सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

सरसेनापती हंबीरराव मोहिते

            हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला त्यामुळे  त्यांना निजामशहाने "बाजी" हा किताब दिला होता.असे सदर्भ जयशिगराव पवार व शिवदे याच्या पुस्तकं सरसेनापती हबीरराव मोहिते हया बुक मध्ये आहेत.

 मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.

 या घराण्याने त्या काळातील मातबर बलाढ्या अश्या सरदार राजेघाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक झाल्यावर घाटगे,घोरपडे, भोसले, मोहिते हे मातबर घराणी नात्यांनी एकत्र आली.

 याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले.

संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी शूरवीर तलबीड येथील वतणावर होते.असे दिसते. याच्या दोन शाखेत विभागणी दिसते.


त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये, ऐतिहासिक दस्त व कागद पत्रानुसार पहावयास मिळते.

         स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात होते. तेे पुढे कर्नाटकला गेले त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले.

        पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र छ.राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.

यातील संभाजी मोहितेंचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हंबीरराव मोहिते हे होय.
 प्रतापराव गुजर यांच्या नंतर सरसेनापती म्हणून हंबिराव  मोहिते यांची नियुक्ती झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमले.
मोहिते घराण्याचा भोसले घराण्यशी प्रथम संबंध :-

               मोहिते घराण्याचा भोसले घराण्याशी पहिला संबंध तेव्हा आला जेव्हा संभाजी व धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सेनेमध्ये प्रवेश केला. शहाजीराजांसोबत त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले होते. यापैकी संभाजी मोहिते यांचा पुत्र म्हणजे हंबीरराव मोहिते होय. (मूळ नाव-हंसाजी मोहिते, शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला होता.)

संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत लावून दिला व भोसले आणि मोहिते घराणे कधीही न तुटणाऱ्या एका नात्यात बांधले गेले. त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी देखील आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांचे पुत्र छ.राजाराम महाराजांशी लावून दिला आणि सोयरिक अधिक घट्ट केली.



त्यांचा हा पराक्रम पाहून प्रतापराव गुजर यांच्या नंतर रिकामी झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापराव गुजरां सारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असावा म्हणून छ.शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली, सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला .अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती!

           हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय. ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरात भवानी माते समोर विराजमान आहे. त्याचे कारण म्हणजे अफझलखाना सोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय.

या लढाईत त्यांनी ६ तासात ६०० शत्रूंना मारले असे म्हटले जाते.ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. त्या काळात छ. शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे बोलले जाते. म्हणजे एखाद्या मावळयांने  एकाच लढाईत १०० शत्रूंना कंठस्नान घातले तर  त्या मावळयाच्या तलवारीवर एक शिक्का ऊमटवला जायचा. त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे संदर्भातील असं मला वाटत नाही.

 शत्रू सैन्य चहुबाजूंनी टपून बसले होते. अश्यावेळी हंबीरराव मोहितेंसारख्या खंद्या सेनापतीने आपल्या महाराजांना पदोपदी साथ दिली.

     हंबीररावांनी पहिले लक्ष्य केले मुघल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांना. महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून हंबीरराव मोहितेंच्या सैन्याने त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यानंतर त्यांनी खानदेश, बागलाल, गुजरात, बर्हाणपूर, वर्हाड, माहूड, वरकड पर्यंत मजल मारीत प्रत्येक मुघलाला हाकलून दिले.

दिवसागणिक त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत होता. शत्रू सैन्य हंबीररावांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करू लागला. इकडे मुघलांसोबत आदिलशाहीला देखील त्यांनी जबरदस्त दणका दिला. कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान याचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला स्वराज्याच्या छत्रछायेखाली आणले.


दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, स्वराज्य पोरका झाला.

शिवाजी महाराजांनंतर अर्थातच स्वराज्याची धुरा थोरला पुत्र संभाजी महाराजांकडे येणार होती, परंतु दरबारातील एक गटाने छ.संभाजी महाराजांना गादीवर न बसवता.
छ. राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्याचा घाट घातला. पण हंबीरराव मोहिते यांनी मात्र छ.संभाजी महाराजांना पाठींबा दिला आणि अखेर नियतीच्या इच्छेप्रमाणे छ.संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झाले.

संभाजी राजांच्या राज्याभिषेकानंतर, त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा स्वराज्याचा वारू चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव मोहिते सज्ज झाले. या काळात त्यांनी केलेली बुर्हाणपुरची लुट महत्त्वाची मानली जाते. तो विजय म्हणजे हंबीरराव मोहितेंच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. या विजयामुळे मोघलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला.

रामशेजच्या किल्ल्याची लढाई ही इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेलेली लढाई आहे. या लढाईमध्ये हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडवली होती.
यानंतरही मुघल सरदार कुलीचखान, रहुल्लाखान व बाहदुरखान आणि शहाजादा आज्जम यांना देखील स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावताना हंबीर राव मोहिते यांनी पराक्रमाची शर्थ केली.


        हंबीररावांची शेवटची लढाई म्हणजे वाईजवळील मुघल सरदार सर्जाखान विरुद्धची लढाई होय. या लढाईत देखील आपल्या कर्तुत्वाला साजेसे शौर्य गाजवताना तोफेचा गोळा लागून १६ डिसेंबर १६६७ रोजी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा, पण त्यांनी आपला अमुल्य हिरा मात्र गमावला.

१६ डिसेंबर १६८७*
सरसेनापती हंबीरराव मोहीते स्मृती दिन
वाई(सातारा) येथे मुघलांसोबत झालेल्या युद्धात हंबीररावांना गोळी लागून ते धारातिर्थी पडले.
मुघल सरदार सर्जाखानासोबत झालेलं हे युद्ध मराठ्यांनी जिंकले होते, त्यानंतर मराठा सैन्याचा आनंदोत्सव सुरू असताना एका लपून बसलेल्या मुघल बारगीरने गोळी झाडली व ती हंबीररावांना लागली.

संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांचे नाव आवर्जून पाहायला मिळते. आपल्या सेनापतीपदाला साजेशी कामगिरी करून दाखवीत, शेवटच्या श्वासापर्यंत लढून हंबीररावांनी छ. शिवाजी महाराजांनी त्यांची केलेली निवड सार्थ करून दाखवली.

 मानाचा मुजरा
                 संकलन :-नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...