, बहमनींनी संगमेश्वरच्या जखुराया चाळके विरुद्ध संपूर्ण ताकदीनिशी युद्ध केले. जखुरायाने त्यांच्या पराक्रमी चालूक्य वंशाची परंपरा चालू ठेवत  ५०हुन अधिक लढायांमध्ये जोरदार प्रतिकार केला कारण  त्यांच्या रक्तातच पराक्रम भिनलेला होता. परंतु अखेरीस शत्रूने सर्व प्रकारचा  पुरवठा बाहेरून खंडित केल्यामुळे एका वर्षानंतर  १४७१ मध्ये आखेरीस त्यांना शरण जावे लागले.
      
     

Sources - 1)Journal of the Royal Asiatic Society of Great Britain & Ireland Vol 2
2)The Journal Of The Royal Asiatic Society 1839 Vol 5
3) Sangameshwar Mahatmya and Linga Worship, VN Mandlik
4)Indian Antiquary Vol 2
5)Gazetteer of the Union Territory Goa, Daman and Diu, VT Gune

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...